kar-anvayपगारदार व्यक्तींना मूळ वेतन आणि महागाई भत्ता याबरोबर इतर काही भत्ते मिळू शकतात. आजच्या लेखात पगारदार व्यक्तीला घरभाडे भत्ता (हाऊस रेंट अलाउन्स- एचआरए) मिळत असेल तर तो करमुक्त कसा आणि किती मिळतो याविषयी माहिती घेऊया.
अनेक पगारदार व्यक्ती त्यांच्या आई, वडील, पत्नी, भाऊ-बहिण किंवा इतर व्यक्तींच्या मालकीच्या घरात रहात असतात. अशा व्यक्तींना जर घरभाडे भत्ता मिळत असेल तर प्राप्तिकर कायद्याच्या कलम १०(१३ अ) व नियम २ अ प्रमाणे घरभाडे भत्ता करमुक्त मिळण्यासंदर्भात तरतूद आहे.
पगाराच्या व्याख्येमध्ये बेसिक पगार आणि महागाई भत्ता या दोन रक्कमांचा समावेश केला जातो. एक उदाहरण घेऊन प्राप्तिकर नियोजनाद्वारे घरभाडे भत्ता करमुक्त कसा आणि किती मिळेल ते पाहूया:
समजा एखादी पगारदार व्यक्ती मुंबई शहरात त्याच्या वडिलांच्या नावावर मालकी असलेल्या जागेमध्ये राहात आहे. या व्यक्तीला बेसिक पगार आणि महागाई भत्ता मिळून वार्षकि 5 लाख रुपये पगार आहे. या व्यतिरिक्त या व्यक्तीला वार्षकि ५०,००० रुपये घरभाडे भत्ता मिळतो आहे.
या माहितीच्या आधारे हा घरभाडे भत्ता करमुक्त मिळण्यासाठी या व्यक्तीने काय करावे? तर ही व्यक्ती तिच्या वडिलांच्या नावे मालकी असलेल्या घरात राहात असल्याने त्या व्यक्तीने आपल्या वडिलांना दरमहा १०,००० रुपये म्हणजे वार्षकि १,२०,००० रुपये घरभाडे द्यावे. त्याची रीतसर भाडे पावती आपल्या नोकरीच्या ठिकाणी कार्यालयाच्या संबंधित खात्याला सादर करावी. काही कंपन्या भाडे पावतीसोबत, पगारदार व्यक्ती आणि ज्याला घरभाडे दिले जात आहे त्या व्यक्तीबरोबर झालेल्या करारपत्राची प्रत सादर करावयास सांगू शकतात. पण CBDT circular No 798 dated 30/10/2000 प्रमाणे दरमहा ३,००० रुपयापर्यंत घरभाडे भत्ता मिळत असेल अशा व्यक्तींनी भाडे पावती संबंधित खात्याला सादर केली नाही तरी चालते. अर्थात प्राप्तिकर खात्याकडून जर रेग्युलर असेसमेंट (Regular Assessment) झाली तर त्याला अस्सेसिंग ऑफिसरकडे भाडे पावती सादर करावी लागते.
करमुक्त घरभाडे भत्त्याची मोजणी खालील प्रमाणे:
१. पगाराच्या ५०% एवढी रक्कम म्हणजे २,५०,००० रुपये किंवा
 २. प्रत्यक्षात मिळालेला घरभाडे भत्ता म्हणजे ५०,००० रुपये किंवा
 ३. घरभाडे रक्कम वजा पगाराच्या १०% एवढी रक्कम म्हणजे १,२०,००० वजा ५०,००० म्हणजे ७०,००० रुपये.
या तीन रकमापकी सर्वात कमी रक्कम म्हणजे ५०,००० रुपये रक्कम करमुक्त मिळेल. म्हणजेच मिळालेला घरभाडे भत्ता संपूर्णपणे करमुक्त मिळेल.

असे नियोजन करण्याचे फायदे म्हणजे:
१. भाडे देणाऱ्या पगारदार व्यक्तीला घरभाडे भत्ता करमुक्त मिळेल.
२. घरभाड्याची रक्कम त्या कुटुंबातील सदस्याकडेच (वरील उदाहरणात वडिलांकडे) राहील; त्यातून ही व्यक्ती प्राप्तिकर दाता नसेल तर दुग्धशर्करा योग!
आजच्या लेखात आपण ज्या पगारदार व्यक्तींच्या नावे स्वतचे घर नाही पण ज्यांना घरभाडे भत्ता मिळतो त्यांना मिळणारा घरभाडे भत्ता करमुक्त कसा आणि किती मिळतो ते पहिले. पण पगारदार व्यक्तींमध्ये अशाही व्यक्ती असतील ज्यांच्या नावे स्वतचे घर नाही त्यामुळे घरभाडे तर कुणाला तरी द्यावे लागते पण ज्यांना त्यांच्या कंपनीकडून घरभाडे भत्ता मिळत नाही. अशा व्यक्तींना प्राप्तिकर वाचवण्यासाठी काही तरतूद आहे का? तर होय, अशी तरतूद नक्की आहे. आणि ही तरतूद केवळ पगारदार व्यक्तीपुरतीच नव्हे तर स्वतचा व्यवसाय असणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत सुद्धा लागू होते. ही तरतूद कुठली ते पुढच्या लेखात नक्की वाचा.

Devendra Fadnavis, Ajit Pawar & Eknath Shinde Astrology
शिंदे, पवार, फडणवीसांना ‘या’ अंकाचा धागा ठेवतो जोडून; २०२४ मध्ये मात्र येईल ‘हा’ अडथळा, ज्योतिषी काय सांगतात?
Amol Kolhe, mic, Bhosari Constituency,
Video : …अन अमोल कोल्हे यांनी ‘त्या’ व्यक्तीच्या हातातून माईक का खेचला? राजकीय सभ्यतेचे दिले उदाहरण
Gaurav Gogoi alleges that BJP wants a Russian-style oligarchy
“रामाच्या नावाचा वापर ही लांच्छनास्पद बाब; भाजपाला रशियासारखीच अल्पाधिकारशाही हवीय”; काँग्रेस नेते गौरव गोगोईंचा भाजपावर आरोप
Pawar family
पवार कुटुंबीयही कौटुंबिक जिव्हाळ्याचं राजकारण करू शकतात…

लेखक गुंतवणूक व प्राप्तिकर नियोजन सल्लागार
attatrayakale9@yahoo.in
प्राप्तिकर कायद्याच्या कलम १०(१३ अ) व नियम २ अ प्रमाणे घरभाडे भत्ता करमुक्त मिळण्यासाठी खालील नियमांचे पालन आवश्यक आहे :
१. तो राहात असलेले घर त्याच्या मालकीचे असता नये.
२. तो राहात असलेल्या घरासाठी त्या घराच्या मालकाला प्रत्यक्षात भाडे स्वरुपात रक्कम देणे आवश्यक आहे.

कलम १०(१३ अ) व नियम २ अ प्रमाणे खालील पकी जी सर्वात कमी रक्कम असेल ती रक्कम त्या पगारदार व्यक्तीला करमुक्त मिळेल:
१.     जर ती व्यक्ती दिल्ली , कोलकाता  आणि चेन्नई यापकी एखाद्या शहरात राहात असेल तर पगाराच्या ५०% आणि ती व्यक्ती ही शहरे सोडून दुसरया शहरात राहात असेल तर पगाराच्या ४०% रक्कम किंवा
२.     प्रत्यक्ष मिळणारया घरभाडे भत्त्याची रक्कम किंवा
३.     घरभाडे रक्कम वजा पगाराच्या १०% एवढी रक्कम