28 October 2020

News Flash

बंदा रुपया : वाहन क्षेत्रातील प्रेरक नवप्रवाह

आखाती देशात उत्पादने निर्यात करण्याचा अभिषेक यांचा मानस आहे.

अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर अभिषेक मुगळीकर या तरुणाने काही वर्षे एका खासगी कं पनीमध्ये नोकरी के ली. मात्र, स्वत:चा व्यवसाय करण्याची इच्छा असल्याने त्यांनी प्रोपेलिस कण्ट्रोल सिस्टिम्स प्रा. लि. या कं पनीची नोंदणी के ली. लोखंड, स्टीलच्या उत्पादनांना गेलेले तडे ओळखता येण्यासाठीची उत्पादने, वाहन, तेल उद्योगांच्या कारखान्यांमध्ये कॉम्प्रेस एअर पाइपिंग, ऑइल पाइपिंग यांबाबत उपाययोजना आणि इतर कं पन्यांची उत्पादने आयात करून ग्राहक प्रणाली तयार करून देण्याचे काम या त्यांच्या कंपनीकडून के ले जाते. वाहन उद्योगक्षेत्राशी संबंधित फर्म असल्याने काम मिळविण्यासाठी पिंपरी चिंचवड, चाकण अशा पुण्यातील उद्योगपट्टय़ात अभिषेक यांनी अक्षरश: पायपीट के ली. त्यानंतर अवघ्या दीड वर्षांत महिंद्र, टोयोटा, मारुती, ह्य़ुंडाई अशा वाहन उद्योग क्षेत्रातील बडय़ा कं पन्यांच्या कारखान्यांची कामे त्यांना मिळाली. विविध राज्यांत ही उत्पादने पोहोचली आहेत. आखाती देशात उत्पादने निर्यात करण्याचा अभिषेक यांचा मानस आहे.

अभिषेक हे मूळचे हैदराबादचे. बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुणे गाठले. सन २००६ मध्ये तत्कालीन पुणे विद्यापीठातून त्यांनी यांत्रिकी अभियांत्रिकीची पदवी संपादन के ली. अभिषेक यांची स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आधीपासूनच होती. मात्र, थेट व्यवसाय सुरू करण्याआधी हायड्रॉलिक अ‍ॅण्ड न्यूमॅटिक नियंत्रण प्रणालीच्या या क्षेत्रातील अनुभव घेण्यासाठी त्यांनी पदवीनंतर चार वर्षे एका खासगी कं पनीमध्ये नोकरी के ली. नोकरीच्या चार वर्षांत हायड्रॉलिक प्रणालीतील खाचाखोचा माहिती झाल्या. तसेच चांगला अनुभव गाठीशी आला. त्यानंतर नोकरी सोडून २०१० मध्ये प्रोपेलिस कण्ट्रोल सिस्टिम्स या फर्मची त्यांनी स्थापना के ली. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी फर्मची प्रा. लि. कं पनी म्हणून नोंदणी के ली. हायड्रॉलिक अ‍ॅण्ड न्यूमॅटिक क्षेत्रातील अनुभव असल्याने अभिषेक यांनी त्याच क्षेत्रातील यंत्रांच्या कामांना सुरुवात के ली आणि अल्पावधीतच पुण्यासह विविध वाहन उद्योग क्षेत्रातील अठरा कारखान्यांच्या ऑटोमेशनची कामे अभिषेक यांना मिळाली.

वाहन उद्योगामध्ये स्टीलची अनेक उत्पादने वापरली जातात. या स्टीलच्या उत्पादनांना तडा, भेग गेली आहे किं वा कसे? हे तपासण्याचे उत्पादन अभिषेक यांनी तयार के ले आहे. व्यवसाय सुरू के ला तेव्हा वाहन उद्योग क्षेत्र भरभराटीला आले होते. या क्षेत्रात हायड्रोलिक अ‍ॅण्ड न्यूमेटिक उत्पादने वापरली जातात. ऑटोमोटिव्ह कं पन्यांना जलदगतीने त्यांची उत्पादने तयार करावी लागतात. तशी कामे करणाऱ्यांनाच या क्षेत्रातील कामे मिळतात. व्यवसाय सुरू के ल्यानंतर अभिषेक स्वत: पिंपरी-चिंचवड, भोसरी, चाकण अशा पुण्यातील औद्योगिक पट्टय़ांमध्ये वाहन उद्योगाशी संबंधित विविध कं पन्यांमध्ये फिरले. कारखान्यांमध्ये देखभाल दुरुस्तीचे काम, उत्पादनांशी संबंधित विभाग कोण पाहते, कोणती उत्पादने वापरली जातात. अशा प्रकारची माहिती त्यांनी घेतली. या सर्व प्रक्रियेनंतर वाहन उद्योगाच्या कारखान्यांत कोणकोणती उत्पादने वापरतात, बाजारपेठ यांचा साधारण अंदाज त्यांना आला. तसेच आपसुकच बाजारपेठेचा अभ्यास करण्याची संधी त्यांना मिळाली. व्यवसायाचा कोणताही अनुभव गाठीशी नसल्याने आपली उत्पादने वापरून पाहण्यासाठी विविध कं पन्यांना साकडे घालावे लागले. अखेर पिंपरी-चिंचवडमधील एका खासगी कं पनीने अभिषेक यांची उत्पादने चाचणीसाठी मागवून घेतली. त्यासाठीही अनेक अटी, शर्ती घातल्या. उत्पादनांची चाचणी के ल्यानंतर याच कं पनीने त्यांच्याकडे पहिली मागणी नोंदवली. त्यानंतर फु गेवाडी येथील कारखान्याचे काम अभिषेक यांना मिळाले. चांगले परिणाम दिसून येत असल्याने याच कं पनीच्या पुण्यातील आठ कारखान्यांमध्ये काम करण्याची मागणी आली. अशा प्रकारे महिंद्र, ह्य़ुंडाई, मारूती, टोयोटा अशा विविध वाहन उद्योग क्षेत्रातील कं पन्यांची कामे त्यांना मिळत गेली.

प्रोलाँग हा अमेरिके तील ल्युब्रिकं ट अ‍ॅडिटिव्ह विक्री करणारा मोठा ब्रॅण्ड आहे. त्याचे संपूर्ण भारतातील वितरण प्रोपेलिसने घेतले आहे. हैदराबाद येथे प्रोपेलिसची एक शाखा आहे. अभिषेक सांगतात, ‘‘माझ्याबरोबर श्रीधर वर्तक हेदेखील भागीदार आहेत. श्रीधर हे माझे मामा असून ते हैदराबाद येथून कं पनीचे कामकाज पाहतात. त्यांना विपणन आणि विक्री या क्षेत्रातील खूप वर्षांचा अनुभव आहे, त्यामुळे ते ही कामे पाहतात. तर, उत्पादन, प्रशासन ही कामे मी स्वत: पाहतो.’’

नऱ्हे येथे कं पनीचा वर्कशॉप आहे. हैदराबाद येथे के वळ विपणनाचे कार्यालय आहे. संपूर्ण महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्यातील काही भाग, तेलंगणा, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक, मध्यप्रदेश, छत्तीसगड अशा विविध राज्यात कं पनीची उत्पादने पोहोचली आहेत. ‘प्रोपेलिसची उत्पादने महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात पोहोचवायची आहेत. परदेशात कं पनीची उत्पादने निर्यात करायची आहेत’, असे अभिषेक सांगतात.

टाळेबंदीत संधीचे सोने!

मार्च महिन्यात टाळेबंदी लागू झाल्यानंतर व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता. या काळात काही तरी के ले पाहिजे, या विचाराने त्यांनी यूव्हीसी सॅनिटायझर लाइट बॉक्स तयार के ला. दैनंदिन वापरातील चष्मा, पैशांचे पाकीट, गाडीची चावी अशा वस्तू या बॉक्समध्ये ठेवल्यानंतर त्या सॅनिटाइज के ल्या जातात. वापरून फे कू न द्यायची मुखपट्टी देखील या बॉक्समध्ये ठेवून र्निजतुक करून मग टाकल्यास करोनाचा प्रसार थांबवण्यात मदत होते. हा बॉक्स प्रोपेलिस आणि आयआयटी गुवाहाटी यांनी एकत्रित विकसित के ला आहे. या उत्पादनाची सेंट्रल सायंटिफिक इंस्ट्रय़ुमेंट्स ऑर्गनायझेशन (सीएसआयओ) या सरकारी संस्थेकडून चाचणी के ली आहे. त्यामध्ये करोनासह ९९.९९ टक्के  जंतू मरतात, हे सिद्ध झाले आहे. आयआयटी गुवाहाटीचे डॉ. हर्ष चतुर्वेदी आणि डॉ. चारू मुंगा, श्रीधर वर्तक, स्वत: अभिषेक यांनी हा बॉक्स तयार के ला आहे. या बॉक्सची किं मत पाच हजार रुपये आहे. हाच बॉक्स तयार करणाऱ्या कं पन्यांपेक्षा वाजवी दरात हा बॉक्स उपलब्ध करून दिला आहे. आतापर्यंत ३५० बॉक्स महाराष्ट्रात सर्व किरकोळ विक्रे त्यांकडे, तर दिल्ली, गुजरात, उत्तरप्रदेश, गुवाहाटी, बेंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नई अशा विविध राज्यांत विक्री के ली आहे. डॉ. चतुर्वेदी यांच्या माध्यमातून भारतीय लष्कराकडूनही मागणी झाल्यानंतर त्यांना विनामूल्य हा बॉक्स पाठवून देण्यात आला आहे. रेल्वे, शाळा सुरू झाल्यानंतर तेथेही हा बॉक्स उपलब्ध करून दिला जाणार आहे.

अभिषेक अविनाश मुगळीकर               

 प्रोपेलिस कण्ट्रोल सिस्टिम्स प्रा. लि. पुणे

* व्यवसाय :  नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग  (एनडीटी) उपकरणे आणि वस्तू

* कार्यान्वयन : २०१०  साली

* मूळ गुंतवणूक :      २० लाख रु. (स्व-भांडवल)

* सध्याची उलाढाल : वार्षिक दीड कोटी रुपये

* संकेतस्थळ :  www. ontrolsystems.co.in

– प्रथमेश गोडबोले

लेखक ‘लोकसत्ता’चे पुणे जिल्हा प्रतिनिधी 

prathamesh.godbole@expressindia.com

आपणासही या सदरासाठी नवउद्योजकाची शिफारस, सूचना ई-मेल: arthmanas@expressindia.com वर कळविता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 24, 2020 1:01 am

Web Title: industrialist from maharashtra maharashtra industrialists successful marathi industrialists zws 70
Next Stories
1 थेंबे थेंबे  तळे साचे :  गुंतवणुकीतील सातत्य म्हणजे नक्की काय?
2 बाजाराचा तंत्र कल : तेजीला अटकाव
3 अर्थ वल्लभ :  निसरडय़ा धावपट्टीवरील शतकवीर – शिवामूठ – ४
Just Now!
X