13 August 2020

News Flash

नावात काय : हेजिंग

वित्त विश्वात वापरल्या जाणाऱ्या व्यूहरचनेमध्ये हेजिंग ही महत्त्वाची संकल्पना आहे.

(संग्रहित छायाचित्र)

कौस्तुभ जोशी

गुंतवणूक आणि जोखीम यांचा घनिष्ठ संबंध असतो. किंबहुना अशी कोणतीही गुंतवणूक नाही ज्यात जोखीम संभवत नाही. जितकी जोखीम कमी तितका परतावा कमी आणि जितकी जोखीम जास्त तेवढा परतावाही जास्त असे सर्वसाधारण गणित आहे. अशा वेळी जोखीम टाळता येत नाही. मात्र, कमी करण्यासाठी जी रणनीती वापरली जाते त्याला हेजिंग असे म्हणता येईल. वित्त विश्वात वापरल्या जाणाऱ्या व्यूहरचनेमध्ये हेजिंग ही महत्त्वाची संकल्पना आहे.

‘हेज’ या शब्दाचा अर्थ जोखमीस बगल देण्याचा प्रयत्न, म्हणजेच जोखीम शंभर टक्के टाळता येणार नाही, पण जमले तर ती कमी करण्याचा प्रयत्न करायचा. शेअर्स, बॉण्ड, कमोडिटी या सर्वामध्ये किमतीतील चढ-उतार कसे होतील निश्चितपणे वर्तवता येत नाही. अशा वेळी हेजिंग रणनीती प्रभावी ठरते. फॉरवर्ड कॉण्ट्रॅक्ट, ऑप्शन वापरून जोखीम कमी करता येते.

समजा, शेअर बाजारातील गुंतवणूक धोक्याची वाटत असेल तर संभाव्य धोका कमी करण्यासाठी ट्रेडर्स सोन्यामध्ये गुंतवणूक करतात. आपण असेही अनुभवले असेल की आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर भडकले, डॉलरच्या दरामध्ये अनियमितता आली की सोन्यातील गुंतवणुकीकडे वाढता कल दिसतो. म्हणजेच अस्थिरता असेपर्यंत कमी का होईना परतावा देणाऱ्या सोन्यामध्ये हेजिंग केले जाते.

शेअर बाजारात घसघशीत परतावा देणाऱ्या कंपन्या म्हणावी तशी मूल्यवाढ देऊ शकत नाहीत म्हणून लाभांश देणाऱ्या कंपन्यांमध्ये किंवा ज्यांचा परतावा कमी आहे पण लाभांश मिळण्याची शक्यता खूपच जास्त आहे अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक वळवली जाते हेही एक प्रकारचे हेजिंग म्हणता येईल.

एखाद्या शेअरची आताची किंमत आणि त्यात होणारे बदल व त्याचा भविष्यकालीन अंदाज यावरून हेजिंगची रणनीती ठरवता येते. अशा प्रकारच्या प्रॉडक्टला डेरिव्हेटिव प्रॉडक्ट असे म्हणतात. ‘टू डिराईव्ह ‘म्हणजेच शोधून काढणे. अर्थात आताची परिस्थिती आणि भविष्यात काय होईल याचा आपण बांधलेला अंदाज यावरून किमतीचा अंदाज वर्तवायचा. एखाद्या शेअरची किंमत भविष्यातील आपण वर्तविलेल्या किमतीपेक्षा कमी असेल तर डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये पोझिशन घेऊन आपल्याला जोखीम कमी करता येऊ शकते. फ्युचर्स आणि ऑप्शन या दोन वेगळ्या पद्धती डेरिव्हेटिव्हमध्ये येतात.

आंतरराष्ट्रीय व्यापारातसुद्धा हेजिंगचा मोठय़ा प्रमाणावर वापर होतो. उदाहरणार्थ, एका व्यापाऱ्याने परदेशातून वस्तू आयात केली असेल व त्याचे पैसे तीन टप्प्यांत द्यायचे असतील आणि पुढच्या सहा महिन्यांत डॉलरचा भाव वाढणार असेल तर व्यापारी आगाऊ पोझिशन घेऊन डॉलरच्या किमतीत होणारी वाढ आणि त्यामुळे होणारे नुकसान मर्यादित करू शकतो.

लेखक वित्तीय नियोजनकार व अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत.

joshikd28@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2020 4:18 am

Web Title: hedging investment management strategy abn 97
Next Stories
1 बाजाराचा तंत्र कल : ..ओळखून आहे तुझे बहाणे!
2 अर्थ वल्लभ : अबोल हा पारिजात आहे!
3 क.. कमॉडिटीचा : आखातातील संघर्षांला चीन-अमेरिका ‘तहा’ची किनार
Just Now!
X