News Flash

माझा पोर्टफोलियो : नव्या डिजिटल युगाची पायाभरणी

कंपनीचे ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ नेटवर्क हे जगातील सर्वात मोठे नेटवर्क असेल.

|| अजय वाळिंबे

टाटा कम्युनिकेशन्स म्हणजे पूर्वाश्रमीची विदेश संचार निगम लिमिटेड अर्थात व्हीएसएनएल ही सरकारी कंपनी. ३५ वर्षांपूर्वी जगभरातील इतर देशांप्रमाणे भारतातही इंटेलसॅट बिझिनेस सव्र्हिसेसची गरज होती. १९८६ मध्ये व्हीएसएनएलची स्थापना झाल्यानंतर कंपनीने १९९२ मध्ये इंटेलसॅट बिझिनेस सव्र्हिसमध्ये स्वत:चा मानदंड स्थापित केला. ही उपग्रह आधारित सेवा असून ती ग्राहकांच्या आवारात जवळ असलेल्या पृथ्वीवरील स्थानकांद्वारे पॉइंट-टू-पॉइंट आधारावर उच्च दर्जाचे डेटा सर्किट्स प्रदान करते. कंपनीने पुण्याजवळील आर्वी येथे स्वत:चे लँड अर्थ स्टेशन (एलईएस) सुरू करून १९९९ च्या कालावधीत मुंबई, नवी दिल्ली, कलकत्ता आणि चेन्नई येथे कंपनीच्या आंतरराष्ट्रीय प्रवेशद्वारावर असलेल्या स्टुडिओद्वारे छोट्या पोर्टेबल टर्मिनलद्वारे व व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सेवा (देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही) देणारी इनमारसॅट-सी सेवा सुरू केली. तसेच १९९५ पासून इंटरनेट प्रवेश सेवा प्रदान करण्यास सुरुवात केली. २००० मध्ये टाटा समूहाने कंपनी ताब्यात घेतल्यानंतर टाटा कम्युनिकेशन्सने अनेक मोठे पल्ले पार करून आज ती एक मोठी बहुराष्ट्रीय कंपनी बनविली आहे. कंपनी जगातील ३० टक्के सर्वात प्रगत सब्टा फायबर नेटवर्क (इंटरनेट रूट) चालवत असून जगातील २०० पेक्षा जास्त देशांमध्ये कंपनीचे अस्तित्व आहे. टाटा कम्युनिकेशन्स ‘फॉच्र्युन ५००’ सूचीमधील ३०० हून अधिक कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जगभरात ७००० हून अधिक ग्राहकांना सेवा देते, तसेच जगभरातील पाच मोबाइल ग्राहकांपैकी चार लोकांना जोडण्याचे काम ही कंपनी करते. कंपनीचे ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ नेटवर्क हे जगातील सर्वात मोठे नेटवर्क असेल.

कंपनी सातत्याने उत्तम कामगिरी करत असून गेल्या नऊ माहीत कंपनीने ४६४६.९८ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ७५३.३२ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या नऊ माहीच्या तुलनेत तो १११.८ टक्क्यांनी अधिक आहे. तर तिमाहीच्या नफ्यातही ५९ टक्के वाढ होऊन तो १८१ कोटींवर गेला आहे.

सध्याच्या परिस्थितीत तसेच नजीकच्या भविष्यात इंटरनेट, इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे महत्त्व वाढत राहणार आहे. टाटा कम्युनिकेशन्ससारख्या अत्यल्प बिटा असलेल्या आणि उत्तम प्रवर्तक असलेल्या कंपनीतील गुंतवणूक म्हणूनच महत्त्वाची आणि फायद्याची ठरेल. सध्या १,११० रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर थोडा महाग वाटत असला तरीही प्रत्येक मंदीत टप्प्याटप्प्याने खरेदी करावा.

टाटा कम्युनिकेशन्स लि.

(बीएसई कोड – ५००४८३)

शुक्रवारचा बंद भाव : रु. १,१०९/-

वर्षातील उच्चांक/ नीचांक : रु. १,३६८/२०५

बाजार भांडवल :

रु. ३१,६२१ कोटी

भरणा झालेले भागभांडवल : रु. २८५ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक         ७४.९९

परदेशी गुंतवणूकदार  १७.६५

बँक/ म्यु. फंड/ सरकार        १.४०

इतर/ जनता    ५.९७

संक्षिप्त विवरण

शेअर गट   : लार्ज कॅप

प्रवर्तक      : टाटा समूह

व्यवसाय क्षेत्र       :  इंटरनेट, दूरसंचार

पुस्तकी मूल्य        : रु. ३०४.४५

दर्शनी मूल्य          : रु. १०/-

गतवर्षीचा लाभांश          : ४०%

शेअर शिफारसीचे निकष

प्रति समभाग उत्पन्न :  रु. २३.७४

पी/ई गुणोत्तर :   ४६.७५

समग्र पी/ई गुणोत्तर :    २६.४

डेट इक्विटी गुणोत्तर :   ०.०४

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :        ४.१

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड :        ९.४७

बीटा :   ०.४

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2021 12:04 am

Web Title: foundation of a new digital age akp 94
Next Stories
1 विमा… सहज, सुलभ : पॉलिसीवर ‘बोनस’
2 फंडाचा ‘फंडा’… : ‘सचिन’ गतवैभव मिळवून देईल?
3 रपेट बाजाराची : भयग्रस्त सावधता!
Just Now!
X