भालचंद्र जोशी bhalchandra.joshi@whiteoakindia.com
बाजार आता वर आहे म्हणून पैसे काढून घेणे किंवा मागील नफा पाहून लोभ सुटल्याने नवीन गुंतवणूक करणे या दोन्ही टोकांच्या प्रतिक्रिया टाळायला हव्यात. म्हणून विवेकी गुंतवणूकदाराने बाजाराबाबत अंदाज बांधण्यापेक्षा मालमत्ता विभाजनाच्या मार्गाने जोखीम सहिष्णू सज्जता करणे कधीही चांगले.

वॉरेन बफे यांच्या एका वाक्याची उकल करावी अशी आजची परिस्थिती आहे. बफे यांनी एके ठिकाणी म्हटले आहे की, ‘बी फिअरफुल व्हेन अदर्स आर ग्रिडी.’ जेव्हा बाजारातून मिळणाऱ्या लाभाबाबत इतरांचे वर्तन लोभी माणसाप्रमाणे असते तेव्हा विवेकी गुंतवणूकदारांनी बाजाराबाबत भित्रेपणा दाखवायला हवा.. हे विधान समभागांच्या किमतीशी संबंधित आहे. जेव्हा बाजारातल्या तेजीमुळे समभागांच्या किमती वाढतात तेव्हा तेव्हा बाजारात गोंगाट वाढतो. हवशे, नवशे, गवशे ऊठसूट बाजारातून कमाई केलेल्या (आणि न केलेल्या) बढाया मारत असतात. या बढायांना बळी पडून गुंतवणूकदारांना नव्याने गुंतवणूक करण्याचा मोह होतो. म्हणूनच इतर उन्मादी अवस्थेत असतात तेव्हा सावधगिरी बाळगायला हवी.

Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद

किंमत (प्राइस) आणि मूल्य (व्हॅल्यू) यांच्यातील फरकदेखील बफे समजावून सांगतात. किंमत तुम्ही जी देता ती आणि त्या बदल्यात तुम्हाला जे मिळते ते मूल्य. मूल्यांकन खूप जास्त असल्याने भविष्यात मिळणारा नफा कमी होऊ  शकतो. प्रसंगी तोटासुद्धा होऊ  शकेल. याविषयी सविस्तर सांगायचे तर, समभागाची किंमत आणि भविष्यातील वृद्धी यांच्यात व्यस्त संबंध असतो. भविष्यातील उत्सर्जनाच्या (अर्निग) वरच्या किमतीत खरेदी केलेले समभाग घसरण्याचा किंवा प्रदीर्घ काळ दिशाहीन (साइडवेज) राहण्याची शक्यता असते. असे म्हणतात की, ‘प्राइसेस आर अर्निग स्लेव्हज’ (समभागाच्या किमती या उत्सर्जनाच्या गुलाम असतात). बाजारातील किमती या त्या कंपनीच्या व्यवसायातून मिळणाऱ्या नफ्यानुसार ठरत असतात. किमतीवर भविष्यातील रोख रक्कम (फ्री कॅश फ्लो) आणि त्यानुसार शाश्वत मूल्यानुसार ठरत असते. भविष्यातील रोख रक्कम सूट निधी व्यवस्थापक निश्चित करत असतात. एखाद्या कंपनीच्या किमतीतील दीर्घकालीन चढ-उतारानंतर किंमत शाश्वत मूल्याच्या जवळपास (इंट्रिंसिक व्हॅल्यू) स्थिरावते. या कारणासाठीच वाढीव परतावा मिळतो म्हणून अविवेकी गुंतवणूकदारांचे वर्तन लोभी माणसाप्रमाणे असते तर विवेकी गुंतवणूकदार योग्य परिस्थितीनुसार वाढीव परतावा मिळवतात. पूर्वानुमान असणे आवश्यक आहे आणि किंमत-परताव्याच्या मागे धावण्यापेक्षा आपल्या मालमत्ता विभाजनाकडे लक्ष देणे विवेकी वर्तन ठरते, असे वॉरेन बफे यांचे सांगणे आहे.

बाजारातून मिळणाऱ्या उच्च परताव्याची संधी बाजाराच्या यशाची उच्च संधी मिळण्यासाठी तुम्ही बाजाराचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला तरी मूलत: बाजार संशोधक आणि विश्लेषक जे करतात हे अंदाज ६० टक्के खरे ठरतात. उर्वरित १० टक्के अंदाज लक्ष्याच्या जवळ जातात; परंतु लक्ष्य वेध करू शकत नाहीत आणि ३० टक्के अंदाज साफ चुकतात. भविष्यात बाजाराचा कल कसा बदलेल याचा संक्षिप्त अंदाज सामान्य माणूस बांधू शकत नाही. ‘थिअरी ऑफ स्पेक्युलेशन’ (सट्टय़ाचा सिद्धांत’) या नावाने फ्रेंच गणितज्ञ लुई बॅचेलियरने त्यांच्या पीएच.डी.साठी प्रबंध लिहिला. हा सिद्धांत पुढे ‘रँडम वॉक थिअरी’ या नावाने ओळखला जाऊ  लागला. समभागांचे बाजारभाव स्वयंभू असतात आणि स्वत:चा मार्ग स्वत: शोधत मार्गक्रमण करीत असतात. हा सिद्धांत मागील १२० वर्षांत कोणीही खोडून काढू शकलेले नाही. असे असताना बाजार आता वर आहे म्हणून पैसे काढून घेणे किंवा मागील नफा पाहून लोभ सुटल्याने नवीन गुंतवणूक करणे या दोन्ही टोकांच्या प्रतिक्रिया टाळायला हव्यात. म्हणून विवेकी गुंतवणूकदाराने बाजाराबाबत अंदाज बांधण्यापेक्षा मालमत्ता विभाजनाच्या मार्गाने जोखीम सहिष्णू सज्जता करणे कधीही चांगले.

मालमत्ता विभाजन हा संपत्तिनिर्मितीचा कालातीत सुगम मार्ग आहे. बदलत्या मूल्यांकनानुसार मालमत्तेचे संतुलन न करणे हे भविष्यात धोकादायक ठरू शकते.

तुमचा गुंतवणूक पोर्टफोलिओ तुमच्या वित्तीय ध्येयाची पूर्तता करण्यासाठी तुमच्या गुंतवणूक सल्लागाराने तयार केलेला असतो. या पोर्टफोलिओचे संतुलन करण्यासाठी मालमत्ता विभाजन हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. विशिष्ट फंडच केवळ नव्हेत तर, योग्य मालमत्ता विभाजन तुम्हाला तुमच्या वित्तीय ध्येयांकडे घेऊन जात असते. वित्तीय ध्येय साध्य करण्यासाठी गुंतवणुकीत नकारात्मक सहसंबंध असलेल्या मालमत्तांचा समावेश करायला हवा. या मालमत्तांचे प्रमाण जोखीम सहिष्णुता, उपलब्ध गुंतवणूकयोग्य रोकड, वित्तीय ध्येय साध्य करण्यास उपलब्ध कालावधी यानुसार ठरत असते. विशिष्ट फंडाची निवड करण्यापेक्षा विवेकी गुंतवणूकदारांनी पोर्टफोलिओमध्ये समभाग, रोखे, रोख रक्कम, परदेशी मालमत्ता आणि मौल्यवान धातू यांचे प्रमाण निश्चित करायला हवे. मालमत्ता विभाजन ही गतिशील (डायनॅमिक) आणि सातत्य असलेली प्रक्रिया आहे. अनुभवी आणि कुशल मार्गदर्शक गुंतवणूकदाराला मालमत्ता विभाजनाच्या मार्गाने वित्तीय लक्ष्यापर्यंत नक्कीच नेऊ शकेल, हा विश्वास बाळगा.

लेखक व्हाइट ओक कॅपिटल  मॅनेजमेंटचे कार्यकारी संचालक व मुख्य परिचालन अधिकारी