गाडी फार हळू चालविली तर अपघाताचा धोका कमी, पण पेट्रोलचे नुकसान जास्त होते. आणि फार जोरात चालविली तर अपघाताचा धोका वाढतो आणि पेट्रोलही जास्त प्रमाणात वाया जाते. योग्य मायलेजसाठी एका ठरावीक वेगाची गरज असते. गुंतवणुकीतही धोक्यांचे व्यवस्थापन अशीच तारेवरची कसरत आहे.
गुंतवणुकीच्या बाबतीतील जोखीम किंवा धोका ही संज्ञा सापेक्ष आहे. त्याचबरोबर परतावा आणि जोखीम यांत एक प्रकारचे साधम्र्य आहे. ही गोष्ट लक्षात आली की धोका पत्करायच्या पातळीची कल्पना येते. साधारणत: सर्वात कमी धोक्याची गुंतवणूक म्हणजे बँक किंवा पोस्ट ऑफीसच्या मुदत ठेवी. त्यात सुमारे ८% परताव्याची हमी असते. (परंतु आपल्या गंगाजळीची बाजारी किंमत कमी होत जाते.) जास्त परताव्याची गरज असेल तर व्यवहारी किंवा पूर्वनियोजित जोखमीच्या (calculated risk)पर्यायांचा, म्हणजेच शेअर्स, म्युच्युअल फंड, सोने या प्रकारच्या गुंतवणुकांचा आसरा घ्यावा लागतो. त्यासाठी धोका पत्करायची पातळी वाढवावी लागते. वार्षकि १५% परताव्याची आवश्यकता असेल तर जोखीम जास्त आहे.
परंतु काही वैयक्तिक कारणांमुळे हा धोका पत्करण्यावर अंकुश असेल तर त्याची मर्यादा जाणून घेणे आवश्यक आहे. माझ्या गुंतवणुकीचा अमुक एक भागच मी शेअर्समध्ये गुंतवू शकतो, त्यापलीकडे नाही, याची वैयक्तिक जाणीव करून घ्यावी लागते. ही एक प्रकारची तारेवरची कसरत आहे. कोणत्याही बाजूस जास्त झोक दिला तर नुकसान हे अटळ आहे. त्यामुळे सुरुवातीपासून योग्य मिश्रणाच्या पर्यायांची काळजी घेणे आवश्यक आहे. सोपेपणा म्हणून या संकल्पनेची गाडीच्या मायलेजची तुलना केली तर यातील मर्म लक्षात येईल. गाडी फार हळू चालविली तर अपघाताचा धोका कमी, पण पेट्रोलचे नुकसान जास्त होते. आणि फार जोरात चालविली तर अपघाताचा धोका वाढतो आणि पेट्रोलही जास्त प्रमाणात वाया जाते. योग्य मायलेजसाठी एका ठरावीक वेगाची गरज असते.
धोक्याच्या संदर्भात सहिष्णुतेचे दोन प्रकार आहेत. आíथक सहिष्णुता हा निव्वळ आकडय़ांचा खेळ आहे. माझ्याजवळ किती पसे आहेत आणि त्यापकी किती पशाचे नुकसान सहन करायची माझी ताकद आहे याचा विचार करून गुंतवणुकीच्या पर्यायांची निवड करावी लागते. जास्त नुकसान सहन करायची ताकद असेल तर पर्याय आहेत- जसे प्रमाणात चढउतार संभवतात असे शेअर्स किंवा इक्विटी ग्रोथ फंड किंवा करन्सी मार्केट. कमी प्रमाणात नुकसान भोगायची तयारी असेल तर पर्याय आहेत- कमी प्रमाणात चढउतार होत असलेले शेअर्स, इन्डेक्स फंड किंवा गोल्ड/ इन्डेक्स ईटीएफ. या पर्यायांमध्ये पहिल्यापेक्षा थोडा कमी परतावा प्राप्त होतो, परंतु नुकसानीचे प्रमाणही कमी असते.
२) मानसिक सहिष्णुता – बऱ्याच गुंतवणूकदारांमध्ये धोक्याच्या संदर्भातील आíथक सहिष्णुता असते, परंतु त्यांची जास्त प्रमाणात धोका संभावणाऱ्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करायची मानसिक तयारी नसते. अशा परिस्थितीत अशा प्रकारच्या पर्यायांपासून दूर राहणे हिताचे आहे. त्यावर उपाय म्हणजे मानसिक संतुलन बिघडणार नाही अशा गुंतवणुकीच्या पर्यायांपासून सुरुवात करावी आणि हळूहळू जास्त धोक्याच्या पर्यायांचा विचार करावा.
धोक्याच्या पातळीचे मोजमाप हे परिपूर्ण शास्त्र (Solid science)) नाही. साधारणत: त्याचे पाच प्रकार केले जातात.
*  कट्टर रुढमार्गवादी
(Very Conservative)
या गुंतवणूकदारांना कोणत्याही क्षणी आपल्या मुदलात जरासुद्धा घट झालेली सहन होत नाही.
*  माफक रूढ मार्गवादी (Moderately Conservative)
हे गुंतवणूकदार थोडाफार धोका पत्करायला तयार असतात. त्यांची अपेक्षा कट्टर रूढ मार्गवाद्यांपेक्षा थोडा जास्त परतावा मिळावा इतकीच असते.
*  मध्यम (Moderate)
या गटातील गुंतवणूकदार ना आक्रमक, ना रूढ मार्गवादी अशा प्रकारांत मोडतात. पारंपरिक आणि जोखीमयुक्त पर्याय याचे संतुलन अशा प्रकारचे असते की जास्त परताव्याची शक्यता वाढते, परंतु नुकसानीची शक्यता कमी राहील याची काळजी घेतलेली असते. त्यांना प्राप्त होणारा परतावा साधारणपणे भाववाढीपेक्षा जास्त प्रमाणात असतो.
*  माफक आक्रमक (Moderately Agressive)
शेअर बाजारातील तेजीमध्ये बाजारापेक्षा जास्त परतावा मिळविण्याची इच्छा असलेले आणि त्यासाठी मंदीच्या काळात होणाऱ्या कागदी नुकसानीला सामोरे जाण्याची तयारी असलेले गुंतवणूकदार या गटात मोडतात.
*  आक्रमक (Agressive)
हे गुंतवणूकदार खरेतर अतिआक्रमक असतात. ध्येय एकच, बाजाराच्या दुप्पट किंवा त्याहीपेक्षा जास्त परतावा मिळविणे. त्यासाठी ते धोक्याची पर्वा करत नाहीत. त्यांना अगदी थोडय़ा वेळात अंबानी किंवा टाटा व्हायचे असते. त्यामुळे अनेकदा त्यांची पुंजी अर्धी किंवा त्यापेक्षा कमी झालेली असते. वेगवेगळया प्रकारच्या अनुभवांतून योग्य ते धडे घेऊन त्यांचा कौशल्यपूर्ण वापर केला तर त्यांचा परतावा फार वरच्या दर्जाचा असतो.
सारांश
परतावा आणि धोका यांचे अतूट नाते आहे. गुंतवणुकीच्या प्रत्येक पर्यायात थोडय़ाफार प्रमाणात धोका हा असतोच. रिझव्‍‌र्ह बँकेच्या रिलीफ बाँडमध्ये तो सर्वात कमी असतो तर फालतू कंपन्यांच्या शेअर्समध्ये (Penny Stocks) किंवा बिहार, मिझोराममधील रिअल इस्टेटच्या गुंतवणुकींमध्ये तो फार मोठय़ा प्रमाणात असतो. धोक्याला घाबरून त्यापासून पळ काढण्यापेक्षा त्याला सामोरे जाऊन त्यातून मिळणाऱ्या अनुभवांतून त्यावर मात करण्याचे कौशल्य अंगी बाणून घेतले तर वेळोवेळी उपलब्ध होणाऱ्या संधींचा फायदा पदरी पाडून घेणे सहज शक्य होते.
स्वत:ची धोक्याची पातळी जाणून घेण्यासाठी काही मूलभूत प्रश्नांची यादी
अ) माझ्या गुंतवणुकीत २०% पेक्षा जास्त चढ-उतार झाले तर माझी झोप बिघडते.
१. अगदी बरोबर,  २) बरोबर, ३) उदासीन, ४) चूक, ५) पूर्णपणे चूक.
ब) मी जास्त मिळविण्यासाठी जास्त धोका पत्करायला तयार आहे.
१) पूर्णपणे चूक, २) चूक,  ३) उदासीन,  ४) बरोबर, ५) अगदी बरोबर.
क) तुमच्या गुंतवणुकीमध्ये केव्हा फेरफार करता?
१)  ज्या वेळी त्यांची किंमत घटलेली असते तेव्हा
२) कमीत कमी दर तीन वर्षांनी  ३) तीन ते पाच वर्षांत  ४)  पाच किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांनंतर   ५) ज्या वेळी त्याची किंमत फार वधारलेली असते तेव्हा
ड) जास्त परताव्याची शक्यता निर्माण करण्यासाठी बाजाराच्या तेजी-मंदीचा अनुभव घेण्यास मी तयार आहे.
१)  कदापि नाही   २) अगदी बरोबर.
इ) आíथक बाजाराविषयी खालीलपकी कोणते विधान आपणास लागू पडते?
१) मला त्याबाबतीत काहीही माहिती नाही आणि जाणून घ्यायची इच्छाही नाही.
२) मला तोंडओळख आहे  ३) मला यातील चढउतार आणि वेगवेगळे पर्यात माहीत आहेत. ४) मला पूर्ण माहिती आहे, आणि कोणत्या गोष्टींचे काय परिणाम होतात त्याची मला कल्पना आहे.
प) माझ्या गुंतवणुकीची रक्कम सेफ ठेवण्यात मला जास्त रस आहे. त्यासाठी कमी परताव्याची तडजोड करण्यास मी तयार आहे.
१)  अगदी बरोबर, २) बरोबर, ३) उदासीन, ४) चूक, ५) पूर्णपणे चूक.
फ) एखाद्या पर्यायाबाबत निर्णय घेऊन त्यानुसार गुंतवणूक केली तर –
१)  फार चिंता वाटते, २) चिंता वाटते, ३) थोडीशी चलबिचल होते,
४) योग्य निर्णय घेतल्याचे समाधान वाटते, ५) अतिशय योग्य निर्णय घेतला असून भविष्यात प्राप्त होणाऱ्या जास्तीच्या परताव्याबाबत मी आशावादी होतो.
वरील प्रश्नमालिकेतील सर्व प्रश्नांची उत्तरे १ नंबरची असतील तर तो गुंतवणूकदार रूढ मार्गवादी (conservative)) गुंतवणूकदारांच्या प्रकारात गणला जातो. ज्यांची उत्तरे शेवटचा पर्याय आहे ते अतिशय आक्रमक गुंतवणूकदारांच्या प्रकारातले समजले जातात. यांमधील उत्तरे असतील ते गुंतवणूकदार थोडेसे रूढ मार्गवादी, मध्यम आणि किंचित आक्रमकवादी या प्रकारांत मोडतात.
लेखक गुंतवणूक आणि विमा सल्लागार

Tata Punch Car sale
टाटाच्या ‘या’ सर्वात स्वस्त SUV नं Wagon R, Dzire चं वर्चस्व संपवलं? झाली दणक्यात विक्री, मायलेज २६ किमी
Everest fish curry masala has pesticide detection
एव्हरेस्ट फिश करी मसाल्याविरुद्ध मोठी कारवाई; जास्त सेवनाने शरीराचे किती व कसे नुकसान होते?
navi mumbai nmmt bus marathi news, nmmt digital boards marathi news
नवी मुंबई: बस थांब्यांवरील डिजिटल फलक बंद, एनएमएमटी बस प्रवाशांची मोठी गैरसोय
Technical Glitch Disrupts varsova andheri ghatkopar Mumbai Metro 1
ऐन गर्दीच्या वेळेस ‘मेट्रो १’ विस्कळीत, तांत्रिक बिघाडामुळे सेवा १० ते १५ मिनिट विलंबाने; स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी