niyojanbhan321खरे तर तरुणांना नियोजनाची जास्त गरज असते. परंतु सर्वात जास्त प्रतिसाद ज्येष्ठांकडून अथवा ज्येष्ठ नागरिकत्वाच्या सीमारेषेवर असलेल्यांकडून या स्तंभाला मिळत असतो, हे खास करून नमूद करायला हवे. या असुरक्षित मानासिकतेचे लक्षण आहे काय, याचे विश्लेषण समाजशास्त्रज्ञ करतीलच. परंतु ज्येष्ठ नागरिकांना नियोजन करावे असे वाटावे याचा आनंद नक्की वाटतो. एखादे नियोजन प्रसिद्ध झाल्यानंतर याच परिस्थितीशी साधम्र्य असणाऱ्या मेल वाचकांकडून येतात. द्विरुक्तीचा दोष टाळण्यासाठी साधम्र्य असलेले आíथक नियोजन टाळण्याकडे कल असतो. तथापि या दाम्पत्याच्या कौटुंबिक पाश्र्वभूमीत जमीन-आस्मानाचा फरक आढळला.
आज ज्यांचे आíथक नियोजन जाणून घेणार आहोत त्या रेवती कुलकर्णी (५६) या एका राष्ट्रीयीकृत बँकेत उपमहाव्यवस्थापक (डेप्युटी जनरल मॅनेजर) असून त्या बँकेच्या निधी व गुंतवणूक खात्यात कार्यरत आहेत. त्यांचे पती सुधीर कुलकर्णी (६०) हे एका बहुराष्ट्रीय कंपनीतून वयोमानानुसार निवृत्ती झाले असून गेला ३० सप्टेंबर हा त्यांचा नोकरीतील शेवटचा दिवस होता. सुधीर हे एमएस्सी असून ते निवृत्तीसमयी वरिष्ठ व्यवस्थापक होते. रेवती या बीकॉम व सीएआयआयबी आहेत. बँक अधिकारी संघटना व भारतीय बँक महासंघ यांच्यातील वेतनवाढीसंदर्भातील बोलणी लांबली व रेवती कुलकर्णी यांचा मुदतपूर्व निवृत्ती घेण्याचा बेतही लांबला. अंतिम टप्प्यात असलेल्या चच्रेतून लवकरच मार्ग निघेल व नवीन नियमांनुसार वेतननिश्चिती झाल्यावर मार्च २०१५पर्यंत त्या सेवानिवृत्ती स्वीकारतील.
पुढील वर्षभरात दोघांच्या सेवानिवृत्तीमुळे त्यांच्याकडे अंदाजे ७०-७५ लाख गुंतवणुकीसाठी उपलब्ध होतील. या निधीचे योग्य नियोजन कसे करावे यासाठी त्यांना सल्ला हवा आहे. रेवती कुळकर्णी यांना निवृत्तिवेतन मिळेल व भविष्यातील त्यांच्या व सुधीर यांच्या आजारपणातील तीन लाखांपर्यंतच्या खर्चाचा परतावा मिळेल. रेवती कुलकर्णी यांच्या सुरू असलेल्या एसआयपीचा तपशील सोबत दिला आहे. या सुरू असलेल्या एसआयपीव्यतिरिक्त सात लाखांच्या मुदत ठेवी व म्युच्युअल फंड व अन्य कंपन्यांचे शेअर्स आदी गुंतवणुका मिळून ३० सप्टेंबर रोजी त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य अंदाजे २८ लाख रुपये आहे.  

रेवती कुलकर्णी यांना सल्ला
रेवती व सुधीर यांचे वयोमान आयुर्वमिासंबंधित उत्पादन घेण्याच्या पार असल्यामुळे आणि त्यांना विम्याची आवश्यकता नसल्याने, सरळ नियोजनाच्या दुसऱ्या टप्प्यावर जायचे ठरले. सुधीर यांनी वयाची साठ वष्रे पुरी केली असल्याने ६,६६,६६५ रुपये (व्यक्तिगत कमाल मुभा असलेली) इतकी रक्कम एलआयसीच्या वरिष्ठ नागरिक विमा योजनेत गुंतवावे. जेणेकरून त्यांना मासिक ५,००० रुपये व्याज मिळेल. ज्यांनी वयाची साठ वष्रे पूर्ण केली आहेत त्यांच्यासाठी ही सर्वोत्तम पेन्शन योजना आहे. समभाग गुंतवणूक किती असावी व कशात असावी हा प्रश्न त्यांना पडला आहे. वर उल्लेख केल्यानुसार त्यांच्याकडे केवळ समभाग व समभागसदृश गुंतवणूक २२ लाखांची आहे. याचा अर्थ समभाग गुंतवणुकीची जोखीम सांभाळण्यास त्या सक्षम आहेत. समभाग गुंतवणुकीबाबत जो अनभिज्ञ असतो त्या व्यक्तीस जो नियम लावला जातो –  ‘एकूण गुंतवणुकीमध्ये रोखे व स्थिर उत्पन्न देणाऱ्या गुंतवणुकीचे प्रमाण हे वयाइतके असावे’ तो नियम या नियोजनात शिथिल करण्याचे ठरले. म्हणून आवश्यक इतकी रोकडसुलभता ठेवून बाकीची रक्कम समभागसदृश गुंतवणुकीत असावी असा निर्णय झाला. एकूण अंदाजे ७० लाखांपकी ५० लाख समभागसदृश गुंतवणूक नव्याने करावी असे ठरले. या बाबतीत रेवती यांना एक सूचना केली. सध्या रेवती गुंतवणुकीशी संबंधित एका मोठय़ा पदावर असल्याने अनेक अहवाल त्यांच्याकडे येत असतात आणि ते त्या वाचत असतात. म्हणून सुधीर यांना मिळालेल्या रकमेतून गुंतवणूक जरूर करावी, परंतु सेवानिवृत्तीनंतर १८ महिन्यांनी गुंतवणुकीचा आढावा घेऊन थेट समभागात गुंतवणूक करायची की म्युच्युअल फंडामार्फत गुंतवणूक करायची याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. पुढील एक ते दीड वर्ष शेअर बाजाराची वाटचाल वरच्या दिशेने राहील असा रेवती यांचा कयास आहे. म्हणून पुढील एका वर्षांसाठी त्या दहा लाखांची गुंतवणूक प्रत्यक्ष समभागात करणार आहेत.
रेवती कुलकर्णी ज्या बँकेत काम करतात त्या राष्ट्रीयीकृत बँकेची समूह आरोग्य विमा योजना असून सेवानिवृत्त कर्मचारी या योजनेचे सभासद बनू शकतात. सेवानिवृत्तीनंतर वार्षकि चार हजार सभासदत्व भरून रेवती यांनी आरोग्य विमा घ्यावा. परंतु हा विमा पुरेसा नाही म्हणून त्यांनी दोन लाखांचा न्यू इंडिया अॅशुरन्स कंपनीचा आरोग्य विमा आणि अन्य कंपनीचे चार पट अतिरक्त विमा छत्र (ळस्र् वस्र्) घेणे शक्य आहे, असे एकूण १३ लाखांचे विमा छत्र मिळेल. आजच्या घडीला हे विमा छत्र पुरेसे आहे. भविष्यात हे विमा छत्र त्या वेळच्या परिस्थितीनुसार वाढवावे.    
रेवती कुलकर्णी यांना अंदाजे मासिक ३१ हजार निवृत्तिवेतन बसेल असा अंदाज आहे. याचा दुसरा अर्थ रेवती व सुधीर यांचे निवृत्तीपश्चात जीवनमान हे निवृत्तिवेतन व मुदत ठेवींवर मिळणारे व्याज यावर सहज भागण्यासारखे आहे. तरीसुद्धा यांना आíथक नियोजन करून घेणे जरुरीचे वाटले. या सदराद्वारे त्यांना आपण केलेले नियोजन किती योग्य आहे व काय बदल करणे जरुरीचे आहे हे तपासून पाहायचे होते. वितीय नियोजकाचे नियोजन व त्यांनी स्वत: केलेले नियोजन यावर काही मुद्दे वगळता एकमत झाले. आवश्यक तेथे बदल सुचविले. त्यांची प्रत्यक्ष समभाग गुंतवणूक खूपच जास्त आहे व त्यांनी यात बदल करावा, असे नियोजकाचे मत होते. परंतु ही जोखीम सांभाळण्यास त्या सक्षम आहेत असे त्यांचे मत आहे. त्यांच्या मते या नियोजनातून त्यांना नवीन दिशा मिळाली. त्यांच्या पश्चात त्यांच्या मालमत्तेचे कसे व्यवस्थापन असावे हा नियोजनाचा महत्त्वाचा हेतू आहे. याबद्दल त्यांनी विचार केला असून त्या येत्या दोन वर्षांत त्या दिशेने पावले टाकणार आहेत.
त्यांना हे नियोजन वाचण्यास दिले तेव्हा त्यांच्या कामाच्या स्वरूपाविषयी एक प्रश्न विचारला त्या त्यांच्या बँकेच्या ६५ हजार कोटींच्या गुंतवणुकांचे व्यवस्थापन पाहतात. व्याज दर, बाजाराची दिशा यांचे अंदाज बांधणे हा त्यांच्या कामाचा एक भाग आहे. पण वैयक्तिक नियोजन हा वेगळा भाग असल्याने त्यांनी ‘लोकसत्ता अर्थ वृतान्त’चे साहाय्य घेण्याचे ठरविले. त्यांनी हे नियोजन प्रसिद्ध करण्याची परवानी दिल्याने त्यांचे आभार.
रेवती व सुधीर कुलकर्णी यांनी करावयाच्या गोष्टी
* सेवानिवृत्तीनंतर समूह आरोग्य विमा योजनेचे सभासदत्व घेणे.
*  न्यू इंडिया अॅशुरन्सचा दोन लाखांचा आरोग्य विमा घेणे.
*     या आरोग्य विम्यास चार पट अतिरक्त विमा छत्र घेणे.
*     सुधीर कुलकर्णी यांनी एलआयसीच्या वरिष्ठ नागरिक विमा योजनेत ६.६६ लाख गुंतविणे.
*  टप्प्याटप्प्याने समभाग गुंतवणूक वाढविणे.
*  आपल्या इच्छापत्राची तयारी करणे.
रेवती कुलकर्णी यांच्या सुरू असलेल्या ‘एसआयपी’
    फंड योजना    दरमहा    गुंतलेली    बाजार मूल्य    परतावा
    गुंतवणूक        रक्कम    (30 सप्टें. २०१४ रोजी)    दर %

आयसीआयसीआय प्रु. टॉप २००     २,०००     ४२,०००    ५८,७६९    ४६.३०
एचडीएफसी इक्विटी फंड    ३,०००    ३६०,०००    ९७०,५७९    १९.०१
बिर्ला सन लाइफ इक्विटी फंड    २,०००    २४०,०००    ५६१,९२९    १६.४८
रेलिगेअर मिड अँड स्मॉल कॅप फंड    ३,०००    ६३,०००    ९८,०१५    ६३.६८