19 January 2020

News Flash

बाजाराचा तंत्र कल : लक्ष्यपूर्ती आणि सावधगिरी

गेल्या सप्ताहातील व्यवहार हे बाजाराला मिळालेली शाश्वत दिशा समजण्याची गल्लत केली जाऊ नये.

(संग्रहित छायाचित्र)

आशीष ठाकूर

गेल्या सप्ताहातील व्यवहार हे बाजाराला मिळालेली शाश्वत दिशा समजण्याची गल्लत केली जाऊ नये. मुख्यत: अत्यल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांनी नफारूपी विक्री करून फायदा पदरात पाडून घेणे श्रेयस्कर ठरेल..

अर्थमंत्र्यांनी २० सप्टेंबरला जेव्हा उद्योग क्षेत्राला कंपनी करातून भरीव सवलत दिली आणि त्यानंतर बाजारात जे तेजीचं तुफान उठलं त्यात सामान्य गुंतवणूकदारांना सहभागी होता आलं नाही. तेव्हा त्यांनी निराश न होता, त्यांना पुन्हा एकवार संधी ही सेन्सेक्सवर ३७,४०० आणि निफ्टीवर ११,१०० च्या स्तरावर असेल. त्या समयी जरूर खरेदी करा असे त्या वेळेला या स्तंभातून नमूद केलेले होते आणि हा स्तर ९ ऑक्टोबरला येऊनदेखील गेला.

वर उल्लेख केलेल्या स्तराचा आधार घेत निर्देशांकाचे वरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३९,००० आणि निफ्टीवर ११,६०० असे असेल हे त्या वेळचे भाकीत सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारी प्रत्यक्षात आले. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स ३९,२९८.३८

निफ्टी    ११,६६१.८५

आताच्या घडीला अत्यल्प मुदतीची धारणा असलेल्या गुंतवणूकदारांना (शॉर्ट टर्म ट्रेडर) सावध होण्याची गरज आहे. सेन्सेक्सवर ३९,५०० ते ३९,८०० आणि निफ्टीवर ११,७०० ते ११,८५० स्तरावरून एक संक्षिप्त घसरण अपेक्षित आहे. या घसरणीचे खालचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३८,४०० आणि निफ्टीवर ११,४०० असे असेल. तेव्हा नफारूपी विक्री करून फायदा पदरात पाडून घेणे श्रेयस्कर.

आगामी तिमाही निकालांचा वेध

१) बजाज ऑटो लिमिटेड

* तिमाही निकालाची तारीख – बुधवार, २३ ऑक्टोबर

* १८ ऑक्टोबरचा बंद भाव – ३,०८८.८० रुपये

* निकालानंतरचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – २,८०० रुपये

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २,८०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३,१०० रुपये. भविष्यात २,८०० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ३,२५० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल

ब) सर्वसाधारण निकाल : २,८०० ते ३,१०० रुपयांच्या पट्टयात वाटचाल

क) निराशादायक निकाल: २,८०० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत प्रथम २,७०० आणि त्यानंतर २,५०० रुपयांपर्यंत घसरण

२) लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो लिमिटेड

* तिमाही निकालाची तारीख – बुधवार, २३ ऑक्टोबर

* १८ ऑक्टोबरचा बंद भाव – १,४४८.०५ रुपये

* निकालानंतरचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – १,३७० रुपये

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,३७० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,५०० रुपये. भविष्यात १,३७० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास १,६०० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल

ब) सर्वसाधारण निकाल : १,३७० ते १,५०० रुपयांच्या पट्टयात वाटचाल

क) निराशादायक निकाल : १,३७० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत प्रथम १,३०० व त्यानंतर १,२०० रुपयांपर्यंत घसरण

३) एचडीएफसी अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी लि.

* तिमाही निकालाची तारीख – शुक्रवार, २५ ऑक्टोबर

* १८ ऑक्टोबरचा बंद भाव – २,८८२.२० रुपये

* निकालानंतरचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – २,७०० रुपये

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २,७०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,९०० रुपये. भविष्यात २,७०० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ३,१०० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल. ब) सर्वसाधारण निकाल : २,७०० ते २,९०० रुपयांच्या पट्टयात वाटचाल

क) निराशादायक निकाल : २,७०० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत २,४०० रुपयांपर्यंत घसरण.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

First Published on October 21, 2019 2:08 am

Web Title: greater exemption from company tax to the industry sector share market senesex nifty abn 97
Next Stories
1 अर्थचक्र : प्रकल्प गुंतवणुकीचं दुर्भिक्ष कधी संपेल?
2 नावात काय? : ‘ऑइल शॉक’
3 क.. कमॉडिटीचा : कृषी वायद्यांवर एरंडीचे संकट
Just Now!
X