20 January 2021

News Flash

बाजाराच्या बदलत्या व्यापार चक्रात गुंतवणुकीची संधी

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल बिझनेस सायकल फंड

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल बिझनेस सायकल फंड

मुंबई : बाजारातील व्यापार चक्राला अनुसरून विविध उद्योग क्षेत्र, गुंतवणूकीच्या संकल्पना अथवा बाजारमूल्यानुसार मिळणाऱ्या गुंतवणूक संधींच्या आधारावर, देशातील सर्वात मोठे फंड घराणे आयसीआयसीआय प्रुडेन्शियलने ‘बिझनेस सायकल फंड’ प्रस्तुत केला आहे. या योजनेचा नवी फंड प्रस्ताव (एनएफओ) कालावधी हा २९ डिसेंबर २०२० पासून, १२ जानेवारी २०२१ पर्यंत खुला असेल.

ही एक गुंतवणुकीस कायम खुली असलेली (ओपन एंडेड) समभागसंलग्न योजना आहे, जी बाजार चक्राचे अनुसरण करेल. ही योजना समभाग आणि समभागसंलग्न साधनांमध्ये बदलत्या बाजार चक्रानुरूप अनुकूल उद्योग क्षेत्रात ‘डायनॅमिक’ पद्धतीने मालमत्तेचे विभाजन करून संतुलन साधत राहिल.

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निमेश शहा यांच्या मते, भांडवली बाजारातील परतावा हा सामान्यत: वेगवेगळ्या बाजार चक्राच्या आवर्तनांनुरूप प्रभावित होत असतो. कोणत्याही बाजार चक्राचे, वृद्धी, मंदी, घसरण आणि सुधार असे मुख्यत: चार टप्पे अथवा आवर्तने असतात. या प्रत्येक टप्प्याचे योग्य निदान आणि गुंतवणूकदृष्टय़ा विश्लेषण केले गेल्यास, हर समयी सकारात्मक गुंतवणुकीचे नेमके संकेत हेरता येऊ शकतात.

सध्याच्या बाजार चक्र विद्यमान आवर्तन आणखी किती दिवस सुरू राहिल अथवा किती लवकर ते संपुष्टात येईल, हे समष्टी अर्थव्यवस्थेवर निर्भर असते.  शिवाय या आवर्तनांत सरकारचे वित्तीय शिस्ती अनुषंगाने तुटीवरील नियंत्रण आणि रिझव्‍‌र्ह बँकेच्या मौद्रिक धोरण यांचा कल काय, यालाही महत्त्व असते. ते अभ्यासून गुंतवणुकीसाठी उपयुक्त उद्योग क्षेत्र निर्धारीत करता येऊ शकतात.   वस्तुत: मागील दशकाच्या नेमके उलट, आगामी दशक हे व्याजदर कपातीला अत्यल्प वाव असणारे अर्थात व्याजाचे दर स्थिर राहतील असे दशक असेल. या स्थितीत बाजार चक्रावर केंद्रीत गुंतवणूक धोरण चांगली कामगिरी करू शकेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2020 12:04 am

Web Title: icici prudential business cycle fund financial review zws 70
Next Stories
1 वर्ष नवे, संकल्प नवा
2 बाजाराचा तंत्र कल : नफावसुलीसाठी विक्री महत्त्वाचीच!
3 कर बोध – विवरणपत्र : वेळेवर दाखल न केल्यास?
Just Now!
X