फंडाविषयक विवरण
फंडाचा गुंतवणूक प्रकार    :    रोखे व समभाग केंद्रीत गुंतवणूक करणारा बॅलन्स्ड फंड
जोखीम प्रकार     :    समभाग व रोखे अशी संमिश्र गुंतणूक असल्याने धोका मध्यम
गुंतवणूक    :    हा फंड रोखे व समभागात गुंतवणूक करतो. ३० जून २०१५च्या फंड विवरणाप्रमाणे (Fund Factsheet)  या फंडाची मालमत्ता ६,२५८ कोटी रुपये आहे.
निधी व्यवस्थापक     :    मनीष गुनवाणी हे या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. गुनवाणी यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण आयआयटी मद्रास येथून घेतले असून त्यांनी वित्तीय व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी, आयआयएम बंगळूरू येथून घेतली आहे. ते आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडात जून २०१० मध्ये दाखल झाले.
गुंतवणूक पर्याय    :    वृद्धी (ग्रोथ) व लाभांश (डिव्हिडंड : पे आऊट व रिइन्व्हेस्ट)
फंड खरेदीची पद्धत    :    1800 200 6666 (एमटीएनएल व बीएसएनएल वगळून) या क्रमांकावर (सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत संपर्क केल्यास कंपनीचा गुंतवणूकदार सेवा प्रतिनिधी संपर्क करेल.

av-08
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाच्या विक्रेत्यामार्फत अथवा http://www.icicipruamc.com या संकेतस्थळावरून थेट खरेदी करता येईल.
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल बॅलेन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज फंड ही योजना गुंतवणुकीसाठी कायम खुली असलेली योजना आहे. ही योजना समभाग केंद्रित बॅलन्स फंड प्रकारात मोडणारी असून योजनेतील निधी रोखे व समभाग या प्रकारात गुंतविला जातो. समभाग व रोखे गुंतवणुकीचे प्रमाण फंड घराण्याच्या एका विशिष्ट सुत्रानुसार ठरते. निर्देशांकाच्या ‘प्राईस टू बुक व्हॅल्यू’ (ढ/इश्) या गुणोत्तरानुसार समभाग व रोखे यांचे एकूण गुंतवणुकीतील प्रमाण ठरते. म्हणजे जसा निर्देशांक वाढत जातो तसे नफा वसुली करून समभाग गुंतवणुकीचे प्रमाण कमी होते. जेणेकरून जोखीम नियंत्रित राहून परताव्याचे प्रमाण व जोखीम यांचा मेळ साधणे शक्य होते. या फंडाच्या उद्दिष्टांनुसार, बाजारमूल्यांनुसार पहिल्या शंभर कंपन्यांतून या फंडाच्या गुंतवणुकीसाठी कंपन्या निवडल्या जातात. फंडाच्या उद्दिष्टांमध्ये जोखीम नियंत्रित करण्यासाठी डेरिव्हेटिव्ह प्रकारांमध्ये गुंतवणुकीचा समावेश आहे.
गुंतवणूक केल्यापासून १८ महिन्यांच्या आत गुंतवणूक काढून घेतल्यास एक टक्का निर्गमन शुल्क (Exit Load) वजा केला जातो. हा फंड समभाग केंद्रित असल्याने गुंतवणूकदारांसाठी लाभांश हा करमुक्त उत्पन्नाचा स्रोत आहे. या फंडाच्या उद्दिष्टांमध्ये एकाहून अधिकवेळा लाभांश जाहीर करण्यास परवानगी असल्याने हा फंड दरमहा लाभांश जाहीर करतो. जे गुंतवणूकदार मासिक उत्पन्न मिळविण्याच्या उद्देशाने गुंतवणूक करू इच्छितात त्यांच्यासाठी या योजनेचा एक पर्याय या फंड घराण्याने उपलब्ध करून दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी एका वर्षांनंतर गुंतवणूक काढून घेतल्यास भांडवली नफा करमुक्त असतो. ही योजना समभाग केंद्रित असल्याने गुंतवणूक करण्यापूर्वी या योजनेच्या अंतर्भूत असणारी जोखीम विचारात घेऊन नंतर गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.
mutualfund.arthvruttant@gmail.com
विद्यमान परिस्थितीत मर्यादित जोखीम असलेले बॅलन्स फंड गुंतवणुकीसाठी योग्य आहेत. गुंतवणुकीचे ‘प्राईस टू बुक व्हॅल्यू’ मॉडेल हे समभाग व रोखे या मालमत्तेच्या दोन प्रकारांचा मेळ साधते. या फंडात समभाग गुंतवणूक ३० ते ८० टक्क्यांदरम्यान असल्याने आपली वित्तीय उद्दिष्टे साध्य करणे सहज शक्य होते.
मनीष गुनवानी
निधी व्यवस्थापक, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड