पेट्रोल २ रु. प्रति लिटर वाढले किंवा कांदा ४५ रु. किलो झाला की आपली काटकसर सुरू होते. वस्तुस्थिती जरी अशी असली तरी प्रत्येकाला गुंतवणूक करणे अपरिहार्यच आहे. आपल्यापाशी पसा जितका कमी तितका जास्त परतावा देणारी गुंतवणूक करणे गरजेचे आहे. फक्त अतिश्रीमंत लोक भाववाढीच्या दरापेक्षा कमी अशा ठोस परताव्याची चन करू शकतात. पण गुंतवणुकीच्या बाबतीत परताव्याबरोबरच जोखीमही विचारात घेणे अतिशय गरजेचे आहे. गाठी पसा ठेवून निवृत्त व्हायचे असले तर आपली धोका पत्करायची पातळी अभ्यासू वृत्तीने वाढविण्याशिवाय गत्यंतर नाही.

आपण जेव्हा गुंतवणुकीचा विचार करतो तेव्हा जो कोणी म्युच्युअल फंड प्रतिनिधी, विमा विक्रेता, पोस्टातील गुंतवणुकीचा प्रतिनिधी वगरे समोर येतो आणि प्रस्ताव मांडतो. तो आपण मान्य करतो आणि त्या बरहुकूम गुंतवणूक करतो. बहुतेकांना त्या गुंतवणुकीमधील बारकाव्यांची काहीही कल्पना नसते. प्रत्येक प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारची जोखीम असते, हेही कोणाला माहीत नसते. त्याचा परिणाम असा होतो की एक तर नुकसानीला सामोरे जावे लागते किंवा अपेक्षेपेक्षा आणि भाववाढीपेक्षा कमी परतावा प्राप्त होतो. सर्वात खेदाची गोष्ट म्हणजे याची जेव्हा जाणीव होते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. इतर कोणत्याही कारणांसाठी पसे द्यायच्या वेळी दहा वेळा विचार केला जातो. साधा फ्रिज घ्यायचा झाला तरी दोन – चार ठिकाणी वेगवेगळे फ्रिज बघून, त्याची किंमत आणि उपयुक्तता यामधील समतोल साधून खरेदी केली जाते. गुंतवणुकीच्या बाबतीतही परताव्याबरोबरच त्यामधील जोखीमही विचारात घेणे अतिशय गरजेचे आहे. हा समतोल साधताना पहिला प्रश्न स्वत:ला विचारावा ‘मी कितपत धोका पत्करावा?’ ‘माझी कोणत्या थरापर्यंत जोखीम पत्करायची तयारी आहे?’ व्यक्तिगणिक स्वत:ची अशी धोका पत्करायची एक पातळी असते आणि त्यानुसार गुंतवणुकीचा पर्याय ठरवावा लागतो. गुंतवणुकीसाठी मोठा कालावधी असेल आणि निकडीच्या गरजेशिवाय गुंतवणुकीला धक्का लावणार नाही, अशी शिस्त असेल तर आपोआपच संयमाची पातळी वाढत जाते. त्याचबरोबर जोखीम पत्करण्याची क्षमताही वाढते.
गुंतवणुकीच्या क्षेत्रामध्ये नव्याने पदार्पण करणाऱ्यांच्या बाबतीत धोका म्हणजे, माझे काही नुकसान तर होणार नाही ना? मी १०,००० रुपयांची गुंतवणूक केली त्याचे ५,००० रुपये तर होणार नाहीत ना? तसे होणार असेल तर ही फार मोठी जोखीम आहे. मला या भानगडीत पडायचेच नाही. अशी वस्तुस्थिती जरी असली तरी प्रत्येकाला गुंतवणूक करणे अपरिहार्यच आहे. आपल्यापाशी पसा जितका कमी तितका जास्त परतावा देणारी गुंतवणूक करणे गरजेचे आहे. फक्त अतिश्रीमंत लोक भाववाढीच्या दरापेक्षा कमी अशा ठोस परताव्याची चन करू शकतात. त्यांची मूळ गंगाजळीच फार मोठी असते आणि त्यात सतत मोठय़ा प्रमाणात इतकी वाढ होत असते की त्यावर भाववाढीचा फारसा परिणाम होत नाही.
पेट्रोल २ रु. प्रति लिटर वाढले किंवा कांदा ४५ रु. किलो झाला की आपली काटकसर सुरू होते. या क्षुल्लक गोष्टी त्यांच्या खिजगणतीतच नसतात. त्यामुळे आपल्या सारख्यांच्या बाबतीत आíथक ध्येय साध्य करायची असतील आणि गाठी पसा ठेवून निवृत्त व्हायचे असले तर आपली धोका पत्करायची पातळी अभ्यासू वृत्तीने वाढविण्याशिवाय गत्यंतर नाही. जास्त प्रमाणात धोका पत्करला तर मोठय़ा प्रमाणात फायदा होण्याची शक्यता असते. परंतु ठरावीक मर्यादेपर्यंतच. कारण अती धोका पत्करला तर मोठय़ा नुकसानीलाही सामोरे जावे लागते. त्यामुळे धोका आणि फायदा याची पातळी समजून घेणे आवश्यक आहे.
गुंतवणुकीचे विविध पर्याय हे त्या मार्गावरील धोका आाणि फायदा दर्शविणारे थांबे आहेत. एका टोकाला आहेत नियमित आणि ठोस परताव्याचे पर्याय. त्यात ठरावीक रकमेचा स्रोत तर असतोच, त्याचबरोबर गुंतवणुकीच्या रकमेचीही शाश्वती असते. जसजसे पुढे जाल तसतशी अधिक परताव्याची शक्यता असलेले (पण हमी नाही) असे पर्याय उपलब्ध आहेत. अजिबात धोका नसलेले पर्याय म्हणजे पोस्ट ऑफिस किंवा बँकेतील बचत खाते. त्यात १०,००० रुपये ठेवले तर वर्षांनंतर मूळ रक्कम परत मिळण्याची हमी तर असतेच आणि सध्याच्या ४ टक्के व्याजदराने ४०० रुपयेही अतिरिक्त प्राप्त होतात. त्याच १०,००० रुपयांचे ‘क्ष’ कंपनीचे शेअर्स विकत घेतले किंवा १० टक्के मार्जनि भरून (फ्युचर आणि ऑप्शन एक पर्याय) ‘य’ कंपनीचे १,००,००० रुपयांचे शेअर्स घेतले तर त्या व्यवहारांमध्ये कोणत्याही प्रकारची शाश्वती नाही. १०० टक्के नुकसानीचीही शक्यता आहे. परंतु ‘क्ष’ कंपनीच्या शेअर्सच्या व्यवहारात ती कमी आहे आणि ‘य’ कंपनीच्या बाबतीत जास्त आहे. कारण ‘क्ष’ कंपनीच्या बाबतीत फायदय़ाची शक्यता ‘य’ कंपनीच्या व्यवहारापेक्षा फार कमी आहे. त्यामुळे कोणत्या प्रकारच्या पर्यायामध्ये गुंतवणूक करावी, हे ठरविण्याआधी आपली धोका पत्करण्याची पात्रता आणि गरज हे पडताळून पाहणे आवश्यक आहे. ‘य’ कंपनीच्या बाबतीत (१०,००० रुपयांची मार्जनि जमा करून १,००,००० रुपयांची खरेदी) दोन टोकाच्या परिस्थितींची शक्यता आहे.
१) तुमच्या १०,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर काही दिवसांतच १०० टक्के किंवा त्याहीपेक्षा जास्त परतावा.
२) काही दिवसांतच १०,००० रुपयांचे संपूर्ण नुकसान.

गुंतवणूकदारासमोर वेगवेगळ्या परताव्याचे जेव्हा दोन पर्याय असतात आणि त्यापकी कमी धोक्याचा पर्याय तो गुंतवणुकीसाठी निवडतो तेव्हा तो धोका परामुख प्रकारात गणला जातो. असे लोक धोका पत्करायला घाबरतात. त्यामुळे त्यांच्या खात्यात जास्त धोका व जास्त परतावा असलेल्या गुंतवणुकींचा अभाव असतो. हे कमी धोका-कमी परतावा धारणा असलेले गुंतवणूकदार जास्त प्रमाणातल्या परताव्याला मुकतात. त्यांची गुंतवणूक एफडी (मुदत ठेवी) किंवा एनसीडीमध्ये (राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे) असते आणि मिळणारा परतावा भाववाढीपेक्षा कमी असतो.
अशा गुंतवणूकदारांनी काय करावे, धोक्याचे वेगवेगळे प्रकार, स्वत:ची धोक्याच्या संदर्भातील सहिष्णुता वाढविण्याची पद्धत वगरे बाबत पुढील भागात माहिती करून घेऊ या.
(लेखक व्यवसायाने गुंतवणूक व      विमाविषयक सल्लागार आहेत.)