News Flash

माझा पोर्टफोलियो : लौकिक निरंतर ‘शक्ती’चा!

कंपनीच्या उत्पादनांना वाढती मागणी असल्याने कंपनी आपली उत्पादन क्षमता सातत्याने वाढवत आहे.

माझा पोर्टफोलियो : लौकिक निरंतर ‘शक्ती’चा!

अजय वाळिंबे
जेके सिमेंट लिमिटेड देशातील एक अग्रगण्य सिमेंट उत्पादक असून जेके समूहाशी संलग्न कंपनी आहे. या समूहाची स्थापना लाला कमलापत सिंघानिया यांनी केली होती. जेके सिमेंटने चार दशकांहून अधिक काळ, भारतातील बहुक्षेत्रीय पायाभूत सुविधांच्या गरजा भागवल्या आहेत. कंपनीने उत्पादनाची उत्कृष्टता, ग्राहक अभिमुखता आणि तंत्रज्ञानात्मक नेतृत्वाचा लौकिक जपला आहे.

गेली ४५ हून अधिक वर्ष कंपनी सिमेंट उत्पादनात असून १९७५ मध्ये कंपनीने निंबहेरा, राजस्थान येथे पहिल्या ग्रे सिमेंट प्लांटमध्ये व्यावसायिक उत्पादन सुरू केले. त्यानंतर, कंपनीने राजस्थानमध्ये मंगरोल आणि गोटन येथे आणखी दोन प्रकल्पांची स्थापना केली. सध्या कंपनीचे एकंदर सात प्रकल्प असून त्यापैकी राजस्थानमध्ये तीन, तर कर्नाटक, गुजरात, हरयाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांत प्रत्येकी एक प्रकल्प आहे. कंपनीकडे आता वार्षिक १४.७ दशलक्ष मेट्रिक टनांची स्थापित सिमेंट क्षमता असून ती देशातील प्रमुख सिमेंट उत्पादकांपैकी एक मोठी उत्पादक आहे.

जेके व्हाइट सिमेंट हा जेके सिमेंट लिमिटेडचा एक मोठा विभाग आहे. भारतभरात आपले जाळे असलेली ही कंपनी आज वॉलपुट्टीची देशातील प्रमुख उत्पादक आहे. कंपनी भारतातील व्हाइट सिमेंटची दुसऱ्या क्रमांकाची मोठी उत्पादक असून, तिची वार्षिक क्षमता ६ लाख टन आहे. भारतात एक मजबूत स्थान प्रस्थापित केल्यानंतर, कंपनीने यूएई येथे फ्री ट्रेड झोनमध्ये ग्रीन-फील्ड डय़ुअल प्रोसेस व्हाइट सिमेंट-कम-ग्रे सिमेंट हा मोठा महत्त्वाकांक्षी प्रकल्प कार्यान्वित करून पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय बाजारात प्रवेश केला आहे. आज जेके व्हाइट सिमेंट जगातील ४३ देशांमध्ये विकले जाते.

गेल्या आर्थिक वर्षांत उत्तम आर्थिक निष्कर्ष जाहीर केल्यानंतर कंपनीने नुकतेच यंदाच्या आर्थिक वर्षांतील पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. पहिल्या तिमाहीत कंपनीने गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत उलाढालीत ६९.३ टक्के वाढ साध्य करून ती १,६३३.६९ कोटी रुपयांवर नेली आहे, तर नक्त नफ्यात तब्बल १६८ टक्के वाढ होऊन तो २०८.२६ कोटी रुपयांवर गेला आहे.

कंपनीच्या उत्पादनांना वाढती मागणी असल्याने कंपनी आपली उत्पादन क्षमता सातत्याने वाढवत आहे. तसेच आपल्या उत्पादनांच्या श्रेणीत वैविध्य आणत आहे. उत्कृष्ट उत्पादने, अनुभवी प्रवर्तक, उत्तम ब्रँड, एक व्यापक विपणन आणि वितरण जाळे हे घटक जेके सिमेंटच्या निरंतर शक्तींचे प्रतिनिधित्व करतात. एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून प्रत्येक पडझडीला जेके सिमेंटचा जरूर विचार केला जायला हवा.

जेके सिमेंट लिमिटेड

(बीएसई कोड – ५३२६४४)

शुक्रवारचा बंद भाव : रु. ३,११२

उच्चांक/ नीचांक : रु. ३,७००/ १,४१२

बाजार भांडवल : रु. २४,०४२ कोटी

भरणा झालेले भागभांडवल : रु. ७७.२७ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक  ५७.६३

परदेशी गुंतवणूकदार      १६.९०

बँक/ म्यु. फंड/ सरकार   २०.५९

इतर/ जनता     ४.८८

संक्षिप्त विवरण

* शेअर गट    : लार्ज-कॅप

* प्रवर्तक       : जे के समूह

* व्यवसाय क्षेत्र  : सीमेंट

* पुस्तकी मूल्य : रु. ४८३.६०

* दर्शनी मूल्य : रु. १०/-

* गतवर्षीचा लाभांश     : १५०%

शेअर शिफारसीचे निकष

*  प्रति समभाग उत्पन्न: रु. ६.१८

*  पी/ई गुणोत्तर :      ०.४

*  समग्र पी/ई गुणोत्तर :       १८.५

* डेट इक्विटी गुणोत्तर :        ०.९७

* इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर :     ६.१८

* रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड : २०

* बीटा :       ०.४

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 23, 2021 1:05 am

Web Title: history of jk cement jk cement ltd company profile zws 70
Next Stories
1 क.. कमॉडिटीचा : गुंतवणूक, जोखीम व्यवस्थापनासाठी डिलिव्हरी-मुक्त साधन सोयडेक्स..
2 गोष्ट  रिझव्‍‌र्ह बँकेची : इतिहास.. पाकिस्तानला दिलेल्या त्या ‘५५ कोटींचा’
3 बाजाराचा तंत्र-कल : राजा, रात्र वैऱ्याची आहे
Just Now!
X