बजाज कॉर्प लिमिटेड
(बीएसई कोड – ५३३२२९)
” २८३.००
वार्षिक उच्चांक/नीचांक :
“२९८.९० / “१९०.००
दर्शनी मूल्य : ” १  
 पी/ई : २१.४७
*  बजाज कॉर्प ही कंपनी शिशिर बजाज समूहाचा भाग असून कुशाग्र नयन बजाज हे या कंपनीचे अध्यक्ष आहेत. ही कंपनी ग्राहकोपयोगी वस्तूंची एक प्रमुख निर्माती आहे.
बजाज कॉर्पने आपला व्यवसाय त्वचेच्या आणि केसांच्या  निगेसाठी वापरावयाची उत्पादने अशा दोन गटात विभागला आहे. या कंपनीची उत्पादने मागील ८० वर्षांपासून ग्राहकांच्या परिचयाची आहेत. केसांच्या काळजीसाठी ‘बजाज कैलाश परबत थंडा तेल’, ‘बजाज आल्मंड ड्रॉप्स’,  ‘बजाज ब्राम्ही आमला केश तेल’, ‘बजाज आमला शिकेकाई केश तेल’ आणि ‘बजाज जास्मीन केश तेल’ या कंपनीच्या नाममुद्रा आहेत. तर त्वचेच्या निगेसाठीच्या ‘बजाज नो मार्क्स क्रीम’, ‘बजाज नो मार्क्स क्रीम फोर ऑईली स्किन’ आणि ‘बजाज नो मार्क्स’ या नाममुद्रेचा विस्तार करून (वेु१ी’ं इ१ंल्ल्िरल्लॠ)  वेगवेगळी आठ उत्पादने उपलब्ध आहेत.
मागील चार तिमाहीपासून कंपनीच्या नफ्यात वाढ दिसून येत आहे. कंपनीने मागील वर्षांत अधिग्रहित केलेल्या ‘नो मार्क्स’ या नाममुद्रेने विकल्या जाणाऱ्या मलमाच्या विक्रीतही वाढ दिसून येत आहे. चालू वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीची विक्रीत १.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. परिचालित (व्याज घसारा व कर पूर्व) नफ्यात  २१.३४ टक्के वाढ झाली आहे. करपश्चात नफा चार टक्क्यांनी वाढला आहे. ‘बजाज आल्मंड ड्रॉप्स’ या नाममुद्रेने विकले जाणारे तेल देशात नाममुद्रांकित तेलाच्या बाजारपेठेतील पहिल्या पाच तेलांपकी एक असून या वर्षांच्या पहिल्या सहा महिन्यात तेलाच्या विक्रीत ३९.२७ टक्के वाढ झाली आहे. ही वाढ प्रामुख्याने भारताच्या ग्रामीण भागातून असलेल्या मागणीमुळे दिसून आली आहे. ‘बजाज आल्मंड ड्रॉप्स’ या नाममुद्रेचा वाटा ६३.३४% आहे. नफावाढीला प्रमुख्याने ‘लाईट लिक्विड पॅराफिन’च्या किंमतीत घट कारणीभूत ठरली. ‘लाईट लिक्विड पॅराफिन’  हा ‘नो मार्क्स’साठीचा प्रमुख कच्चा माल आहे. कंपनीची उत्पादने पंचवीस लाख विक्रेते, सात हजार घाऊक व्यापारी व पंधरा हजार वितरकांच्या जाळ्यामार्फत विकली जातात.
पुढील एका वर्षांसाठी आम्ही ३२५ चे लक्ष्य निर्धारित करून खरेदीची शिफारस करीत आहोत आहोत.
आनंद राठी रिसर्च दलाली पेढीच्या विश्लेषकांकडून
ई-मेलः research@rathi.com

कॉफी उत्पादनाला चालनेच्या सरकारच्या धोरणाचा लाभार्थी
सीसीएल प्रॉडक्ट्स इंडिया लि.
(बीएसई कोड – ५१९६००)
” १३०.४५
वार्षिक उच्चांक/नीचांक :
“१४०.५० / “२६.३०
दर्शनी मूल्य : ” २
 पी/ई : १२.२०
ल्ल सीसीएल प्रॉडक्टस लिमिटेड म्हणजे आधीची कन्सॉलिडेटेड कॉफी होय. या कंपनीची स्थापना १९९४ मध्ये होऊन १९९५ मध्ये कंपनीने उत्पादनास प्रारंभ केला.
कंपनीचे चहा व कॉफीचे मळे आहेत. याच जोडीला कंपनी नाममुद्रांकित तयार (ब्रॅडेड इंस्टंट) कॉफीच्या व्यवसायात आहे. कंपनी स्प्रे कॉफी, ड्राय कॉफी पावडर, ड्राय ग्रॅन्युअल कॉफी, फ्रीज ड्राय कॉफी फ्रीज, लिक्विड कॉफी इत्यादी कॉफी पेयांचे  उत्पादन करते. ही सर्व उत्पादने अरेबिका व रोबस्टा प्रकारच्या कॉफी बियांपासून होते.
सीसीएलचा कारखाना आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात आहे. या कारखान्याची वार्षकि क्षमता वीस हजार मेट्रिक टन असून कंपनीने वेगवेगळ्या उत्पादनांच्या प्रक्रीयेसाठी लागणारे तंत्रज्ञान पुरविण्यासाठी स्वीस व ब्राझीलच्या कंपन्यांशी सहकार्याचे करार केले आहेत.
भारतीय कॉफीला जगभरातून मागणी असते. भारत हा असा एकमेव देश आहे जो अरेबिका व रोबस्टा या दोन्ही प्रकारच्या कॉफीबियांचे उत्पादन करतो. कॉफी उत्पादनात भारताचा जगात सातवा क्रमांक लागतो. जागतिक कॉफी उत्पादनात भारताचा वाटा पाच टक्के असून कॉफी निर्यातीत भारताचा वाटा चार टक्के आहे. सरकारने बाराव्या पंचवार्षकि योजनेत सर्वकष कॉफी विकास प्रकल्प (Integrated Coffee Development Project) हाती घेतला आहे. परिणामी २०१३ मध्ये कॉफीचे सार्वकालिक उच्चांकी उत्पादन ३.३ लाख टन इतके होते. या प्रकल्पाअंतर्गत २०१७ मध्ये या उत्पादनात आणखी सत्तर टक्के वाढीचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे.
चालू आíथक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीच्या विक्रीत मागील वर्षांच्या तुलनेत एकूण पन्नास टक्के वाढ झाली. कंपनीची विक्री मागील वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीतील १६६.०९ कोटींवरून यंदा २४७.२४ कोटी नोंदली गेली.  परिचालित नफ्यात ४४ टक्के वाढ होऊन तो ४.८२ कोटी रुपये इतका झाला. निव्वळ नफा १६.२४ कोटींवरून वाढून २६.१४ कोटी रुपये इतका झाला. ही वाढ ५७ टक्के इतकी आहे.
पुढील एका वर्षांसाठी आम्ही १५५ रुपयांचे लक्ष्य निर्धारित करून खरेदीची शिफारस करीत आहोत आहोत.
’  ‘फर्स्ट कॉल इंडिया’च्या समभाग संशोधकांकडून
ई-मेल :  info@firstcallindia.com