भारतात नतिक मूल्यांवर आधारित गुंतवणूक हा विचार सुस्पष्ट नाही. विकसित राष्ट्रांत विविध धर्माच्या नियमांनुसार चालवल्या जाणाऱ्या गुंतवणूक योजना अस्तित्वात आहेत. यापकी इस्लामिक फंड प्रसिद्ध आहेत. शिवाय कॅथलिक ख्रिश्चन फंड, प्रॉटेस्टंट ख्रिश्चन फंड, ज्यू फंड यांसारख्या योजनांत दरवर्षी वाढ होत असते. भारतात टाटा म्युच्युअल फंड, टॉरस म्युच्युअल फंड यांचे शरिया फंड आहेत आणि एसबीआय म्युच्युअल फंडाचीही योजना येत आहे. मग िहदू नतिक मूल्यां’वर आधारित फंडही  का असू नये असा हा एक प्रतिवाद..
काही महिन्यांपूर्वी दक्षिण भारतातील एक प्रख्यात ‘बाबा’ स्वर्गवासी झाले. त्यांच्या पश्चात त्यांच्या हवेलीच्या तळघरातील काही खोल्यांमध्ये सोने, चांदी फार मोठय़ा प्रमाणात साठवून ठेवल्याचे ‘सत्य’ बाहेर आले. तसेच काही दिवसांपूर्वी पद्मनाभ मंदिरात, तळघरात असलेली पाच लाख कोटी (म्हणजे कितीवर किती शून्ये?) रुपयांची सोने-चांदी स्वरूपातील मालमत्ता जाहीर झाली. ही सर्व रक्कम भाविकांनी दान स्वरूपात दिलेली आहे. भारतात अशा खूप संस्था आहेत, ज्यांच्याजवळ प्रचंड प्रमाणात निधी उपलब्ध आहे. तो सामाजिक कार्यासाठी संपूर्णपणे वापरला न जाता कुजत राहतो व जो कोणत्याही स्वरूपात चलनात येत नाही. जो फार थोडय़ा प्रमाणात येतो तो बँकांमध्ये ठेवी स्वरूपात राहतो.
याशिवाय प्रत्येक समाजाचे/ज्ञाती संस्थांचे ट्रस्ट आहेत. यांची सर्व शिल्लक पुंजी बँकांमध्ये ठेव स्वरूपात असते. कोणी दानशूर व्यक्ती दहा-पंधरा हजार रुपये देणगी देऊन त्याच्या व्याजातून काही रक्कम बक्षीस स्वरूपात हुशार मुलांना देण्यासाठी ज्ञाती संस्थांना देतात.
काळानुरूप त्या व्याजातून मिळणारी रक्कम तुटपुंजी होते. कारण मुदलात वाढ होत नाही. आज नोबेल पारितोषिकाची रक्कम काळानुरूप वाढली आहे, कारण त्यांचा ‘कॉर्पस फंड’ वाढतो आहे.
सामाजिक संस्थांनी गुंतवणूक कोठे, कशी करावी याबाबतची मार्गदर्शक सूत्रे सर्व राज्य सरकारांनी (पन्नास, साठ वर्षांपूर्वी) कायदा बनवताना तयार केली आहेत. त्यात आजपर्यंत बदल झालेले नाहीत.
व्यक्तिगत गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन हे आíथक नियोजनकार (सर्टफिाइड फायनान्शियल प्लॅनर) करतो. तर औद्योगिक संस्थांसाठी सनदी लेखापाल किंवा चार्टर्ड फायनान्शियल अ‍ॅनालिस्ट किंवा एम.बी.ए. गुंतवणुकांचे नियोजन करतात, परंतु धर्मादाय संस्थांसाठी असा कोणी स्वतंत्र माहीतगार नसतात. मग ‘त्यातल्या त्यात माहीतगार’ या न्यायाने त्या संस्थेचा सनदी लेखापाल, ट्रस्टसंबंधी नियमांवर आधारित योजना सुचवतो.
आज इतक्या वर्षांनंतर काळानुरूप या नियमांत बदल करणे आवश्यक आहे. यासाठी वेगळा विचार मांडणे आवश्यक आहे. मग तो विचार कोणी तरी का, मीच का नाही, या निर्णयाप्रत आलो. ‘िहदू एथिकल फंड’ ही संकल्पना विकसित करावी असे वाटले. हा विचार आयआयटी पवई मॅनेजमेंट स्कूलच्या प्राध्यापक वरदराज बापट यांच्याजवळ मांडला. त्यांनी श्री. एस. गुरुमूर्ती यांच्याशी चर्चा केली. व ‘िहदू एथिकल फंड’ हा विचार विकसित करण्याचा निर्णय झाला.

विकसित राष्ट्रांत विविध धर्माच्या नियमांनुसार चालवल्या जाणाऱ्या योजना (म्युच्युअल फंड किंवा पोर्टफोलिओ मॅनेजमेंट स्किम्स्) अस्तित्वात आहेत. यापकी इस्लामिक फंड (शरिया कम्प्लायन्ट) हे प्रसिद्ध आहेत. भारतात टाटा म्युच्युअल फंड, टॉरस म्युच्युअल फंड यांचे शरिया फंड आहेत आणि एसबीआय म्युच्युअल फंडाचीही योजना येत आहे. टाटा फंडासाठी धर्मादाय आयुक्तांनी गुंतवणुकीसाठी मान्यता दिलेली आहे. परदेशात कॅथलिक ख्रिश्चन फंड, प्रॉटेस्टंट ख्रिश्चन फंड, ज्यू फंड यांसारख्या २५० योजना २०१० सालापर्यंत अस्तित्वात होत्या. त्यात दरवर्षी वाढ होत असते.
भारतात नतिक मूल्यांवर आधारित गुंतवणूक हा विचार सुस्पष्ट नाही. पर्यावरण (Environment), सामाजिक (Social), नियमन (Governance) नामांकने सुस्पष्ट नाहीत. २००८ साली क्रिसिलने या मानांकनावर आधारित एस अ‍ॅण्ड पी ईएसजी इंडेक्स तयार केला. यासाठी राष्ट्रीय शेअर बाजारात व्यवहार होणाऱ्या ५०० मोठय़ा कंपन्या निवडण्यात आल्या. दोन टप्प्यांत या कंपन्यांचे विश्लेषण केले जाते. पहिल्या टप्प्यांत पर्यावरण व सामाजिक मूल्यांवर व दुसऱ्या टप्प्यात आदर्श औद्योगिक नियमन मानांकने तपासली जातात. सर्वोत्कृष्ट ५० कंपन्या दरवर्षी निवडल्या जातात.
av-02
‘िहदू नतिक मूल्यांवर आधारित फंड’ हा िहदू जीवन-विचार, मूल्ये व तत्त्वज्ञान यावर आधारित गुंतवणूकयोग्य योजनांवर आधारित असेल. आसेतुहिमाचल सर्वत्र मान्य होईल अशा नियमांवर आधारित असेल. सर्वसमावेशक असेल. िहदू धर्म ‘वसुधव कुटुंबकम्’ या संकल्पनेस मान्यता देतो. शांततेचा पुरस्कार करतो. त्यामुळे युद्धसामग्री उत्पादन कंपन्यांमधील गुंतवणूक ‘वज्र्य’ समजली जाईल. कदाचित हे आजच्या काळात विसंगत वाटेल. निसर्ग संवर्धन, सामाजिक जबाबदारी यावर भर दिला जाईल. िहदू धर्मात दोन विरुद्ध विचारांना मान्यता असते म्हणजे जैनपंथात कांदा, लसूणसुद्धा खाणे वज्र्य मानले जाते तर बाजूच्याच राज्यात गणपतीमध्ये गौरीला मांसाहारी नवेद्य दाखवला जातो. अशा सर्व विरोधाभासाचा विचार करून नियमावली केली जाईल.
नियमावली तीन पद्धतीत असेल –
१. प्रतिबंधित/वज्र्य वर्गवारी – तंबाखूजन्य उत्पादने, मद्य, जुगार, गोहत्या करणारे कत्तलखाने इ. क्षेत्रांत गुंतवणूक असणाऱ्या आस्थापनांत गुंतवणूक वज्र्य समजण्यात येईल.
२. मान्यताप्राप्त/योग्य – सामाजिक विकास, माणसाचे जीवनमान उंचावण्यासाठी कार्यरत संस्था, निसर्ग संवर्धन, कृषी उद्योग, सौरऊर्जा, सॉफ्टवेअर, हॉटेल, शैक्षणिक, वित्तीयसेवा इ.
३. काही प्रमाणात मान्यता – या क्षेत्रात गुंतवणूक पूर्णपणे वज्र्य न समजता काही प्रमाणात मान्य केली जाईल. उदा. प्राण्यांचा संशोधनासाठी वापर.
सर्व धार्मिक फंडासाठी मार्गदर्शक तत्त्वे आखणारे नियामक मंडळ असते. त्याप्रमाणे ते िहदू फंडासाठी असेल. एखाद्या गुंतवणुकीबाबत संभ्रम निर्माण झाल्यास मंडळ मार्गदर्शन करेल. गुंतवणूक सरकारी कर्जरोखे, कंपन्या, आस्थापनांचे रोखे, शेअर्स, ठेवी इ. कोणत्याही स्वरूपात असू शकेल.
गुंतवणुकीसाठी पर्याय –
१. म्युच्युअल फंड – यामध्ये इक्विटी फंड, रोखे (डेट) फंड किंवा समतोल (बॅलन्स) फंड प्रकारात गुंतवणूक करता येईल.
२. पोर्टफोलिओ मॅनेजमेंट स्कीम – तुमचा पोर्टफोलिओ बनवताना या विचारसरणीनुसार बनवला जाईल.
३. सामाजिक किंवा ज्ञाती संस्थांच्या योजना – काही ज्ञाती संस्थांमार्फत उद्योजकास बीज भांडवल किंवा कर्ज स्वरूपात मदत केली जाते. घरासाठी, शिक्षणासाठी कर्ज दिले जाते. त्या वेळी िहदू विचारसरणीनुसार रक्कम देता येईल.
वाचकहो, ही संकल्पना नव्याने विकसित होत आहे. तुमची मते, सूचना जरूर कळवा. पुढील टप्प्यात त्याचा विचार केला जाईल.
शेवटी सर्वात महत्त्वाचे, पद्मनाभ मंदिरातील पाच लाख कोटी रुपयांचे सोने केंद्र सरकारला दिल्यास देशाचे परकीय चलनातील खूप कर्ज कमी होईल आणि केंद्र सरकारने पद्मनाभ मंदिरास त्या बदल्यात दिलेली रक्कम चलनात आल्यास समाजाचा किती तरी फायदा होईल. ही केवळ जर-तरची कथा होऊ नये हीच त्या पद्मनाभाचरणी प्रार्थना.
(लेखक ‘सेबी’कडे नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार)
‘अर्थ वृत्तान्त’संबंधी अभिप्राय/प्रतिक्रिया कळवा: arthmanas@expressindia.com