av-06भारताचा सांस्कृतिक वारसा म्हणून म्हणा ‘िहदू अविभक्त कुटुंबा’ला कायद्याने एक स्वतंत्र अधिष्ठान दिले गेले आहे.
प्राप्तिकर कायद्याच्या तरतुदीनुसार, वैयक्तिक करदात्याप्रमाणे िहदू अविभक्त कुटुंब (एचयूएफ) एक स्वतंत्र करदाता म्हणून अस्तित्वात आहे. वैयक्तिक करदात्याला लागू होणाऱ्या बऱ्याच तरतुदी एचयूएफसाठी सुद्धा लागू होतात. त्यामुळे कर नियोजन करताना िहदू अविभक्त कुटुंबाचा विचार करणे फायद्याचे ठरते. ते कसे हे समजावून देणारे विवेचन..
भारताच्या संस्कृतीत प्राचीन काळापासून एकत्र कुटुंब पध्दती अस्तित्वात आहे. देशात िहदू धर्मीय लोकसंख्येची बहुसंख्या आहे. अनेक पिढय़ा एकाच घरात एकत्र राहतात, संपत्ती वापरतात, एकत्र धंदा-व्यवसाय करतात, शेती करतात. त्यामुळे भारतात ‘िहदू अविभक्त कुटुंबा’ला कायद्याने एक स्वतंत्र अधिष्ठान दिले गेले आहे. प्राप्तिकर कायद्याच्या तरतुदीनुसार,  वैयक्तिक करदात्याप्रमाणे िहदू अविभक्त कुटुंब (एचयूएफ-ऌवा) एक स्वतंत्र करदाता म्हणून  अस्तित्वात आहे. वैयक्तिक करदात्याला लागू होणाऱ्या बऱ्याच तरतुदी एचयूएफसाठी सुद्धा लागू होतात. त्यामुळे कर नियोजन करताना िहदू अविभक्त कुटुंबाचा विचार करणे फायद्याचे ठरते. ते कसे हे समजावून घेऊ या.
िहदू अविभक्त कुटुंब काय आहे?
प्राप्तिकर कायद्यात एचयूएफची व्याख्या दिलेली नाही. िहदू कायद्याप्रमाणे िहदू अविभक्त कुटुंबामध्ये एकाच पूर्वजांच्या वंशातील सभासदांचा समावेश होतो. यामध्ये मुलांचा त्यांच्या बायकांचा, अविवाहित मुलींचा समावेश होतो. मुलगी लग्नानंतर वडिलांच्या एचयूएफमधून बाहेर पडून तिच्या नवऱ्याच्या एचयूएफमध्ये सामील होते. सन २००५ मध्ये झालेल्या सुधारणेनुसार मुलगी लग्न झाल्यानंतर वडिलांच्या एचयूएफमध्ये सहदायिकी (उस्र्ं१ूील्ली१) राहू शकते याच बरोबर ती नवऱ्याच्या एचयूएफमध्ये सुद्धा सभासद असू शकते. एचयूएफमध्ये सभासद आणि सहदायिकी असतात. या मध्ये फरक असा की सहदायिकी हा संपत्तीमधील वाटा मागू शकतो तर सभासदांना संपत्तीतून वाटा मागता येत नाही तो त्यांना सहदायिकी करवी मागता येतो. िहदू कायद्याप्रमाणे भारतात दोन प्रकारचे नियमशास्त्र आहेत. एक दयाभाग आणि दुसरे मिताक्षरा. दयाभाग हे नियमशास्त्र पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये लागू होते आणि मिताक्षरा भारतातील इतर राज्यात लागू होते. दयाभाग नियमशास्त्राप्रमाणे वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाला वडिलोपार्जित संपत्तीचा हक्क मिळतो. अशा वडिलोपार्जति संपत्तीचा हक्क हा पूर्णपणे वडिलांकडे असतो आणि ही वडिलोपार्जति संपत्ती आणि त्यातून मिळणारे उत्पन्न हे वडिलांचे वैयक्तिक  उत्पन्न समजले जाते, एचयूएफचे नाही. मिताक्षरा नियमशास्त्राप्रमाणे मुलाला जन्मानंतर वडिलोपार्जति संपत्तीमध्ये समान हक्क प्राप्त होतो. फक्त केरळ राज्यात एचयूएफ ही संकल्पना अस्तित्वात नाही. प्राप्तिकर कायद्यानुसार जैन आणि शीख कुटुंब सुद्धा एचयूएफ म्हणून गणले जातात.
एचयूएफ कसे अस्तित्वात येते?
एचयूएफहे दोन व्यक्तींमध्ये करार करून अस्तित्वात येत नाही. अविवाहित पुरुष हा एकटा एचयूएफ होऊ शकत नाही. एचयूएफ हे लग्न झाल्यानंतर आपोआप तयार होते. लग्न झाल्यानंतर वडिलांच्या एचयूएफमधील हिस्सा घेऊन तो त्याच्या एचयूएफमध्ये ठेऊ शकतो. एचयूएफमध्ये सभासद होण्यासाठी कुटुंबामध्ये जन्म घेणे गरजेचे असते. जर मुलाला दत्तक घेतले तर ते मूल एचयूएफचा सभासद होते. लग्नानंतर पत्नी नवऱ्याच्या एचयूएफमध्ये सभासद होते. जर एचयूएफमध्ये दोन सभासद असतील आणि एकाचा मृत्यू झाला तर एचयूएफ संपुष्टात येते आणि साहजिकच संपत्ती आणि उत्पन्न हे वैयक्तिक होते.
एचयूएफ आणि निवासी दर्जा
एचयूएफचे नियंत्रण आणि व्यवस्थापन जर भारतात असेल तर एचयूएफचा दर्जा निवासी आणि जर नियंत्रण आणि व्यवस्थापन भारताबाहेर असेल तर एचयूएफचा दर्जा अनिवासी भारतीय असतो. एचयूएफचा कर्ता जर अनिवासी भारतीय असेल आणि भारतात मालमत्ता असेल आणि याचे नियंत्रण भारतातून त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांकडून होत असेल तर एचयूएफ निवासी भारतीय असते.
एचयूएफएक स्वतंत्र अस्तित्व
प्राप्तिकर कायद्यात आणि संपत्ती कर कायद्यात (जो आता रद्द करण्यात आला आहे) एचयूएफला एक स्वतंत्र अस्तित्व आहे. त्यामुळे तो एक स्वतंत्र करदाता समजला जातो. आणि प्राप्तिकर कायद्यातील सवलतींचा लाभ घेता येतो. जसे एचयूएफचे उत्पन्न २,५०,००० रुपयांपर्यंत करमुक्त आहे. शिवाय कलम ८० सी ते ८० यू मधील ठरावीक वजावटी सुद्धा मिळू शकतात. एचयूएफसाठी स्वतंत्र पॅन (पर्मनन्ट अकाऊंट नंबर) घ्यावा लागतो आणि विवरण पत्र भरावे लागते. वैयक्तिक करदात्यासाठी आणि एचयूएफसाठी प्राप्तिकरासाठी असणारे स्लॅब सारखेच आहेत.       
एचयूएफचे उत्पन्न
एक गरसमज आहे की आपले पसे किंवा गुंतवणूक एचयूएफच्या नावाने करून कर वाचविता येतो. करदात्याचे वैयक्तिक उत्पन्न आणि एचयूएफचे उत्पन्न हे वेगळे दाखवणे गरजेचे असते. एचयूएफमध्ये कोणत्या उत्पन्नाचा समावेश होतो हे समजून घेतले पाहिजे. एचयूएफमध्ये खालील उत्पन्नाचा समावेश होतो:
एचयूएफमध्ये वडिलोपार्जति संपत्ती व त्यातून मिळणारे उत्पन्न
०     सहदायिकाच्या (उस्र्ं१ूील्ली१) मृत्यूनंतर त्याच्या संपत्तीतील हिस्सा
०    कुटुंबाला मिळालेल्या भेटी,
०    एचयूएफच्या नावावर असणाऱ्या घरावर मिळालेले घर भाडे
०    मुदत ठेव, शेअर्स आणि इतर गुंतवणुकीवर मिळालेले व्याज,
०    एचयूएफला त्याच्या पशातून धंदा करता येतो इत्यादीचा समावेश होतो.
०    कुटुंबाला मिळणाऱ्या भेटीसाठी भेट खत (ॅकाळ ऊएएऊ) बनवणे गरजेचे असते.
वडिलोपार्जति संपत्ती शिवाय मिळणाऱ्या उत्पन्नासाठी काही वाद आहेत. वर सांगितल्याप्रमाणे पुरुषाचे लग्न झाल्यावर एचयूएफ अस्तित्वात येते त्यामध्ये तो आणि त्याची पत्नी हे सभासद असतात. त्यामधील फक्त पुरुष सहदायिकी असतो. त्यांना मिळालेली वडिलोपार्जति संपत्ती ही एचयूएफची संपत्ती होते. काहींच्या मते या संपत्ती व्यतिरिक्त उत्पन्न (भेटी, वगरे) एचयूएफमध्ये दाखविण्यासाठी दोन सहदायिकी असणे गरजेचे असते. म्हणजेच त्यांना मुलगा झाल्याशिवाय हे उत्पन्न एचयूएफचे उत्पन्न दाखवता येत नाही. असे उत्पन्न हे वैयक्तिक उत्पन्न असते.   
एचयूएफला मिळालेल्या भेटी:
मागील लेखात सांगितल्याप्रमाणे जर वैयक्तिक करदात्याला किंवा िहदू अविभक्त कुटुंबांला (ऌवा) पसे किंवा मालमत्ता ही मोबदल्याशिवाय किंवा अपुऱ्या मोबदल्याने मिळाली असेल तर ते प्राप्तीकारासाठी ‘‘इतर उत्पन्न’’ समजले जाते. त्यानुसार या तरतुदी एचयूएफला सुद्धा लागू होतात.
एचयूएफमधील सभासदाने जर स्वतची मालमत्ता एचयूएफला दिली तर कलम 64 प्रमाणे या मालमत्तेतून मिळणाऱ्या उत्पन्नावर सभासदाला कर भरावा लागतो.
एचयूएफने दिलेल्या भेटी :
कलम ५६ प्रमाणे नातेवाईकाच्या व्याख्येत एचयूएफची व्याख्या केलेली नाही. परंतु कलम १० (२) प्रमाणे जर एचयूएफने सभासदाला भेट दिली तर ती करमुक्त आहे.
(लेखक सनदी लेखाकार आहेत)

Distribution of Akshata on the eve of Prime Minister Narendra Modis meeting in Wardha
पंतप्रधान मोदींच्या वर्धेतील सभेच्या पूर्वसंध्येला ‘अक्षता’ वाटप; आधी सभास्थळी झाले होते कलश पूजन
Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान
nirmala sitaraman
उलटा चष्मा: पैसे नसलेल्या अर्थमंत्री