|| अजय वाळिंबे

गुजरात स्टेट पेट्रोनेट लिमिटेडची (जीएसपीएल) स्थापना १९९८ मध्ये केली गेली, जी मुख्यत: गुजरातमधील नैसर्गिक वायूचा स्रोत पाइपलाइन नेटवर्कद्वारे वापरकत्र्यांशी जोडण्यासाठी स्थापित केली गेली. कोणताही व्यापार न करता आपल्या ग्राहकांना नैसर्गिक वायू वितरित करणारी ही एकमेव कंपनी आहे.

LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
Efforts to encroach on flamingo habitat for construction projects in Navi Mumbai
नवी मुंबईत फ्लेमिंगो अधिवासाचा गळा घोटला जातोय का? सरकारी यंत्रणाच ऱ्हासास कारणीभूत?
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना
cashew farmer marathi news, konkan farmer marathi news
काजू वायदे : कोकणातील उत्पादकांना वरदान

जीएसपीएल ही गुजरात राज्य पेट्रोलियम कॉर्पोरेशनची (जीएसपीसी) उपकंपनी आहे. गुजरातमध्ये ऊर्जा वाहतुकीची पायाभूत सुविधा विकसित करणे तसेच प्रमुख नैसर्गिक वायू पुरवठा स्रोत आणि औद्योगिक ग्राहक यांच्यात सांधे-जोड या प्रमुख उद्दिष्टांसाठी कंपनीची स्थापना झाली आहे. जीएसपीएल गेली काही वर्षे गुजरातमध्ये गॅस पाइपलाइन नेटवर्कचा सातत्याने विस्तार करीत आहे. भविष्यातील हायड्रोकार्बन अर्थव्यवस्था आणि उद्योगांना आधार देण्यासाठी तसेच पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कंपनी उत्तम कामगिरी करत आहे. गुजरातमध्ये नैसर्गिक वायू वाहतुकीसाठी उच्च-दाबाची पाइपलाइन नेटवर्क विकसित करणारी गुजरात स्टेट पेट्रोनेट एकमेव कंपनी आहे. कंपनी सध्या मध्यम ते उच्च दाब गॅस ट्रान्समिशन ग्रिड चालविते ज्यामध्ये हाजिरा ते कलोलपर्यंत अंदाजे १,१३० किलोमीटरची नैसर्गिक गॅस पाइपलाइन आहे. या खेरीज कंपनीचे मल्लवाराम-भोपाळ-भिलवाडा-विजापूर (१,५८५ किमी), मेहसाणा-भटिंडा (१,६७० किमी) आणि भटिंडा-जम्मू-श्रीनगर (४,०४० किमी) पाइपलाइन प्रकल्प चालू आहेत. खुल्या प्रवेश तत्त्वावर राज्यव्यापी गॅस ग्रिडची आखणी व अंमलबजावणी करणारे गुजरात हे पहिले राज्य आहे आणि देशाची पेट्रो राजधानी होण्याचे या राज्याचे उद्दिष्ट आहे. गुजरातमधील विविध औद्योगिक पट्टे आणि शहरांना जोडण्यासाठी उच्च-दाब पाइपलाइन टाकण्याचे कंपनीने ठरविले आहे. यामुळे राज्य सरकारने कंपनीला ‘इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट’ दर्जा प्रदान केला आहे, जी देशातील एकमेव गॅस ग्रिड आहे.

कंपनीचे २०२०-२१ साठीचे आर्थिक निकाल लवकरच जाहीर होतील. डिसेंबर २०२० अखेर संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीची कामगिरी समाधानकारक आहे. या तिमाहीत कंपनीने ५८० कोटी रुपयांच्या उलाढालीवर २४७.५१ कोटी रुपयांचा नक्त नफा मिळविला आहे. कंपनीने तसेच गुजरात राज्य पेट्रोलियम कॉर्पोरेशन या होल्डिंग कंपनीने कर्जभार कमी केला आहे त्याचा सकारात्मक परिणाम  नफ्यावर तसेच लाभांश वितरणावर होईल. आगामी कालावधीतही कंपनीकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. एक मध्यमकालीन गुंतवणूक म्हणून गुजरात स्टेट पेट्रोनेट फायद्याची खरेदी ठरू शकेल.

गुजरात स्टेट पेट्रोनेट लि.

(बीएसई कोड – ५३२७०२)

शुक्रवारचा बंद भाव : रु. २५८/-

वर्षातील उच्चांक/ नीचांक : रु. ३११/१७७

बाजार भांडवल :

रु. १४,५११ कोटी

भरणा झालेले भागभांडवल : रु. ५६४.२१ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक         ३७.६३

परदेशी गुंतवणूकदार  १७.१६

बँक/ म्यु फंड/ सरकार         ३०.०३

इतर/ जनता    १५.१८

संक्षिप्त विवरण

शेअर गट   : मिड कॅप

प्रवर्तक      : गुजरात राज्य सरकार

व्यवसाय क्षेत्र       :  गॅस पाइपलाइन

पुस्तकी मूल्य        : रु. ९७.३

दर्शनी मूल्य          : रु. १०/-

गतवर्षीचा लाभांश          : २०%

शेअर शिफारसीचे निकष

प्रति समभाग उत्पन्न :  रु. २७.९

पी/ई गुणोत्तर :   ९.२४

समग्र पी/ई गुणोत्तर :    १३.१०

डेट इक्विटी गुणोत्तर :   ०.३७

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :        ११.४

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड :        ३४.२

बीटा :   ०.६

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.