10अनेकांच्या बाबतीत उत्पन्न व विमा यांच्यातील विसंगती सरांच्या बाबतीत ही दिसते. टर्म इन्शुरन्स हे बचतीचे साधन नसून जोखीम कमी करण्याचे साधन आहे. ज्यांच्यावर कर्ज फेडण्याची जबाबदारी नाही त्याला टर्म प्लॅनची आवश्यकता नाही, असा सल्ला दिला जातो.

आज ज्यांचे नियोजन जाणून घेणार आहोत ते ब्रिजमोहन दायमा (३७) हे लातूर येथील दयानंद वाणिज्य महाविद्यालयात अर्थशास्त्राचे विभाग प्रमुख आहेत. त्यांच्या पत्नी सारिका (३५) या लातूर येथील कायम विना अनुदानित तत्त्वावरील वाणिज्य महाविद्यालयात हंगामी व्याख्यात्या आहेत. सारिका व ब्रिजमोहन याना गोरज (८) व ओजस (६) असे दोन मुलगे आहेत.
ब्रिजमोहन यांच्या आई शांताबाई, भाऊ महेश हे शाळा शिक्षक आहेत. महेश यांची पत्नी रचना व आत्या व संपतबाई हे कुटुंबाचे अन्य सदस्य आहेत. कुटुंबाचे वार्षकि उत्पन्न १० लाख रुपये आहे. त्यांच्यावर काहीही कर्ज नाही.
सध्याच्या घराच्या जागी नवीन घर बांधणे, मुलांच्या भविष्यातील पदव्युत्तर शिक्षण व इतर खर्च ब्रिजमोहन व सारिका यांच्या निवृत्तीपश्चात खर्च व नवीन घर खरेदीकरिता लागणाऱ्या खर्चाची तजवीज ही माफक उद्दिष्टे त्यांनी ठेवली आहेत.
ब्रिजमोहन व सारिका यांचा प्रत्येकी ५० लाख रुपये मुदतीचा विमा आहे. मुदतीचा विमा हा नेहमीच आपल्या उत्पन्नाशी व आíथक जबाबदारीशी सुसंगत असावा. दोघांच्याही उत्पन्नात असलेली तफावत व सारिका यांचे २ लाख उत्पन्न व त्यांच्यावर कुठेलेही कर्ज नसणे लक्षात घेता लक्षात घेता त्यांचे विमाछत्रही याच प्रमाणात हवे होते.
अनेकांच्या बाबतीत उत्पन्न व विमा यांच्यातील विसंगती सरांच्या बाबतीत ही दिसते. टर्म इन्शुरन्स हे बचतीचे साधन नसून जोखीम कमी करण्याचे साधन आहे. ज्यांच्यावर कर्ज फेडण्याची जबाबदारी नाही त्याला टर्म प्लॅनची आवश्यकता नाही, असा सल्ला दिला जातो.
ब्रिजमोहन यांच्याकडे असलेल्या युलिप प्रकारच्या विमा योजनाची हप्ता भरण्याची मुदत संपल्यावर त्यांनी त्यांचे ४० वय पूर्ण होण्यापूर्वी २५ लाखाचा २० वष्रे मुदतीचा विमा खरेदी करण्याचा विचार करावा. ब्रिजमोहन यांनी पाठविलेल्या मेलनुसार, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी विमा हप्ते म्युच्युअल फंडांच्या करवजावटीस पात्र असलेल्या ईएलएसएस योजना यामध्ये होणारी गुंतवणूक कर वजावटीच्या कमाल मर्यादेहून (रु. १,५०,०००) अधिक आहे. दोघेही आपल्या प्राप्तीकराच्या नियोजनाचा एक भाग म्हणून वार्षकि २५ हजार रुपये ‘लोकसत्ते’च्या ‘सर्व काय्रेषु सर्वदा’ने ओळख करून दिलेल्या व देणगी दिल्यास प्राप्तीकरात सूट मिळणाऱ्या संस्थांना देणगी देतात. दोघांकडे बहुतांश विमायोजना या विमा व गुंतवणूक संलग्न असलेल्या आहेत.
आज एनपीएसमध्ये या १,५०,००० व्यतिरिक्त ५०,००० ची गुंतवणूक केल्यास त्यावर कर सवलत मिळणार आहे. विमा हप्ते बंद करता येत नाहीत. या वर्षीपासून एनपीएसमधील गुंतवणुकीवर उपलब्ध असलेली अतिरिक्त करसवलत मिळविण्यासाठी ब्रिजमोहन यांनी ते जमा करीत असलेल्या अतिरिक्त कर्मचारी भविष्य निर्वाह निधी व ईएलएसएस म्युच्युअल फंडातील एसआयपी यांची फेरआखणी करणे करणे गरजेचे आहे.
दोघे मिळून चार फंडात मासिक ४५,००० हजाराची एसआयपी करीत आहेत. आपण निवडलेले सर्वच फंड अव्वल आहेत, असे सांगण्यास त्यांना हरकत नाही; परंतु या गुंतवणुकीपकी दोन फंडात मिळून प्रत्येकी ३८ टक्के गुंतवणूक फ्रॅन्क्लीन इंडिया स्मॉलर कंपनीज फंड व बिर्ला सन लाईफ इन्फ्रास्टर्र्कचर फंड या दोन फंडात आहेत. स्मॉल कॅप व सेक्टोरिअल फंड (इन्फ्रास्ट्रक्चर) हे गुंतवणुकीस धोकादायक समजले जातात. या दोन्ही फंडातील गुंतवणूक मिळून २०,००० पेक्षा जास्त न होऊ न देता ‘लोकसत्ता – कत्रे म्युच्युअल फंड’ यादीतून अन्य दोन फंडांची निवड करून या फंडात एसआयपी सुरु करावी.
आपली एकूण गुंतवणूक युलिप म्युच्युअल फंडात म्हणजे समभाग गुंतवणुकीत अधिक आहे. विमा व गुंतवणूक एकत्र नसणे फायद्याचे असते. आपल्याकडे असलेल्या युलिप योजना बहुदा आपल्या बँकेने विकल्या असाव्यात. कारण या योजना बँकांना मोठे कमिशन मिळवून देतात. म्हणून बँका या योजना आपल्या बचत खात्यात मोठी रोकड बाळगणाऱ्या ग्राहकांच्या गळ्यात मारतात. या योजनांची हप्ता भरण्याची मुदत संपल्यानंतर फायद्याचा विचार करून योग्य तो निर्णय करावा.
सारिका यांनी मार्च २०१४ मध्ये ४ लाख रुपये हे महागाईच्या दराशी निगडीत व्याज देणाऱ्या रिझव्र्ह बँकेच्या १० वष्रे मुदतीच्या रोख्यात गुंतवणूक केली आहे. आता महागाईचा दर कमी झाल्याने या रोख्यांवर देय असलेला व्याजाचा दरही कमी झाला आहे. मागील वर्षी ११ टक्याहून अधिक व्याज देणारे हे रोखे या वर्षी ७ टक्के दरम्यान व्याज देतील.
यातील रक्कम किमान तीन वष्रे काढू न शकत आल्याने एप्रिल २०१७ मध्ये ही रक्कम काढून घ्यावी. ही रक्कम एप्रिल २०१७ मध्ये काढून घेतल्यावर ती रोखे म्युच्युअल फंडात गुंतवावी. सध्याच्या घराच्या जागी नवीन घर बांधायला नक्की किती खर्च येईल याचा अंदाज आपण पाठविलेल्या मेलमध्ये दिला नाही. परंतु मुलांचे उच्च शिक्षण सुरु होण्यापूर्वी किंवा सेवा निवृतीनंतर नवीन घराचे नियोजन करणे योग्य ठरेल.
shreeyachebaba@gmail.com

कसे हवे नियोजन :
* कुठेलेही कर्ज नसताना विमाछत्र उत्पन्नाच्याच प्रमाणात हवे.
* अतिरिक्त कर्मचारी भविष्य निर्वाह निधी व ईएलएसएस म्युच्युअल फंडातील एसआयपी यांची फेरआखणी करावी.
* स्मॉल कॅप व सेक्टोरिअल फंड (इन्फ्रास्ट्रक्चर) सारख्या धोक्याच्या फंडातील गुंतवणूक २०,००० पेक्षा जास्त न होऊ न देणे.
* महागाईचा व परिणामी रोख्यांवर देय व्याजाचा दरही कमी झाल्याने रोख्यातील गुंतवणूक एप्रिल २०१७ मध्ये काढून घ्यावी.
* मुलांचे उच्च शिक्षण सुरु होण्यापूर्वी किंवा सेवा निवृतीनंतर नवीन घराचे नियोजन करणे योग्य ठरेल.

धोके काय :
कर्ज नसताना विमा छत्रही उत्पन्नाच्या प्रमाणात नसणे.
स्मॉल कॅप व सेक्टोरिअल फंड (इन्फ्रास्ट्रक्चर) हे मोठय़ा प्रमाणातील गुंतवणुकीसाठी अधिक जोखमीचे ठरतात. युलिप म्युच्युअल फंडात म्हणजे समभाग गुंतवणुकीत प्रमाणापेक्षा अधिक रक्कम गुंतविणे.