वीस वर्षांपूर्वी काही अभियंत्यांनी मिळून पॉली मेडिक्युअरची स्थापना केली. कंपनीचे उद्दिष्ट भारतामध्ये वैद्यकीय उपकरणांचे उत्पादन करणे आणि ती वाजवी दरात उपलब्ध करणे असे आहे. गेल्या दोन दशकांत कंपनीने आपल्या गुणवत्तेच्या आणि अभियांत्रिकी कौशल्यावर जवळपास सर्वच आवश्यक आणि उपयुक्त वैद्यकीय उपकरणांचे उत्पादन करून वैद्यकीय क्षेत्रात उत्तम नाव कमावले आहे. आपल्या फरिदाबाद येथील अत्याधुनिक कारखान्यातून कंपनी सध्या शंभराहून अधिक उत्पादनांची निर्मिती करते. गेली पाच वष्रे नफ्यात सरासरी वार्षकि २२.३१% वाढ राखणाऱ्या पॉली मेडिक्युअरची आíथक प्रगतीदेखील अपेक्षेप्रमाणे उत्तम आहे. डिसेंबर २०१५ अखेर समाप्त तिमाहीसाठी कंपनीने ९०.५९ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १०.५४ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या तिमाहीच्या तुलनेत तो थोडासा कमी असला तरीही यंदाच्या आíथक वर्षांसाठी कंपनी ४०० कोटी रुपयांची उलाढाल गाठेल अशी अपेक्षा आहे. गेल्या काही वर्षांत तसेच आगामी कालावधीत भारतासारख्या विकसनशील देशांत वैद्यकीय आणि वैद्यकीय सेवा क्षेत्रात उत्तम वाढ अपेक्षित आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात आणि स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत अद्ययावत वैद्यकीय सेवा तसेच रुग्णालये यांच्यासाठी भरीव तरतूद केली गेली आहे. त्यामुळे येती काही वष्रे पॉली मेडिक्युअरसारख्या कंपन्यांसाठी लाभदायी ठरतील अशी आशा आहे. सध्या २८२ रुपयांना उपलब्ध असलेला हा शेअर तुम्हाला येत्या दोन वर्षांत चांगला फायदा मिळवून देऊ शकेल.
123

stocksandwealth@gmail.com