01 December 2020

News Flash

बाजाराचा तंत्र कल : शिट्टी मारली..

सेन्सेक्सवर ३७,४०० आणि निफ्टीवर ११,१०० चा भरभक्कम आधार असेल.

(संग्रहित छायाचित्र)

आशीष ठाकूर

निफ्टीवरील ११,६०० च्या नाक्यावर, सुसंस्कृत, शालीन, घरंदाज अशा इन्फोसिसला ‘विसलब्लोअर’नी शिट्टी मारून छेड काढल्याने संवेदनशील अशा इन्फोसिसचा, जो काही विनयभंग झाला त्या दु:खात इन्फोसिसचा समभाग आणि भांडवली बाजारही धाय मोकळून रडला. त्या अश्रूंच्या महापुरात त्या वेळेला चालू असलेली तेजी पार वाहून गेली. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स ३९,०५८.०६

निफ्टी ११,५८३.९०

आज अर्थव्यवस्थेच्या बाबतीत अकबर-बिरबल कथेतील पोपटाच्या गोष्टीची आठवण होते. त्या कथेत अकबराच्या आवडत्या पोपटाचे निधन झाले हे सांगायला कोण धजावत नाही, पोपटाच मौनव्रत आहे, पोपटाला ध्यानात ब्रह्मानंद टाळी लागली आहे असे सांगितले जाते. त्याच प्रकारे अर्थव्यवस्थेत, औद्योगिक आघाडीवर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कारणांमुळे मंदी आहे, असे सांगितले जात आहे. त्यात आपल्याकडे आता ओल्या दुष्काळाची भर पडत आहे. अतिरिक्त पावसाने पीक वाहून गेल्याने, दुबार पेरणी होऊन जानेवारी अखेरीपर्यंत पीक हातात येतील, तसेच मुबलक पाण्यामुळे आता खरीप आणि रब्बी पिके एकापाठोपाठ एक येऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती येईल. तसेच अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांची प्रत्यक्ष फळही आर्थिक वर्षांच्या शेवटच्या तिमाहीत दिसतील. हे आर्थिक आघाडीवरचे वास्तव निर्देशांकाच्या भाषेत मांडायचे तर..

सेन्सेक्सवर ३७,४०० आणि निफ्टीवर ११,१०० चा भरभक्कम आधार असेल. निर्देशांक सातत्याने सेन्सेक्सवर ३९,००० आणि निफ्टीवर ११,६००च्या वर टिकल्यास सेन्सेक्सवर ३९,८०० आणि निफ्टीवर ११,८५०चे वरचे लक्ष्य असेल. अधेमधे नवीन उच्चांकाचे कोंबडं आरवेल पण ते सेन्सेक्सवर ३९,८०० आणि निफ्टीवर ११,८५० च्या स्तरावर सातत्याने टिकते का? हे पाहणे जरुरीचे असेल. दिवाळीच्या आनंदाच्या दिवसांत आताची पडझड ही सेन्सेक्सवर ३८,४०० आणि निफ्टीवर ११,४०० स्तराचा आधार घेत पुन्हा एकदा सेन्सेक्स ३९,८०० आणि निफ्टी ११,८०० च्या स्तराला गवसणी घालेल.

आगामी तिमाही निकालांचा वेध

१) टाटा केमिकल्स लिमिटेड

* तिमाही निकालाची तारीख : बुधवार, ३० ऑक्टो.

* २५ ऑक्टोबरचा बंद भाव : ६०९.४० रुपये

* निकालानंतर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ५९० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ५९० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ६३० रुपये. भविष्यात ५९० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ७०० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल

ब) सर्वसाधारण निकाल : ५९० ते ६३० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल

क) निराशादायक निकाल : ५९० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत प्रथम ५६० रुपये व त्यानंतर ५०० रुपयांपर्यंत घसरण

२) टाटा ग्लोबल बीव्हरेजेस लि.

* तिमाही निकालाची तारीख : बुधवार, ३० ऑक्टो.

* २५ ऑक्टोबरचा बंद भाव : २७९.३० रुपये

* निकालानंतर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर : २७० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २७० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २९० रुपये. भविष्यात २७० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ३३० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : २७० ते २९० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल

क) निराशादायक निकाल : २७० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत प्रथम २५० व त्यानंतर २२५ रुपयांपर्यंत घसरण.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2019 1:45 am

Web Title: infosys market trends share market trends senesex nifty abn 97
Next Stories
1 नावात काय? : ‘पॉन्झी स्कीम’
2 माझा पोर्टफोलियो : मुहूर्ताची खरेदी
3 नियोजन भान : सुविनियोगात समृद्धी
Just Now!
X