आज आपण राधिका शुक्ल यांचे आíथक नियोजन जाणून घेऊ. २८ वर्षांच्या राधिका शुक्ल या मूळच्या विदर्भातील गोंदिया जिल्ह्य़ातील आहेत. राधिका यांनी आíकटेक्ट व बांधकाम व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले आहे.  स्थावर मालमत्ता क्षेत्रात कार्यरत असलेल्या गोदरेज समूहाच्या कंपनीत त्या नोकरी करत आहेत. त्यांचे वेतन वार्षकि ९.५० लाख रुपये आहे. दरमहा सरासरी ५५,००० रुपये वेतन वजावटीपश्चात हातात पडते. कंपनीने त्यांना सह निवासी तत्त्वांवर विक्रोळी येथे अधिकारी निवासस्थान दिले आहे. त्यांचा स्वत:चा १०,००० रुपये खर्च आहे. एलआयसी पॉलिसीचा हप्ता वगळता ४०,००० रुपयांची शिल्लक बचत रूपाने राहते व या बचतीची वित्तीय लक्ष्याशी सांगड घालणे हा या नियोजनाचा हेतू आहे.
राधिका यांचे वडील दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र शासनाच्या सेवेतून वयोमानानुसार निवृत्त झाले. त्यांना शासनाच्या नियामांनुसार महागाईशी निगडित वाढ असणारे निवृत्तिवेतन मिळते. त्यांच्या आई ग्रामीण विकास बँकेत शाखाधिकारी असून त्यांना सेवानिवृत्त होण्यास तीन वष्रे शिल्लक आहेत. राधिका यांच्या लहान बहिणीने संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असून त्या संगणक प्रणाली विकसित करणाऱ्या माहिती तंत्रज्ञान कंपनीत बंगळुरू येथे मागील आठ महिन्यांपासून नोकरी करत आहेत. राधिका यांनी गोंदिया येथे एक स्थावर मालमत्ता खरेदी केली आहे. राधिका यांच्यावर काहीही कर्ज नाही.
राधिका यांना नोकरीच्या ठिकाणाहून आरोग्य विम्याचे संरक्षण लाभले आहे. यावर्षी आरोग्य विम्याचा हप्ता २०,००० रुपये झाला असून तो त्यांच्या वेतनातून कपात करून कंपनी विमा कंपनीला देते. या वर्षी ५०,००० रुपयांपर्यंत बाळंतपणाच्या वैद्यकीय खर्चाचा या पॉलिसीमध्ये नव्याने समावेश झाला आहे. राधिका यांचे पीपीएफ खाते असून असून त्या दरवर्षी एका महिन्याच्या पगाराइतकी रक्कम या पीपीएफ खात्यात जमा करतात. त्यांच्याकडे एलआयसीच्या जीवन सुरभि व जीवन आनंद या दोन योजना आहेत. जीवन सुरभि या योजनेसाठी त्या ५२,००० रुपये व जीवन आनंद या योजनेपोटी त्या ३७,००० रुपये हप्ता भरत आहेत.

राधिका यांना सल्ला :
आजच्या घडीला राधिका यांनी दोन प्रमुख वित्तीय ध्येये ठेवली आहेत. आई-वडील, बहिणीसह देशांतर्गत पर्यटनाला जाणे व भविष्यात एखाद्या परदेशातील पर्यटन स्थळाला भेट देणे. त्यांच्या दोन्ही पर्यटनाच्या खर्चासाठी तरतूद ३.५ लाख रुपये करावी असे ठरले. आई-वडिलांनी राधिका यांच्या लग्नाची तरतूद करून ठेवली आहे. लग्नाच्या दिवसाचा म्हणून जो काही खर्च असतो तो राधिका यांचे वित्तीय ध्येय निश्चित करताना धरलेला नाही. राधिका यांचा विवाह पुढील एक-दोन वर्षांत होईल. राधिका यांना विवाहानंतर जरूर असेल तर घर घेण्यासाठी लागणाऱ्या पशाची तरतूद करावीशी वाटते. ही दोन वित्तीय ध्येये निश्चित करण्यात आली. या दोन वित्तीय ध्येयांना प्राथमिकता देण्याचे ठरले.
आजच्या घडीला लग्न केव्हा होईल, कोणासोबत होईल, होणाऱ्या नवऱ्याचे स्वत:चे घर असेल का नसेल तर घर घेताना राधिका यांना नक्की किती पसे घालावे लागतील या सर्वच प्रश्नांची उत्तरे नाहीत. सामन्यत: ध्येयनिश्चितीची मर्यादा जवळ आल्यावर शेअर बाजारातील चढ-उतार टाळण्यासाठी आपला निधी हा स्थिर उत्पन्न देणाऱ्या योजनांमध्ये गुंतविला जातो. म्हणून एका वर्षांनंतर पर्यटनासाठी लागणारा निधी स्थिर उत्पन्न देणाऱ्या योजनेत गुंतवावा, अशी शिफारस करण्यात येत आहे. सहलीचे नियोजन करून विमानाची तिकिटे सहा महिने आधी काढली तर निम्याहून कमी किंमतीत तिकिटे खरेदी करता येतात हे लक्षात ठेवून नियोजन करावे. भारतात कुठेही तुम्ही पर्यटनाला गेलात तर १० ते १२ दिवसांची सहल केलीत तर साधारणत: १.२५ लाख रुपये खर्च येईल. त्यासाठी पाईनब्रिज इंडिया शोर्ट टर्म फंडात १०,००० रुपयांची दरमहा गुंतवणूक करा.
दोन ते तीन वर्षांनंतर नक्की कधी रोकड लागेल याची अनिश्चितता असल्यामुळे स्थिर उत्पन्न देणाऱ्या योजनेत गुंतविणे हा सोपा सल्ला आहे. परंतु बाजारात मर्यादित जोखीम घेतली तर थोडा जास्त नफा मिळविणे शक्य असते. एक वित्तीय नियोजक व राधिका यांचे वय हे समभाग गुंतवणूक करण्यास सुयोग्य वाटते. शेअर बाजाराचा अभ्यासक म्हणून एक-दोन वर्षांत निर्देशांक वर जाण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत २५ हजारांची दरमहा गुंतवणूक एचडीएफसी म्युच्युअल फंडांच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये करावी.
राधिका यांना एलआयसीच्या दोन्ही योजना मिळून असलेले विमाछत्र पुरेसे नाही. जीवन सुरभि ही मनीबॅक पॉलिसी आहे. तर जीवन आनंद एंडोमेंट प्रकारची आहे. त्यामुळे परताव्याचा दर ३.५ टक्के पडतो. या पॉलिसीचा हप्ता अजून १० वष्रे भरायचा आहे. विमाछत्र भरत असलेल्या पॉलिसीच्या हप्त्याचे प्रमाण अधिक आहे. म्हणजे ही पॉलिसी अत्यंत महाग पॉलिसीमधील एक आहे. तरीही राधिका यांचा पगार वाढत जाईल म्हणून म्हणून जीवन सुरभि सुरू ठेवावी व जीवन आनंद बंद करा. कुटुंबातील एक कमावत्या व्यक्ती म्हणून तुम्हाला आयुर्वम्यिाची आवश्यकता आहे. एचडीएफसी लाईफचा ‘क्लिकटू प्रोटेक्ट’ या मुदतीचा विमा घ्या. दीड कोटी विमा छत्र असलेल्या व ३० वष्रे मुदतीच्या विम्याला वार्षकि १४,००० हप्ता भरावा लागेल. दर पाच वर्षांनी विमा छत्रात ५० लाखांची वाढ करायची असून सर्व विम्याची मुदत तुमच्या वयाच्या साठ म्हणजे सेवानिवृतीच्या वयापर्यंत ठेवायची आहे.
राधिका या त्यांच्या आई-वडिलांची थोरली मुलगी असल्याने जी काही कर्तव्ये घरातील थोरल्याने करायची असतात ती सर्व त्यांची करायची तयारी आहे. ‘आईवडिलांची जबाबदारी माझी आहे व लग्नानंतरही ती माझीच राहिल’, असे त्या म्हणतात. या संदर्भात त्यांना एक सूचना करावीशी वाटते की, काही कंपन्या कर्मचाऱ्याने नोकरी सोडल्यानंतरही आरोग्य विम्याचा लाभ घेण्याची सुविधा देत असतात; मात्र या विम्याचा हप्ता कर्मचाऱ्याने भरावयाचा असतो. भविष्यात राधिका यांनी विवाहानंतर नोकरी सोडली तर आई-वडिलांच्या आरोग्य विम्याचा विचार करून ठेवावा. त्यांनी न्यू इंडिया इन्शुरन्सचा एक लाखाचा आरोग्य विमा घ्यावा. उद्या खरोखरच विवाहपश्चात दुसऱ्या शहरात किंवा दुसऱ्या देशात जाण्याच्या निमित्ताने नोकरी सोडण्याचा प्रसंग आलाच तर या पॉलिसीवर टॉप-अप करून पुरेशा आरोग्य विम्याचे छत्र उपलब्ध होईल. अनेक जणांचा असा समज असतो की, पॉलिसी खरेदी केली की आरोग्य विम्याचे छत्र उपलब्ध झाले. एखादी पॉलिसी खरेदी करण्यापूर्वीच्या आजाराच्या खर्चाचा दावा नाकारण्याचा अधिकार विमा कंपनीला आहे. म्हणून पॉलिसी जितकी जुनी तितकी दावा नाकारण्याची शक्यता कमी. म्हणून आजच आई-वडिलांसाठी आरोग्य विम्याची एक पॉलिसी घेऊन ठेवा.
स्त्रीच्या आयुष्यात विवाहानंतर अनेक संदर्भ बदलतात. तुमचा विवाह देशातच राहणाऱ्या व्यक्तीशी होणार की परदेशातील, त्याचे स्वत:चे घर असेल की विवाहपश्चात घर घ्यावे लागेल या सर्व प्रश्नांची उत्तरे आज नसल्यामुळे गुंतवणुकीत लवचीकता ठेवली आहे. लवचीकता जितकी अधिक तितके परताव्याचे प्रमाण कमी असण्याची शक्यता आहे. प्रत्येक व्यक्ती आíथक नियोजनातील प्राथमिकता ठरवत असते. म्हणून जीवन विमा व आरोग्य विमा या तीन गोष्टींची पूर्तता झाल्यावर तुमचा विवाह नक्की झाल्यावर तुमच्या भावी पतीला तुमच्या वित्तीय नियोजनाची कल्पना द्या. विवाहानंतर आवश्यकतेनुसार यात बदल करा.