विमा उतरवणे म्हणजे आपल्यावरील जोखीम विमा कंपनीवर सोपवणे. यासाठी विमा कंपनीला ठरावीक रक्कम दरवर्षी भरावी लागते. तुमच्या दृष्टीने ही खर्चीक बाब असू शकते. आíथक नियोजनकार कोणती जोखीम आपण बाळगावी व कोणती जोखीम विमा कंपनीकडे हस्तांतरित करावी याचे मार्गदर्शन करतो. सर्वागाने विचार करतो. म्हणूनच याचे नाव संपूर्ण सुरक्षा आहे.
आíथक नियोजन करताना अशिलाचे उत्पन्न, खर्च व मालमत्ता, देणी-जबाबदाऱ्या आदी विचारात घेतले जाते. आणि त्या आधारे उद्दिष्टांसाठी आíथक नियोजन केले जाते ती उद्दिष्टे विविध असतात; परंतु प्रत्येकाची सामायिक उद्दिष्टे खालीलप्रमाणे सांगता येतील :
१. जोखीम नियोजन
२. निवृत्ती नियोजन
३. कर नियोजन
४. गुंतवणूक नियोजन
५. वारस हक्क नियोजन
विमा प्रतिनिधी हे जोखीम नियोजन केवळ आपल्याजवळ असलेल्या ठरावीक योजनांपर्यंतच मर्यादित ठेवतात. आयुर्वमिा व आरोग्य विमा यापुढे जाऊन विचार केला जात नाही. आíथक नियोजनकार आपल्या ग्राहकांची संपूर्ण सुरक्षा विचारात घेतो. वैयक्तिक स्वरूपात प्रत्येकाशी संबंधित खालील प्रकारचे विमा उपलब्ध आहेत.
विमा उतरवणे म्हणजे आपल्यावरील जोखीम विमा कंपनीवर सोपवणे. यासाठी विमा कंपनीला ठरावीक रक्कम दरवर्षी भरावी लागते. तुमच्या दृष्टीने ही खर्चीक बाब असू शकते. आíथक नियोजनकार कोणती जोखीम आपण बाळगावी व कोणती जोखीम विमा कंपनीकडे हस्तांतरित करावी याचे मार्गदर्शन करतो. सर्वागाने विचार करतो. म्हणूनच याचे नाव संपूर्ण सुरक्षा आहे.
नाव संपूर्ण सुरक्षा. मात्र वरील तक्त्यात लहान मुलांच्या विमा योजनाच नाहीत! कारण त्याची गरजच नाही. कारण आयुर्वमिा कमावत्या माणसाच्या उतारवयाचा असतो. आपल्याला ज्या वस्तूची घरात गरज नाही, अशी वस्तू आपण विकत घेत नाही. मग गुंतवणूक का करावी? बहुतेक वेळा लहान मुलांच्या पॉलिसी ‘इमोशनल ब्लॅकमेिलगने’ गळ्यात मारल्या जातात. लहान मुलांचा आयुर्वमिा ही गरज असेल तर बालक कलाकारांसाठी मुदतीचा विमा (टर्म पॉलिसी) अस्तित्वात का नाही? आíथक नियोजनकार तुमच्या योग्य गरजांचे मार्गदर्शन करतो.
माझ्या एका ग्राहकाचे – पती-पत्नी दोघांचे उत्पन्न भरपूर आहे. डोक्यावर कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही. त्या दोघांना आयुर्वमिा घेऊ नका, असा सल्ला मी दिला होता.
तरुणपणी मोठय़ा रकमेचा मुदतीचा विमा (टर्म पॉलिसी) घ्यावा. हे आता सर्वमान्य तत्त्व आहे. आíथक नियोजनकार म्हणून आम्ही हा विमा चार तुकडय़ात घ्यावा, असे सुचवतो. उदा. दोन कोटी मुदतीच्या विम्याची एकच पॉलिसी न घेता ५० लाखांच्या चार पॉलिसी घ्याव्यात. त्याची मुदत ५२ व्या वर्षी, ५५ व्या वर्षी, ५८ व्या वर्षी व ६० व्या वर्षी संपेल. यामुळे तुमचा विम्याचा हप्ता कमी होतो. वाढत्या वयानुसार आपली जबाबदारी कमी होत असते. तसेच वयाच्या त्या टप्प्यावर तुमच्याजवळ त्या रकमेइतकी पुंजी जमा झाली असेल तर गरज नसताना हप्ता भरावा लागतो.
आयुर्वम्यिाची गरज किती याचा अंदाज दोन पद्धतीने घेतला जातो.
१. माणसाच्या आयुष्याची किंमत (उत्पन्न पद्धती)
२. कुटुंबाचा वार्षकि खर्च.
माणसांचे उत्पन्न दरवर्षी वाढत असते म्हणून पुष्कळदा नंतर वाढलेले उत्पन्न विचारात घेऊन पूर्वी आयुर्वमिा देऊन गेलेले विमा प्रतिनिधी पुन्हा नवीन पॉलिसी घ्या म्हणून मागे लागतात. आपले उत्पन्न वाढले म्हणून त्या प्रमाणात घरखर्च वाढत नसतो. उलट जास्त मिळणारे उत्पन्न प्राप्तिकर वजा जाता कोठे तरी गुंतवले जाते. म्हणजे तुमची आयुर्वम्यिाची गरज दरवर्षी कमी होणे अपेक्षित असताना आपण नवीन पॉलिसी घेत असतो.
अपघात विमा :
ही योजना साधारणत: विमा (जनरल इन्शुरन्स) कंपन्यांमार्फत दिली जाते. या योजनेअंतर्गत कोणत्याही स्वरूपात अपघाती मृत्यू ओढवल्यास विम्याची संपूर्ण रक्कम मिळते. यापेक्षाही या योजनेचा मुख्य फायदा अपंगत्वाचे कलम हा आहे. अपघातामुळे काही काळासाठी अपंगत्व आल्यास आपल्याला रजा घ्यावी लागते. दीर्घ काळासाठी रजा झाल्यास रजा विनावेतन होते. आरोग्य विम्याद्वारे तुमचा वैद्यकीय खर्च भरून दिला जातो. मासिक घरखर्चाची सोय कशी करणार? ती सोय या पॉलिसीद्वारे केली जाते. उदा. पाच लाखांचा विमा उतरवल्यास या योजनेअंतर्गत दर आठवडय़ास एक टक्का म्हणजे रु. ५,००० मिळतात आणि हे जास्तीत जास्त १०० आठवडे म्हणजे जवळपास दोन वष्रे मिळतात. याचा वार्षकि हप्ता ५ लाखाला जवळपास रु. १,२०० आहे. मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटात जखमी झालेल्या व्यक्तीला अशी रक्कम दीर्घ काळासाठी मिळत होती.
आज आपण हॉटेलमध्ये गेलो तर हजार रुपये सहज खर्च होतो. मात्र वर्षांला बाराशे रुपये भरून ही योजना घेत नाही. कारण विमा प्रतिनिधी सांगत नाही. का? तर नवीन आरोग्य विमा कंपन्या खूपदा फक्त आरोग्य विमा देतात. इतर योजना त्यांच्याकडे नसतात. वाहनाचा विमा बहुधा वाहन विकत घेताना विक्रेता काढून देतो. त्याचे नूतनीकरण तेथूनच पुढील वर्षांसाठी केले जाते. कोणतीही विमा योजना आपण अभ्यास करून मागायला जात नाही. प्रतिनिधी मागे लागला तरच घेतो. इतर योजनांचा विचार पुढील आठवडय़ात करू.
लेखक ‘सेबी’कडे नोंदणीकृत असलेले गुंतवणूक सल्लागार आहेत

विमा प्रकार
वैयक्तिक                               मालमत्ता                                देणी/जबाबदारी
१. आयुर्वमिा                           १. वाहन                                   १. सर्वसामान्य
२. आरोग्य विमा                     २. घर                                       २. करारान्वये
३. गंभीर आजार विमा            ३. घरातील वस्तू वसामान         ३. व्यावसायिक नुकसान
४. अपघात विमा                    ४. व्यावसायिक                             भरपाई
                                             ५. व्यवसायातील प्रमुख              ४.कामगार नुकसानभरपाई
                                                 व्यक्तींचा विमा                      ५. अन्य

sebiregisteredadvisor@gmail.com