डिसेंबर महिना हा शेअर बाजारासाठी तसा नरमाईचाच असतो. कारण परदेशी गुंतवणूकदारांची वर्षांअखेर आणि नाताळ यामुळे गुंतवणूक मंदावते. त्यातून यंदा तर अमेरिकेची मध्यवर्ती बँक – फेडरल रिझव्‍‌र्ह व्याज दर वाढवण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर शेअर बाजारात थोडे दिवस तरी मंदीचे वातावरण राहील असे वाटते. अर्थात तेजीचे पर्व हे दीर्घकालीन असल्याने या किंवा अशा नरमाईचा उपयोग ब्लू चिप कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्याकरिता करावा.
ब्ल्यू चिप शेअर्स म्हटले की, पटकन डोळ्यापुढे नावे येतात ती लीव्हर, कोलगेट, जिलेट, मॅरिको अशी. आज यापकीच कोलगेट हा शेअर मी पोर्टफोलिओसाठी सुचवत आहे. कोलगेटबद्दल जास्त काही लिहायची गरज नाही. केवळ गुंतवणूकदारच नव्हेत, तर अगदी सामान्य माणसालासुद्धा कोलगेट कंपनी आणि तिची उत्पादने माहिती असतील. टूथ पावडर, टूथपेस्ट, साबण, श्ॉम्पू, शेिव्हग क्रीम इ. उत्पादनांत कोलगेटची बाजारपेठ मोठी आहे. भारतामध्ये १९३७ पासून कोलगेट आपली उत्पादने विकत आहे. १९७८ मध्ये ‘आयपीओ’द्वारे सामान्य जनतेला आपल्या समभागांचे वाटप कंपनीने करून बाजारात सूचिबद्धता मिळविली. तेव्हाचे भागधारक आज करोडपती झाले आहेत. कायम बोनस आणि सतत लाभांश देणाऱ्या या कंपनीमध्ये ज्या गुंतवणूकदारांनी ६,५०० रुपये १९७८ मध्ये गुंतवले असतील आणि ते शेअर्स विकले नसतील, तर त्यांच्या समभागांची आजची बाजारातील किंमत सध्या ३ कोटी रुपयांच्या आसपास असेल, तर केवळ लाभांशाद्वारे त्याला सुमारे ३५ लाख रुपये मिळाले असतील. असो. अजूनही नवीन गुंतवणूकदारांनी निर्धोक गुंतवणुकीसाठी या शेअरमध्ये गुंतवणूक करायला काहीच हरकत नाही.
आज जगातील सर्वोत्तम कंपन्यांत कोलगेटचे नाव घेतले जाते. भारतातही विश्वासार्हता कमावलेला आणि उत्तम ब्रँड असलेल्या कोलगेटचा ओरल केअरमध्ये देशांतर्गत जवळपास ५७% बाजार हिस्सा असून सर्वच उत्पादने आज आघाडीवर आहेत. गेल्याच वर्षी गुजरातमधील साणंद येथे उत्पादन चालू करून कंपनीने आपल्या उत्पादन केंद्रांची संख्या पाचवर नेली आहे. यंदाच्या आíथक वर्षांत पुन्हा १:१ प्रमाणात बोनस समभाग देऊन आपल्या भागधारकांना कायम खूश ठेवणाऱ्या कंपनीचा सध्याचा बाजारभाव ९५० च्या आसपास आहे. पुढील आíथक वर्षांत जीएसटी लागू झाल्यावर त्याचा फायदा कंपनीला निश्चित होईल.
एक सुरक्षित आणि दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून कोलगेटचा विचार जरूर करावा.

Untitled-2

 

– अजय वाळिंबे
stocksandwealth@gmail.com