काही जणांचे उत्पन्न इतके अपुरे असते की हातात बचत म्हणून काही राहत नाही. बचत करणे अत्यंत गरजेचे आहे, हे उशिराने ध्यानात येते. देर आये, दुरूस्त आये या उक्तीनुसार उशिरा का होईना शेवटची दहा वष्रे तरी राजाराम यादव नियोजन करू इच्छितात हे कौतुकास्पदच..

आज ज्यांचे नियोजन जाणून घेणार आहोत ते राजराम यादव (४५) हे जरी नावाने िहदी भाषिक भासत असले तरी ‘लोकसत्ता अर्थ वृत्तान्त’चे वाचक आहेत. त्यांचे वडील रामाकीर यादव (७३) हे भायखळ्याच्या ‘न्यू सिटी मिल्स’मध्ये कामगार होते. राजाराम यादव यांचे बालपण शिवडीत गेले. सध्या वास्तव्य वडाळा भागातील संतोष नगर येथे असते. घरात संवादासाठी िहदी भाषा व घराबाहेर सर्व व्यवहाराची भाषा मराठी. साहजिकच मराठीत बऱ्यापकी संवाद साधता येतो. वडाळा येथील एका तयार कपडय़ांच्या कारखान्यात शिलाई कामगार म्हणून काम करतात. सध्या एक शर्ट शिवण्याचे ४० रुपये तर पँट शिवण्याचे ६० रुपये मिळतात. मासिक आमदनी दहा हजारापर्यंत जाते. राजाराम यादव यांचे वडील मूळगावी उत्तर प्रदेशात परतले आहेत. पत्नी राधा (४०) मोठा मुलगा अरिवद (२०) मुलगी मेनका (१७) व धाकटा मुलगा अर्जुन (१५) त्यांच्या सोबत राहतात. अरिवद व मेनका हे आयटीआयमध्ये शिकत आहेत. अरिवद हा संधाता (फिटर) तर मेनका ही यांत्रिकी आरेखक (मॅकेनिकल ड्राफ्ट्समन) हे शिक्षण घेत आहेत. राजाराम यादव हे एका तयार कपडय़ाच्या (गारमेंट) कारखान्यात काम करीत होते. एके दिवशी मालकाने कारखाना बंद करीत असल्याची नोटीस कारखान्याच्या दरवाजावर चिकटवली आणि कारखाना बंद करून टाकला. एकही पसा या बदल्यात मालकाने दिलेला नाही. या अन्यायाविरुद्ध कामगार संघटनेने न्यायालयात दावा दाखल केलेला असून दाव्याचा निकाल लागल्यास काही रक्कम हाती पडेल अशी त्यांना आशा आहे.
यादव यांनी जेव्हा त्यांच्या आर्थिक नियोजनासाठी सर्वप्रथम संपर्क केला तेव्हा एक वाक्य उच्चारले. ‘रोज कमाने का रोज खाने का’ अशी माझी परिस्थिती आहे. जमा खर्चाचा मेळ घालत त्यांची तारेवरची कसरत रोजच सुरू असते. मासिक दहा हजार कमावणारे यादव पाच हजार गावी पाठवितात. स्वत:चा खर्च वजा जाता मासिक अडीच हजाराची शिल्लक राहते. मुलीच्या लग्नाच्या खर्चाची तजवीज केलेली नाही. न्यायालयातील दाव्याचा निकाल लागल्यास काही रक्कम हाती पडेल अशी आशा आहे, नाही तर कर्ज काढावे लागेल. त्यांना त्यांच्या बचतीचे नियोजन करून हवे आहे.
नियोजनाची पहिली पायरी विमा असल्याने त्यांना पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना घेण्याचे सुचविण्यात आले. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना ही समूह मुदतीचा विमा किंवा ग्रुप इन्शुरन्स पॉलिसी टर्म प्लान या प्रकारची योजना आहे. वार्षकि ३३० रुपयांचा हप्ता भरून दोन लाखाचे विमा छत्र मिळविता येते. प्रत्येक वर्षी १ जून ते ३१ मे योजनेचा कालावधी असून दर वर्षी या पॉलीसीचे नूतनीकरण करणे जरूरीचे आहे. राजाराम यादव यांच्या सारख्या कुटुंबाचा मुख्य व एकमेव स्रोत असलेल्या व्यक्तीस या विम्याची अत्यंत आवश्यकता आहे. हा विमा वर्षांच्या मध्येच सुरू करता येत नसल्याने पुढील वर्षी मे महिन्यात या पॉलिसीचा हप्ता भरून या पॉलिसीच्या लाभधारकांच्या समूहात दाखल होणे जरूरीचे आहे. जे कोणी पहिल्या वर्षी या योजनेत दाखल झाले आहेत. त्यांना पुढील वर्षी ३० मे पर्यंत हप्ता भरून दाखल होणे जरुरीचे आहे.
केंद्र सरकारची दुसरी महत्वाची योजना पंतप्रधान सुरक्षा विमा योजना. ही अपघाती मृत्यू झाल्यास वार्षकि केवळ १२ रुपये भरून दोन लाखाचे विमा छत्र मिळणारी योजना आहे. विमा हा नेहमीच एखाद्याच्या ‘ह्युमन लाइफ व्हॅल्यू’वर ठरत असतो. एखाद्या दारिद्य्र रेषेखालील व्यक्तीस या दोन योजना पाच लाखाचे विमा छत्र देतात. अपघाती मृत्यू झाल्यास पाच लाख व नसíगक मृत्यू झाल्यास तीन लाख त्याच्या विमा पॉलीसीतील नामनिर्देशित व्यक्तीस मिळू शकतील. या दोन योजनांच्या अनुषंगाने काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रश्नांची चर्चा या निमित्ताने करणे गरजेचे वाटते.
या योजनेच्या दाव्याचा अर्ज तलाठी, तहसीलदार यांच्यामार्फत करावा लागतो. संबंधित कर्मचारी चिरीमीरी घेतल्याशिवाय अर्ज पुढे पाठवेल असे वाटत नाही. संबंधित कर्मचाऱ्यास देण्यास पसे नसल्याने कदाचित दाव्याचे अर्जही दाखल न होण्याची शक्यता आहे. कुठल्याही योजनेचे फायदे तोटे समजण्यास काही कालावधी जावा लागतो. तसा या योजनेचे फायदे तोटे समजण्यास (दाव्यांची स्वीकृती व पूर्तता) कशी होते हे आजच सांगता येणार नाही. तरीसुद्धा या योजनेत सहभागी होणे जरूरीचे आहे. राजाराम यादव यांनी या योजनेचा जरूर लाभ घ्यावा.
या सदराचे वाचक असल्याने राजाराम यादव यांना म्युच्युअल फंडात व पीपीएफमध्ये बचत गुंतवावी असे वाटते. पीपीएफचा कालावधी दीर्घ असल्याने व मेनकाचे लग्न वर्ष-दीड वर्षांत होण्याची शक्यता असल्याने पीपीएफ टाळण्याचा सल्ला दिला आहे. एचडीएफसी बॅलेन्स व टाटा बॅलेन्स या दोन फंडात प्रत्येकी एक हजाराची एसआयपी सुरू करण्याचा सल्ला दिला.
राजाराम यादव यांना वयाच्या पन्नाशीच्या उंबरठय़ावर उभे असताना आपल्या भविष्यासाठी तरतूद करावी आजपर्यंत काहीच बचत झाली नाही याची रूखरूख वाटल्याने त्यांनी संपर्क केला. काही जणांचे उत्पन्न इतके अपुरे असते की हातात बचत म्हणून काही राहत नाही. बचत करणे अत्यंत गरजेचे आहे, हे उशिराने ध्यानात येते. देर आये, दुरूस्त आये या उक्तीनुसार उशिरा का होईना शेवटची दहा वष्रे तरी राजाराम यादव नियोजन करू इच्छितात हे सुद्धा कौतुकास्पद आहे. दु:ख कोणालाच चुकलेले नाही. परंतु त्यातून मार्ग काढावयाचा असतो. हे कवी बा. भ. बोरकर यांनी आपल्या एका कोंकणी कवितेत सांगितले आहे. आजच्या नियोजनाच्या निमित्ताने त्यांच्या कवितेच्या ओळींनी आजचा शेवट करू या..

दु:ख कोणांक चुकंना
संसाराची ताप नासतना
पूर्वपुण्य पिकंना

हरिश्चंद्र भवजाळी पडलो
परोपरीन वनवन विडविडलो
बायल, पूत, धन, राज्य व्हगडलो
लागुन ह्या मायणा

भोग जिवा संसारयातना
असलो योग परतून येवचो ना
जळळ्याबगर हे शास्त्र उमजना
तातली जोत जिभना
shreeyachebaba@gmail.com

वसंत माधव कुळकर्णी