News Flash

तिने खूप शिकावे म्हणून..

२ मार्च २०१६ रोजी एचडीएफसी चिल्ड्रन्स गिफ्ट फंड या योजनेने १५ वष्रे पूर्ण केली.

 

एचडीएफसी चिल्ड्रन्स गिफ्ट फंड

जसे भारतातील २४ विमा कंपन्यांपकी प्रत्येक विमा कंपनीची मुलांच्या भविष्यासाठी घेतल्या जाणाऱ्या विमा योजना आहेत तशाच प्रकारे जवळजवळ प्रत्येक म्युच्युअल फंडाच्या या प्रकारच्या योजना आहेत. पैकी एका योजनेची ही ओळख..

मागील आठवडय़ात ‘लोकसत्ता अर्थसत्ता’ (२२ मार्च) पानावर ‘मुलांच्या करिअरसाठी अपुरी आíथक तरतूद’ या मथळ्याची एक बातमी प्रसिद्ध झाली होती. देशातील सात शहरांतून ११,३०० पालकांच्या सर्वेक्षणातून काढलेल्या निष्कर्षांचा गोषवारा देणारी ही बातमी होती. ‘‘पालकवर्ग मुलांच्या स्वप्नांना आíथक पंख लावण्याच्या बाबतीत अजूनही मागे पडत आहेत. सर्वेक्षणात असेही दिसून आले आहे, की स्वयंरोजगार मिळवणाऱ्या पालकांच्या तुलनेत पगारदार पालकवर्ग आíथक नियोजनाच्या बाबतीत जास्त जागरूक आहे. भारतातील मुले मोठी स्वप्ने पाहतात, त्यांना करिअरचे वेगवेगळे पर्याय पडताळून पाहायचे आहेत, मात्र त्या तुलनेत पालकांची विशेष तयारी झालेली नाही. मुलांच्या शिक्षणासाठी पसे बचत करण्यास त्यांचे प्राधान्य असले, तरी प्रत्यक्ष बचतीचे नियोजन व्यवस्थित केलेले नसते’’ असे या बातमीत म्हटले होते. अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडाने चार-पाच महिन्यांपूर्वी अ‍ॅक्सिस चिल्ड्रन्स गिफ्ट फंड ही योजना गुंतवणूकदारांसाठी खुली केली. ही योजना सादर करण्यापूर्वी या गटातील अर्थात मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक म्हणून विकत घेतल्या जाणाऱ्या योजनांचा अभ्यास केला. बाजारपेठेचा विविध अंगांनी केलेल्या या अभ्यासाअंती काढलेले निष्कर्ष या योजनेच्या सादारीकरणाच्या वेळी एका दक्श्राव्य माध्यमातून सादर केले. सर्वच निष्कर्ष पटणारे नसले तरी शिक्षण क्षेत्रातील महागाईचा दर सर्वोच्च असल्याचा निष्कर्ष पटणारा होता. पालकांची मुलांच्या शिक्षणासाठी केलेली तरतूद कायम अपुरी पडते. कारण शिक्षण क्षेत्रातील खर्च हा १४ ते १६ % दराने वाढत असल्याचे एका अभ्यासात आढळून आले आहे. महागाईचा दर काढण्याचे तीन घटक आहेत उत्पादन, सेवा व शेती. यापकी उत्पादन क्षेत्रात महागाईचा दर नकारात्मक असून सेवा क्षेत्राचा महागाई दर सर्वाधिक आहे. सेवा क्षेत्रातील सर्वोच्च दर शिक्षण व आरोग्य क्षेत्रात असल्याची सरकारी आकडेवारी सांगते.

मुलांच्या भविष्यासाठी घेतल्या जाणाऱ्या योजनांचा परतावा त्या क्षेत्रातील महागाईच्या दराहून अधिक असल्यास बचतीची क्रयशक्ती टिकवून ठेवता येईल. पीपीएफ, सुकन्या समृद्धीसारख्या निश्चित उत्पन्न देणाऱ्या योजना ८-८.५ % टक्के व रोखे गुंतवणूक करणाऱ्या पारंपरिक ‘मनी बॅक’ विमा योजना सर्वात कमी म्हणजे ४-६ % परतावा देत असल्याने वित्तीय उद्दिष्ट गाठण्यास कुचकामी ठरतात.

गुंतवणूक सेवा देणाऱ्या बाजारपेठेत मुलांच्या शिक्षणासाठी केल्या जाणाऱ्या गुंतवणुकांचे प्रमाण दुसऱ्या क्रमांकावर आहे. विमा कंपन्यांच्या विमा हप्त्यापकी सर्वाधिक हप्ते हे निवृत्तीपश्चात चरितार्थाचे साधन म्हणून घेतल्या गेलेल्या विमा योजनांचे असून दुसऱ्या क्रमांकावर मुलांच्या भविष्यासाठी घेतल्या गेलेल्या विमा योजनांचे आहेत. मुलांच्या भविष्यासाठी केलेल्या गुंतवणुकीची बाजारपेठ मागील दहा वर्षांत सरासरी १४ % दराने वाढली असून २०२० पर्यंत ही बाजारपेठ वार्षकि १२,००० कोटींची असेल असा ग्राहकांचा कल जाणून घेणाऱ्या कंपन्यांनी आपल्या अहवालात व्यक्त केला आहे. जसे भारतातील २४ विमा कंपन्यांपकी प्रत्येक विमा कंपनीची मुलांच्या भविष्यासाठी घेतल्या जाणाऱ्या विमा योजना आहेत, तशाच प्रकारे जवळजवळ प्रत्येक म्युच्युअल फंडाच्या या प्रकारच्या योजना आहेत. रोखे गुंतवणूक करणाऱ्या योजना या प्रामुख्याने विमा कंपन्यांच्या योजनांशी स्पर्धा करतात. परंतु म्युच्युअल फंडाच्या समभाग गुंतवणूक करणाऱ्या योजनासुद्धा आहेत. यापकी प्रमुख योजना म्हणजे, एचडीएफसी चिल्ड्रन्स गिफ्ट फंड, आयसीआयसीआय प्रु. चाइल्ड केअर गिफ्ट प्लान, टेम्पलटन इंडिया चिल्ड्रन अ‍ॅसेट प्लान, यूटीआय चिल्ड्रन्स केअर प्लान अ‍ॅडव्हांटेज फंड होय.

२ मार्च २०१६ रोजी एचडीएफसी चिल्ड्रन्स गिफ्ट फंड या योजनेने १५ वष्रे पूर्ण केली. या योजनेचे इन्व्हेस्टमेंट प्लान व सेिव्हग्ज प्लान असे दोन विकल्प आहेत. समभाग गुंतवणूक करणाऱ्या इन्व्हेस्टमेंट प्लान मध्ये ८० ते १०० टक्के गुंतवणूक समभागात तर सेिव्हगज प्लानमध्ये ८० ते १०० टक्के गुंतवणूक रोख्यात केली जाते. चिराग सेटलवाड हे इन्व्हेस्टमेंट प्लानचे निधी व्यवस्थापक असून राकेश व्यास सेिव्हग्ज प्लानचे निधी व्यवस्थापक आहेत. इन्व्हेस्टमेंट प्लानमध्ये फंडाच्या सुरुवातीपासून दरमहा १००० एसआयपी करणाऱ्या गुंतवणूक करणाऱ्याने १,८०,०००/- गुंतविले असतील तर या गुंतवणुकीचे २३ मार्च रोजीच्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार बाजारमूल्य ६३६,७८७.७८ झाले असेल. या गुंतवणुकीच्या परताव्याचा दर १६.३२ % इतका आहे.

२९ फेब्रुवारीच्या गुंतवणूक विवरणानुसार फंडाने २५.५०% निधी रोख्यात, ७१.३९ % समभागात व ३.११ % रोकड सममूल्य साधनात गुंतविला आहे. एकूण गुंतवणुकीच्या पहिल्या पाच गुंतवणुकांची टक्केवारी २२.९६ % तर पहिल्या दहा गुंतवणुकांची टक्केवारी ३७.११ % इतकी आहे. ही टक्केवारी हा फंड जोखीम स्वीकारून परतावा मिळवत नसल्याचे सूचित करते. या फंड घराण्याच्या अन्य योजनांप्रमाणेच तेजीत अव्वल परतावा देणारा हा फंड मंदीत मुदलाची सुरक्षितता राखण्यास यशस्वी ठरलेला नसला तरी दीर्घकालीन परताव्याचा विचार केल्यास बॅलन्स फंडाच्या गटात या फंडाचा परतावा नक्कीच समाधानकारक आहे. यासाठी मुलांच्या शिक्षणासाठी गुंतवणुकीसाठी योजना निवडताना अतिशय काळजी घेणे गरजेचे आहे. या फंडाचा शार्प रेशो ०.८० असल्याने रिस्क अ‍ॅडजस्टेड रिटर्न्‍स अर्थात जोखीमसंलग्न परताव्याच्या तुलनेत हा फंड अन्य फंडांच्या तुलनेत प्रथम क्रमांकावर आहे. फंडाचा एक वर्षांचा चलत परतावा १५.२७ % आहे. एकदा गुंतवणूक केल्यानंतर ३ वष्रे गुंतवणूक काढून घेता येत नाही, त्यानंतर गुंतवणूक केली आहे अशा मुलाच्या अथवा मुलीच्या वयाची १८ वष्रे पूर्ण केल्यानंतर रक्कम उपलब्ध होते. एका वर्षांच्या आत काढल्यास 3३ % दोन वर्षांच्या आत काढल्यास २ % व तीन वष्रे पूर्ण होण्याच्या आत काढल्यास १ % निर्गमन शुल्क लागू होते. तीन वर्षांनंतर काढल्यास काहीही शुल्क द्यावे लागत नाही. म्हणून गुंतवणूकदारांनी पशाची गरज असलेल्या वर्षांच्या आधी तीन वष्रे एसआयपी थांबविणे गरजेचे आहे. ही एसआयपी थांबताच हा निधी एचडीएफसी चिल्ड्रन्स गिफ्ट फंड सेिव्हगज प्लान अर्थात रोखे गुंतवणुकीत वळता करणे हिताचे असते.

निश्चित उत्पन्न देणाऱ्या योजनांपेक्षा ‘एचडीएफसी चिल्ड्रन्स गिफ्ट फंड’ ही योजना समभाग गुंतवणूक करीत असल्याने अधिक धोकादायक आहे हे लक्षात घेणे जरुरीचे आहे. ‘एचडीएफसी चिल्ड्रन्स गिफ्ट फंडा’त केलेल्या गुंतवणुकीवर विमा योजना, पीपीएफ व सुकन्या समृद्धीप्रमाणे कर वजावट मिळत नाही. पीपीएफ व सुकन्या समृद्धी या योजनांवर देय असलेल्या व्याजाचे कमी झालेले दर येत्या नवीन वर्षांत येत्या शुक्रवारपासून लागू होतील. कमी झालेले व्याज दर व शिक्षण क्षेत्रात असलेला सर्वोच्च महागाईचा दर लक्षात घेता बाजाराशी संबंधित गुंतवणुकीला नाके मुरडली तरी विद्यमान परिस्थितीत बाजारातील रोखे व समभाग गुंतवणुकीला (बाजारसंलग्न परतावा देणाऱ्या) योजनांना पर्याय नाही. म्हणूनच स्थापनेपासून १८.२२ % परतावा देणारा एचडीएफसी चिल्ड्रन्स गिफ्ट फंड (इन्व्हेस्टमेंट प्लान) व ११.३४ % परतावा देणारा (सेिव्हग प्लान) यापकी एकाचा जोखीम स्वीकारण्याच्या पातळीनुसार समावेश आपल्या गुंतवणुकीत करण्याचा विचार आपल्या गुंतवणूक सल्लागाराच्या मदतीने करणे गरजेचे आहे. मागील परताव्याचा दर हा भविष्यातील परताव्याची खात्री देत नाही हे गुंतवणूक करण्यापूर्वी ध्यानात घ्यावे. या फंडात गुंतवणूक करणाऱ्याला कमाल १० लाखांपर्यंतचे विमा संरक्षण नि:शुल्क उपलब्ध आहे.

shreeyachebaba@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2016 2:10 am

Web Title: hdfc children gift fund 3
टॅग : Hdfc
Next Stories
1 आरोग्यावरील वाढीव तरतुदीची लाभार्थी
2 स्वशिक्षणासाठी केलेला खर्च ‘कलम ८०सी’मधून वजावटीस अपात्र
3 आलेखांचे प्रमाण
Just Now!
X