आपली आíथक उद्दिष्टे तीन प्रकारची असतात. अल्प मुदतीत साध्य करावयाची (१ ते ३ वष्रे) मध्यम टप्प्यात साध्य करावयाची (४ ते ८ वष्रे) दीर्घ मुदतीत av-10साध्य करावयाची (८ वर्षांपेक्षा जास्त). मुलांच्या शिक्षणाची तरतूद ही बहुदा मध्यम किंवा दीर्घ मुदतीत साध्य करण्याच्या उद्दिष्टापकी एक असते.
अल्प मुदतीत साध्य करण्याच्या उद्दिष्टांसाठी रक्कम बाजूला काढताना गुंतवणूक सुरक्षित स्वरूपातील असावी. परंतु मध्यम पल्ल्याची किंवा दीर्घ मुदतीत साध्य करावयाच्या उद्दिष्टांसाठी अवधी जास्त असतो, म्हणून थोडी जोखीम घेणे शक्य असते. आपण आपली जोखीम अवधीनुसार नव्हे तर गरजेनुसार ठरवतो. म्हणजे निवृत्ती नियोजन, मुलांचे शिक्षण या गरजा महत्त्वाच्या म्हणून यासाठी शून्य जोखीम असणाऱ्या पर्यायात म्हणजे आपण पोस्टाच्या योजनांत पैसा गुंतवतो. दीर्घ मुदतीसाठी म्युच्युअल फंडांत ‘एसआयपी’ केल्यास परतावा खूप चांगला मिळतो. मध्यंतरीच्या काळात एखाद्या वर्षी मुदलात खोट आल्यास पुढील काळात ती भरून निघू शकते.
av-11
सध्या एक कुटुंब एक अपत्यचा जमाना आहे. एकुलत्या एक अपत्यास चांगल्या संस्थेतून, चांगले शिक्षण मिळण्यासाठी आपण आपला खिसा मोकळा ठेवण्यास तयार असतो. ही रक्कम उभी करताना क्वचित प्रसंगी आपण प्रॉव्हिडंट फंडातील रक्कमसुद्धा काढतो (निवृत्ती नियोजनासाठी लागणारी रक्कम). आज भारतात लागणाऱ्या शिक्षणाच्या खर्चाची व पुढे महागाईनुसार वाढू शकेल अशा खर्चाची अंदाजे रक्कम तक्त्यांत  दाखवली आहे. वरील आकडेवारी आजच्या महागाई दराच्या नुसार धरलेली आहे. यात कॅपिटेशन फी विचारात घेतलेली नाही. कदाचित पुढील काळात अपेक्षित खर्च वाढू शकतो. मुल जन्मल्यावर ते कोणत्या शाखेत जाणार आपण सांगू शकत नाही. परंतु जास्तीत जास्त खर्चाची तरतूद आधीपासून करून
ठेऊ शकतो.
मागील लेखात जोखीममुक्त गुंतवणूक म्हणून सुकन्या समुद्धी योजना विचारांत घेतली. आज जास्त परताव्याच्या म्युच्युअल फंडांच्या लहान मुलांच्या योजना पाहू. खालील तक्त्यात अशा काही योजनांची माहिती आहे.
सुकन्या समृद्धी योजनेचा आजचा परतावा ९.२ टक्के आहे तर लहान मुलांच्या म्युच्युअल फंडांच्या योजनांचा स्थापनेपासूनचा सरासरी वार्षिक सर्वात कमी परतावा १०.१४% एसबीआय मॅग्नम चिल्ड्रेन बेनिफीट प्लॅनचा आहे. आणि सर्वात जास्त १८.४४% परतावा आयसीआयसीआय प्रुडेन्शियल चाइल्ड केअर गिफ्ट प्लॅनने दिला आहे.
सुकन्या समृद्धी खाते फक्त मुलीसाठी उघडता येते तर लहान मुलांच्या म्युच्युअल फंड योजना मुलगा किंवा मुली सर्वासाठी आहेत. गुंतवणूक करण्यासाठी सुकन्या समृद्धीमध्ये रु. दीड लाखांची कमाल मर्यादा आहे. तशी म्युच्युअल फंड योजनांना नाही. शिवाय दरवर्षी किमान १,००० रु. भरावेच अशी अट म्युच्युअल फंड योजनांना नाही. एकदाच रक्कम भरून चालते किंवा दरमहा एसआयपीप्रमाणे नियमितही भरता येते.
तसेच सुकन्या समृद्धीमध्ये उच्च शिक्षणासाठी बारावीनंतर साधारण १७व्या वर्षी रक्कम काढता येत नाही तर ती १८व्या वर्षीच काढता येते. या उलट म्युच्युअल फंडातील रक्कम कधीही काढता येते (दहावी किंवा नंतरच्या शिक्षणासाठी सुद्धा).
लहान मुलांच्या म्युच्युअल फंड योजनातून रक्कम मुलांच्या १८ वर्षांच्या आत काढल्यास होणारा फायदा वडिलांच्या उत्पन्नात मिळवून वडिलांना आयकर द्यावा लागतो. परंतु हा भांडवली फायदा (कॅपिटल गेन) दीर्घ मुदतीचा असल्यास करमुक्त असतो. मुलांच्या १८ वर्षांनंतर रक्कम काढल्यास ती मुलांच्या खात्यात जमा होते.
आपण लहान मुलांच्या नावावर केलेली गुंतवणूक शक्यतो इतर गरजांसाठी वापरत नाही. किंवा वापरली जाऊ नये याच उद्देशाने त्यांच्या नावाने करतो. परंतु मुलांच्या शिक्षणासाठी आपल्याच नावावर एस्आयपी चालू करावी. माझ्या पूर्वीच्या लेखात १५ ते २० वष्रे कालावधीसाठीच्या योजनांमध्ये २० टक्क्य़ांच्या वर परतावा देणाऱ्या योजना सांगितल्या होत्या. त्यातील एखादी निवडून एसआयपी सुरू करावी. मुलांच्या शिक्षणाच्या ज्या टप्प्यावर रक्कम लागणार असेल त्या सुमारास एसआयपी बंद होईल असा कालावधी निवडावा.
लेखक सेबीकडे नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार
sebiregisteredadvisor@gmail.com