मागील स्तंभातील पहिला लेख प्रसिद्ध झाल्यावर वाचकांच्या प्रतिसादाबाबत शाशंकता होती. हे सदर संपूर्ण वर्षभर वाचकांच्या प्रतिसादावरच चालणार आहे. त्यामुळे प्रतिसादच आला नाही तर काय करायचे असा प्रश्न होता. त्यात किरण सहस्रबुद्धे यांचा प्रतिसाद आला व सहस्रबुद्धे कुटुंब हे या सदराचे पहिले मानकरी ठरले. पहिल्या ईमेलने मिळालेली माहिती व नंतर फोन वर झालेले संभाषण या वर आधारित एक कच्चे नियोजन केले व त्यावर आधारित सल्लाही दिला आहे.
किरण, अनुराधा हे दांम्पत्य व त्यांचे दोन मुलगे – निनाद व इन्द्रदित्य हे या कुटुंबाचे सदस्य आहेत. किरण हे एका खाजगी कंपनीत आहेत निनाद नववीत तर इन्द्रदित्य मोठा शिशु वर्गात आहे. (सदरचा फोटो दोनवर्षां पूर्वीचा आहे.) अनुराधा या ‘मल्टी टास्क वूमन’ आहेत. त्या घर सांभाळण्याबरोबर एलआयसीच्या विमा प्रतिनिधी आहेत. शिवाय मुंबईत शालांत परिक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संस्कृतचे शिकवणी वर्ग त्या घेतात. घराजवळच्या शाळेत संस्कृतच्या अर्धवेळ शिक्षिका म्हणून काम करतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, कुटुंबाच्या वेळा सांभाळून जितके अधिकचे पसे कमाविण्यासाठी त्या घराबाहेर पडतात.
सहस्रबुद्धे कुटुंबियांनी सध्याच्या राहत्या घरा व्यतिरिक्त आणखी एक घर विकत घेतले आहे. या घरासाठी काढलेल्या कर्जाचा रुपये २०,००० रुपयांचा हप्ता दर महिना जातो. या कर्जाची मुदत अजून १५ वष्रे आहे. या घराचा ताबा जून २०१४ पर्यंत मिळणे अपेक्षित आहे. त्यांच्या मते दोन मुलांची सोय करायला हवी म्हणून दुसऱ्या घराचा घाट घातला. किरण यांनी नोकरीच्या सुरुवातीच्या काळात एलआयसीच्या तीन विमा योजना घेतल्या असून त्यातील काही योजनांची मुदतपूर्ती व ‘मनी बॅक’ पसे मिळतील. थोरल्या मुलाच्या शिक्षणाच्या खर्चाची सोय म्हणून या योजना घेतल्या होत्या. या व्यतिरिक्त दुसरी कुठली गुंतवणूक नाही.
किरण यांचे शालेय शिक्षण बोरिवलीच्या गोखले शाळेत तर महाविद्यालयीन शिक्षण अंधेरीच्या एमव्हीएलयु महाविद्यालयात झाले. अनुराधा या लग्न होईपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरला राहिल्या. लग्नानंतर मुंबई व सध्या वास्तव्य नालासोपारा येथे. लग्न झाल्यावर वेगळा संसार थाटला तेव्हा किरण यांनी एक वन रूम किचन सदनिका घेतली. थोडे स्थर्य आल्यावर वनबीएचके घेण्याचा विचार होता. नवीन घर शोधताना २००८ मध्ये सध्याचे घर पसंत पडल्याने ते घर घेतले. वनबीएचके घेण्याचा विचार असताना आधी पाहिलेल्या घरांच्या मनाने स्वस्त वाटल्याने (२००८ च्या मंदीचा असाही फायदा!) थोडी आíथक ओढाताण झाली तरी जास्तीची खोली एक मिळाली म्हणून टुबीएचके घर घेतले. ती जास्तीची खोली निनादची स्टडी रूम झाली आहे. त्यांच्यामते ‘फायनॅनशियल प्लॅिनग’साठी किंवा अन्य गुंतवणुकीसाठी शिल्लकच उरत नाही.
प्रस्तावनेचा जो लेख मागील सोमवारी प्रसिद्ध झाला होता, त्यात म्हटल्याप्रमाणे इंग्रजी माध्यमांनी उभी केलेली ‘फायनॅनशियल प्लॅिनग’ या शब्दाची प्रतिमा व या स्तंभातून केले जाणारे वेगवेगळ्या कुटुबांचे वित्तीय नियोजन यामध्ये जमीन अस्मानाचा फरक रहाणार आहे. या स्तंभात सध्या ज्या आíथक किंवा कौटुंबिक चौकाटीत आहोत ती चौकट न मोडता सध्याच्या चौकटीत आíथक सुरक्षितता किंवा आíथक नियोजनामुळे आपल्या गुंतवणुकीवर अधिक परतावा कसा प्राप्त होईल हे सांगायचे हा यासाराचा उद्देश राहणार आहे. आपल्या गरजा आपण ठरवितो. त्या गरजा योग्य की अयोग्य या वर चर्चा न करता सध्याच्या जीवनशैलीला साजेसे वितीय नियोजनाचे काम या सदरातून करणार आहे.
* किरण खाजगी कंपनीत आहेत व अनुराधा एलआयसीच्या विमा प्रतिनिधी, संस्कृतच्या  शिक्षिका म्हणून काम करतात.
* किरण यांची नोकरीच्या सुरुवातीच्या काळात घेतलेल्या विमा योजनां व्यतिरिक्त दुसरी कुठली गुंतवणूक नाही. काही योजनांची मुदतपूर्ती व ‘मनी बॅक’कालावधीत पसे मिळतील.
* लग्न झाल्यावर किरण यांनी एक वन रूम किचन सदनिका घेतली. थोडे स्थर्य आल्यावर वनबीएचके घेण्याचा विचार असतानाच २००८ मध्ये सध्याचे घर पसंत पडल्याने ते घर घेतले. वनबीएचके घेण्याचा विचार असताना टुबीएचके घर घेतले.
* घरासाठी काढलेल्या कर्जाचा दरमहा रुपये २०,००० रुपयांचा हप्ता अजून १५ वष्रे आहे. तर घराचा ताबा जून २०१४ पर्यंत मिळणे अपेक्षित आहे.
सहस्रबुद्धे कुटुंबियांना सल्ला
सहस्रबुद्धे कुटुंबीयाच्या मालमत्तेचा विचार केल्यास साधारणत: ९७% मालमत्ता ही स्थावर प्रकारात मोडते. नवीन सदनिका घेण्यासाठी त्यांनी घेतलेल्या २५ लाख रुपयांच्या कर्जाची मुदत अजून १५ वष्रे शिल्लक आहे. नवीनच कर्ज घेतले असल्यामुळे व ज्यासाठी कर्ज घेतले ती मालमत्ता ताब्यात न आल्या कारणाने त्या मालमत्तेतून आíथक स्त्रोत निर्माण झालेला नाही.
सध्याच्या परिस्थितीत आवक व खर्च सारखे असल्यामुळे फारशी शिल्लक राहत नाही. त्यामुळे रोकड कमी आहे. प्रथम सध्याच्या स्त्रोतातून रोकड निर्माण करण्याला प्राधान्य असायला हवे.
किरण हे कुटुंबाचे मुख्य आíथक स्त्रोत आहेत. हे ध्यानात घेतल्यास त्यांचे सध्याचे विमा कवच पुरेसे नाही. सध्याच्या विमा योजना सुरु ठेवून नवीन घरासाठी घेतलेले कर्ज लक्षात घेता निदान त्या कर्जाची आणीबाणीच्या प्रसंगी परतफेड करू शकेल इतका तरी हवा. म्हणून त्यांनी खरेदी केलेले नवीन घर ताब्यात आल्यानंतर अधिकचे १० हजार रुपयांचे उत्पन्न सुरु होईल. त्याचे दोन भाग करावे एका भागातून कर्जाची हप्ता फेड वाढवावी व दुसऱ्या भागातून ५० लाख रुपयांचा मुदतीचा विमा (टर्म प्लान) घ्यावा. नवीन घेतलेल्या विम्याचा अंदाजे वार्षकि ३०,००० रुपये हप्ता असेल. हा विमा ऑनलाईन विकत घेतल्यास त्यात आणखी बचत शक्य होऊ शकेल.
किरण यांनी दरमहा १२,००० रुपयांची आवर्ती ठेव योजना सुरु करावी. दिवाण हौसिंग फायनान्ससारखी गृहवित्त कंपनी वार्षकि १०.२५% दराने आवर्ती ठेव सध्या स्वीकारत आहे. याचा उपयोग करून दरमहा किरण यांच्या बचत खात्यातून दरमहा पसे या कंपनीच्या  खात्यात वळते होण्याची सुविधा आहे. आरोग्य विम्याच्या दुष्टीने विचार केल्यास सध्या किरण याना व त्यांच्या कुटुबियांना किरण यांच्या कंपनीने घेतलेल्या विमा योजनेनुसार कर्मचारी व कुटुंबीयांना काही ठराविक आजारपणात झालेल्या खर्चाला विमा कवच आधीच मिळाले आहे. या विमा योजनेखाली कुठल्या आजारावरील खर्चाला संरक्षण लाभले आहे ते पाहून ठेवावे. ही माहिती उपलब्ध नसल्यामुळे निदान तूर्त तरी नक्की सल्ला देता येत नाही.