News Flash

वाटा गुंतवणुकीच्या

कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी काही औपचारिकता पार पाडावी लागते.

कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी काही औपचारिकता पार पाडावी लागते. त्यात सर्वप्रथम करावी लागते ती ‘केवायसी’ (KYC – Know your client) अर्थात ‘तुमचा ग्राहक जाणून घ्या’ ही प्रक्रिया. आपण या लेखात ‘केवायसी’बाबत सविस्तर माहिती करून घेऊ. यात प्रामुख्याने आपल्याला पडणाऱ्या काही खालील प्रश्नाचा आढावा आपण घेऊ.

कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी काही औपचारिकता पार पाडावी लागते. त्यात सर्वप्रथम करावी लागते ती ‘केवायसी’ (KYC – Know your client) अर्थात तुमचा ग्राहक जाणून घ्या ही प्रक्रिया. आपण या लेखात ‘केवायसी’बाबत सविस्तर माहिती करून घेऊ. यात प्रामुख्याने आपल्याला पडणाऱ्या काही खालील प्रश्नाचा आढावा आपण घेऊ.

  • केवायसी म्हणजे काय?
  • नवीन नियमाप्रमाणे १ फेब्रुवारी २०१७ पासून सीकेवायसी करावे लागणार. आता हे काही वेगळे आहे का?
  • पूर्वी केवायसी केले असल्यास पुन्हा नवीन नियमाप्रमाणे सीकेवायसी करणे जरुरीचे आहे का?
  • केवायसी करणे बंधन कारक का आहे?
  • केवायसी करताना कोणती काळजी घेतली पाहिजे?

 

‘केवायसी’ म्हणजे काय?

केवायसीचे पूर्णस्वरूप म्हणजे kKnow Your Clientl म्हणजेच ज्या ठिकाणी बँकेत किंवा गुंतवणूक करण्याच्या ठिकाणी त्या त्या संस्थेला तुमच्या ओळखीसाठीचे पुरावे सादर करणे. जेणे करून तुम्ही ज्या संस्थेत आपली रक्कम जमा केली आहे त्यावर इतर कोणीही आपला हक्क सांगू शकणार नाही. त्यासाठी तुमच्याकडून संस्था, तुमच्या छायाचित्रासहित असलेला ओळखीचा पुरावा, पॅन कार्ड, वास्तव्याचा (पत्त्याचा) पुरावा इत्यादी सादर करावे लागते. शिवाय इ-मेल तसेच दूरध्वनी क्रमांक बरोबर नमूद करण्याची सोयही असते. ही सर्व माहिती बरोबर असेल तर तुमच्या गुंतावणुकी संदर्भातील माहिती तुमच्यापर्यंत त्यांना वेळोवेळी पोहोचविता येईल. त्यामुळे ही आपली जबाबदारी आहे की आपण दिलेली माहिती संपूर्ण आणि बरोबर लिहिली आहे किंवा नाही हे तपासून पाहणे. सर्वात मोठी चूक आपल्याकडून होते ती म्हणजे आपण घाईघाईत केवायसीचा अर्ज अर्धवट भरतो किंवा तो तपासून तरी पाहत नाही. त्यामुळे आपल्या गुंतावणुकीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. नवीन नियमाप्रमाणे १ फेब्रुवारी २०१७ पासून सीकेवायसी करावे लागणार.

हे काही वेगळे आहे का?

सीकेवायसी मध्ये वरील केवायसी प्रमाणेच सर्व माहिती द्यावयाची आहे. त्यात फक्त काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. जसे की आईचे नाव, फाटका (FATCA – Foreign Account Tax Compliance Act) कायद्याच्या खाली येणारी माहिती वगैरे. महत्वाचे म्हणजे नवीन सीकेवायसी तुम्ही कुठल्याही एका संस्थेमध्ये अद्ययावत केल्यास पुन्हा दुसरीकडे करण्याची गरज नाही. जसे की बँकेत जर तुम्ही सीकेवायसी अद्ययावत केल्यास तुमच्या पॅन किंवा आधार कार्डमार्फत तुम्ही पूर्वी केलेल्या गुंतवणुकीच्या संस्थांकडे ती माहिती पोहोचविली जाईल. त्यामुळे तुमचा पत्ता किंवा दूरध्वनी क्रमांक बदलला तर फक्त एका ठिकाणी अद्ययावत केल्यास तुमच्या इतर बॅंक खात्यांमध्ये व जेथे गुंतवणूक केली गेली असेल अशा संस्थांमध्ये ती आपोआपच अद्ययावत होईल. म्हणूच त्याला सीकेवायसी (Centralised KYC) नाव देण्यात आले आहे.

यात वर नमूद केलेले फाटका कायदा म्हणजे काय ते आता पाहू. याअंतर्गत कोणती माहिती देण्यात यावी? तर काही व्यक्तीची परदेशातून येणारी मिळकत असेल तर त्याची माहिती या फटका कायद्याखाली घोषित करवी लागते. तशी परदेशातून येणारी मिळकत नसेल तरी अशी काही मिळकत नाही असेही घोषित करणे जरुरीचे ठरते. ही माहिती रिकामी सोडू नये. परदेशातून अवैधपणे येणाऱ्या काळ्या पैशावर आळा घालण्यासाठी ही माहिती मागितली जाते व ती देणे बंधनकारक आहे. त्याशिवाय केवायसी पूर्ण होऊ शकत नाही.

 

पूर्वी केवायसी केले असल्यास पुन्हा नवीन नियमाप्रमाणे सीकेवायसी करणे जरुरीचे आहे का?

पूर्वी केलेल्या केवायसीमध्ये दिलेली माहिती पूर्ण व बरोबर असल्यास पुन्हा सीकेवायसी करण्याची गरज नाही. परंतु बँक किंवा तुमची गुंतवणूक जेथे केली गेली आहे अशा संस्थांकडून तशी विचारणा झाल्यास सीकेवायसी करून घेणे केव्हाही चांगले. वर दिल्याप्रमाणे काही अतिरिक्त अद्यवत माहितीही त्यात नमूद केली जाईल. यामुळे फार पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतील अपूर्ण माहितीदेखील अद्यवत होईल.

 

केवायसी करणे बंधनकारक का आहे?

होय, केवायसी करणे बंधनकारक आहे. कारण आपली सर्व अद्यवत माहिती आपल्या बँकांकडे, गुंतवणूक संस्थांकडे, विमा कंपन्यांकडे असणे हे आपल्याच हिताचे आहे. तसे असल्यास तुमच्या हक्काच्या पैशासाठी तुम्हाला प्रत्येकवेळी कुठलेही पुरावे सदर करण्याची गरज नाही. त्यामुळे बिनदिक्कत व्यवहार पार पडण्यास मदत होते. शेवटी तुमचा आणि वेगवेगळ्या संस्थांचा वेळ आणि श्रमही वाचतात.

 

 केवायसी करताना कोणती काळजी घेतली पाहिजे?

सर्वप्रथम आपली माहिती बरोबर नमूद केली आहे किंवा नाही हे तपासून पाहणे. ही आपली जबाबदारी आहे. आपण नेहमी घाई घाईत कोरा अर्ज सही करून देतो व नंतर लक्षात येते की माहिती अर्धवट लिहिली गेली आहे किंवा काही चुका झाल्या आहेत. संस्थाना जबाबदार धरून ते अद्यवत करून घेण्यासाठी पुन्हा पुन्हा श्रम आणि वेळ घालविण्यापेक्षा सुरुवातीलाच काळजी घ्यावी व माहिती बरोबर लिहिल्याशिवाय सही करून अर्ज देऊ नये.

एक जबाबदार नागरिकाप्रमाणे सर्व योग्य ती माहिती देणे आपले कर्तव्य आहे. हल्ली सर्व माहिती ही पॅन व आधार कार्डबरोबर संलग्न असल्यामुळे काही लपवणे कठीण आहे व तसे केल्यास ते कधी ना कधी उघडकीस येऊ शकते.

सीकेवायसी केल्यानंतर प्रत्येकाला एक ठराविक क्रमांक दिला जातो. तो व्यवस्थित ठेवावा. हाच क्रमांक तुम्ही भविष्यात होणाऱ्या व्यवहारासाठी वापरू शकता.

डिजिटलाईज आर्थिक व्यवहार करण्यासाठी व्यवहारकर्त्यांने सीकेवायसीची पूर्तता करणे गरजेचे आहे. त्यामुळे सीकेवायसी करताना आपली बरोबर व योग्य माहिती दिली जाण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी.

किरण हाके

kiran@fingenie.in

(लेखक आर्थिक नियोजनातील CFP CM पात्रताधारक व सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)

 

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2017 1:41 am

Web Title: how to investment money
Next Stories
1 दोन अंकी भांडवली वृद्धी देणारी गुंतवणूक
2 कर  समाधान : गुंतवणुकीचे पुरावे वेळेत सादर करा!
3 माझा पोर्टफोलियो : धोका जास्त तितका नफाही जास्त!
Just Now!
X