12प्राप्तीकर कायद्याच्या दृष्टीने ‘पगार’ या संज्ञेची व्याप्ती मोठी आहे. त्यामध्ये व्हेजेस (wages), पेन्शन (pension) आगाऊ पगार, बोनस इत्यादी बरोबरच एरिअर्सच्या स्वरुपात मिळालेला पगारही येतो. अनेक पगारदार व्यक्तींना वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार म्हणा किंवा काही अन्य कारणामुळे मागील काही वर्षांशी निगडीत असलेल्या पगाराची थकबाकी मिळते. यालाच ‘एरिअर्स ऑफ सॅलरी’ (arrears of salary) असे म्हणतात.

मागच्या काही वर्षांशी निगडीत असलेल्या पगाराची थकबाकी एकदम मिळाल्यामुळे त्या विशिष्ठ वर्षांत त्या पगारदार व्यक्तीचे करदायित्व एकदम वाढते. अशा व्यक्तीला प्राप्तिकराचे ओझे एकदम पेलण्याची वेळ येऊ नये यासाठी प्राप्तीकर कायद्यामध्ये कलम ८९ (१) मध्ये ‘रिलीफ’ची संजीवनी उपलब्ध आहे.
थकबाकीच्या पगाराची रक्कम त्या त्या वर्षांसाठी विभागून त्यावर ‘रिलिफ’ मिळण्याचा आणि त्यासाठी प्रत्येक वर्षांच्या थकबाकी पगाराचा तपशील मिळण्याचा पगारदार व्यक्तीला अधिकार आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने ‘ओर्डिनन्स वस्त्र कारखाना कर्मचारी यूनिअन’ विरुद्ध ‘यूनिअन ऑफ इंडिया’ 104 taxman 665 या प्रकरणात तसा निर्णय दिला आहे. यानुसार कंपनीच्या संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी संबंधित पगारदार व्यक्तीला थकबाकी पगाराचा तपशील देणे आवश्यक आहे. अशारितीने थकबाकी पगार मिळणार असेल तर त्या पगारदार व्यक्तीने कलम ८९ (१) प्रमाणे मिळणारा ‘रिलीफ’चा फायदा घेऊन प्राप्तीकर वाचवावा.
प्राप्तीकर नियोजन सल्लागार, मुंबई</span>
ndattatrayakale9@yahoo.in

‘रिलिफ’च्या संजीवनीसाठी काय करावे?
सरकारी नोकरदार तसेच कंपन्या, सहकारी अथवा इतर संस्था, विद्यापीठे, स्थानिक स्वराज्य संस्था, संघटना आदींमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी कलम १९२ (२अ) नुसार त्यांना रोजगार देणाऱ्याकडे (एम्प्लॅयरकडे) फॉर्म नंबर १० ई मध्ये तपशील भरून द्यावा. ज्यामुळे मुळात प्राप्तीकर कापण्याच्या वेळेसच हा ‘रिलिफ’ लक्षात घेतला जाईल आणि त्या आधारे प्राप्तीकर मुळात कापला जाईल. या पद्धतीचा प्राप्तीकरदात्यांच्या दृष्टीने फायदा म्हणजे ‘रिलिफ’ची रक्कम लक्षात घेऊन मुळात प्राप्तीकर कापल्यामुळे नंतर विवरण पत्राद्वारे ‘रिफंड’ किंवा परतावा मागण्याचा (आणि तो आज येईल उद्या येईल अशी वाट पाहण्याचा) प्रश्न उद्भवणार नाही.

थकबाकीच्या पगारावर ‘रिलिफ’ मोजण्याची पद्धत
नियम २१ ‘अ’ मध्ये नमूद केली आहे. ती अशी –
पायरी १ : एकूण उत्पन्नामध्ये थकबाकीच्या पगाराची रक्कम
धरून प्राप्तीकराची रक्कम मोजायची
पायरी २ : एकूण उत्पन्नामध्ये थकबाकीच्या पगाराची रक्कम
न धरता प्राप्तीकराची रक्कम मोजायची
पायरी ३ : वरील दोन प्राप्तीकरांच्या रक्कमेतील फरक मोजायचा
पायरी ४ : थकबाकीच्या पगाराची रक्कम ज्या वर्षांसाठी
(किंवा ज्या वर्षांसाठी) निगडीत आहे त्या वष्र्याच्या
(किंवा वष्र्याच्या) एकूण उत्पन्नामध्ये थकबाकीची रक्कम
धरून प्राप्तीकर मोजायचा.
पायरी ५ : थकबाकीच्या पगाराची रक्कम ज्या वर्षांसाठी
(किंवा ज्या वर्षांसाठी) निगडीत आहे त्या वष्र्याच्या
(किंवा वष्र्याच्या) एकूण उत्पन्नामध्ये थकबाकीची रक्कम
न धरता प्राप्तीकर मोजायचा.
पायरी ६ : वरील दोन प्राप्तीकरांच्या रक्कमेतील फरक मोजायचा
पायरी ७ : प्राप्तीकर ‘रिलीफ’ची रक्कम म्हणजे तिसऱ्या पायरीत
मोजलेला प्राप्तीकर व सहाव्या पायरीत मोजलेला
प्राप्तीकर यामधील फरक