यंदाची दिवाळी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना नक्कीच चांगली गेली असणार. शेअर बाजार निर्देशांक रोज नवनवीन उच्चांक प्रस्थापित करत असल्याने सध्या उत्साहाचे वातावरण आहे. दिवाळीत काय खरेदी करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरीही खर्च करायचा की गुंतवणूक हे महत्त्वाचे आहे.
५५,००० रुपयांचा आयफोन घेणे फायद्याचे की त्याच किमतीत लास्रेन अँड टुब्रो, सन फार्मासारखे शेअर्स घ्यायचे हे तुम्हीच ठरवा. यंदाच्या वर्षांत याच स्तंभातून सुचवलेल्या शेअर्सपकी काही शेअर्सचा आढावा आपण पुढील लेखांतून घेणारच आहोत. मात्र गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात उत्साहाने निवडक शेअर्सची खरेदी/ विक्री चालूच ठेवावी. टीव्हीएस श्रीचक्र ही टू/थ्री व्हीलर्स टायर्सचे उत्पादन करणारी प्रसिद्ध टीव्हीएस समूहाची कंपनी आहे. मदुरई आणि उत्तराखंड येथील रुद्रपूर येथून उत्पादन करणारी ही कंपनी अतुल ऑटो, बजाज ऑटो, हीरो मोटोकॉर्प, होंडा स्कूटर्स, मिहद्र आणि अर्थात टीव्हीएस इत्यादी कंपन्यांना टायर्सचा पुरवठा करते.
उत्पादनांचे कंपनी आपल्या ३४ डेपोंतून आणि २४०० डीलर्सतर्फे विपणन करते. गेल्या वर्षांत सुमारे१९७ कोटींची निर्यात करणाऱ्या या कंपनीची निर्यात प्रामुख्याने अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेत होते. सध्या उत्तम पावसामुळे टू व्हीलर्स कंपन्यांची विक्री वाढत आहे याचा प्रत्यक्ष फायदा टीव्हीएस श्रीचक्रला होईल. रुपया अवमूल्यनचाही फायदाच झाल्याने यंदाचे सहामाहीचे आर्थिक निकालही चांगलेच असतील अशी अपेक्षा आहे. गेल्या आर्थिक वर्षांत १,४७६ कोटी रुपयांच्या विक्रीवर ३५.६६ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावणाऱ्या या कंपनीकडून यंदा भरीव कामगिरी अपेक्षित आहे. उत्तम प्रवर्तक, चांगले आíथक निष्कर्ष आणि पुस्तकी मूल्यापेक्षाही कमी किमतीत उपलब्ध असलेला हा शेअर गुंतवणुकीसाठी सुरक्षितच नव्हे तर फायद्याचाही वाटतो. आज सुचवलेला शेअर हा सध्या स्मॉल – कॅप प्रकारातील असला तरीही हा शेअर आगामी काळात मिड – कॅप होण्याची शक्यता आहे.