लिमये कुटुंबातील अमिता (३५) या डॉक्टर असून त्या एका खाजगी इस्पितळात वैद्यकीय अधिकारी म्हणून नोकरी करतात.  निलेश (३८) हे पवई येथील एका माहिती तंत्रज्ञान व्यवसायात असलेल्या कंपनीत नोकरी करतात. यांना धर्य (२) हा एक मुलगा असून भविष्यात धर्ययाला भाऊ किंवा बहीण असावी असा लिमये कुटुंबियाचा मानस आहे. निलेश यांचे वडील सुधीर (71) व आई नलिनी (68) हे या कुटुंबाचे अन्य घटक आहेत. पहिल्या मेलमध्ये त्यांचे मासिक अंदाज पत्रक पाहिल्यावर इतक्या मोठ्या गुंतवणूक योग्य रोकाडीचे (जी एखाद्या कुटुंबाच्या उत्पन्ना इतकी आहे) काय करत असतील हे कुतूहल होते. त्यांनी चौदा विमा योजनांची खरेदी केली असून त्यात एकाही टर्म प्लान नाही. एलआयसी जीवनसाथी या योजनेमुळे अमिता व निलेश यांना चार लाखाचे विमा छत्र लाभले आहे. अमिता यांच्या पाच विमा योजना असून त्या पाचही विमा योजनांचे मिळून अकरा लाखाचे विमा छत्र लाभले आहे. उर्वरीत आठ योजना निलेश यांनी खरेदी केल्या असून त्यांना पंधरा लाखाचे विमा छत्र लाभले आहे. बँकेच्या आवर्ती ठेवीत गुंतवणूककरण्या व्यतिरिक्त दरमहा पन्नास हजाराची एक ठेव लिमये कुटुंब करते. या ठेवीची मुदत एकवर्ष असून एका वर्षां नंतर ते ही रक्कम पुन्हा व्याजासकट गुंतवितात. लिमये कुटुंबांकडे बावीस लाखाच्या मुदत ठेवी आहेत. निलेश यांचे वडील महाराष्ट्र शासनाच्या  सेवेतून सेवा निवृत्त झाले आहेत. त्यांच्या आई या महानगर पालिकेच्या निवृत्त शिक्षिका आहेत. आईवडीलांना त्यांचे सेवा निवृत्तीवेतन मिळते. सध्या मुंबईतील गोरेगाव भागात वास्तव्यास असलेल्या निलेश व अमिता लिमये यांनी सांताक्रूझ पूर्व भागात अडीच बेडरूमची सदनिका खरेदी केली असून या सदनिकेचा ताबा त्यांना जानेवारी 2016 पर्यंत मिळेल. 1325 चौ.फुट क्षेत्रफळ असलेल्या या सदनिकेची किंमत 2 कोटी पंचवीस लाख असून या पकी पस्तीस लाख रुपये लिमये स्वत:च्या बचतीतून घालणार असून उर्वरीत रक्कमेचे ते कर्ज घेणार आहेत. निलेश यांना सेवाशर्थीचा एक भाग म्हणून त्यांच्या कुटुंबियांना (आईवडीलांसाहीत) प्रत्येकी तीन लाखाचा आरोग्यविमा मिळाला आहे.

लिमये कुटुंबाला सल्ला:
पुष्कळदा वयाने मोठी मंडळी सुद्धा लहान मुलासारखी वागतात. एखाद्या लहान मुलाला त्याने पाहिलेली वस्तू हवीशी वाटते तसेच काहीसे मोठ्या मंडळींचे होते. निलेश व अमिता यांनी ही सदनिका राहण्यासाठी म्हणून घेतली असती अथवा दवाखान्यासाठी मालमत्ता खरेदी केली असती तर एक आíथक नियोजनकार म्हणून काही आक्षेप असण्याचे कारण नव्हते. परंतु ही सदनिका खरेदी करण्यामागचा लिमये यांचा उद्देश कर वाचवणे हा आहे. ते या घरात राहायला जाणार नाहीत हे त्यांनी स्पष्ट केले. लिमये यांच्या सध्याच्या घरापासून धर्यची भविष्यातील शाळा चालत पाच मिनिटांच्या अंतरावर आहे. धर्यला पुढीलवर्षी प्रवेश मिळाल्यास याच शाळेत घालण्याचा लिमये यांचा मानस आहे. आरे कॉलनीमधील रस्त्याने लिमये पतीपत्नीस आपापली कामाची ठिकाणे वीस पंचवीस मिनिटांच्या अंतरावरची आहेत. नोकरी लागून दोन-तीन वष्रे झाल्यानंतर निलेश यांनी वडिलांची जुनी सदनिका विकून व त्यात भर म्हणून स्वत: कर्ज काढून सध्याची ‘टू बीएचके’ सदनिका खरेदी केली आहे. या सदनिकेचे ते व त्यांचे वडील संयुक्त मालक आहेत. म्हणून ही सदनिका न विकताच नवीन सदनिका घेण्याचा घाट निलेश व अमिता यांनी घातला आहे. निलेश व अमिता यांना जे काही योजले आहे ते योग्य कि अयोग्य हे तपासून पाहण्याची त्यांना इच्छा होती. गरज नसताना एखादी विकत घेतलेली वस्तू हा पशाचा अपव्यय आहे हे वाक्य अनेकांनी आपापल्या लहानपणी ऐकलेले असेलच. निलेश व अमिता लिमये यांना आज हे वाक्य ऐकविण्याचा मोह आíथक नियोजनकार म्हणून होतो आहे. सध्याचे घर लिमये कुटुंबियांना पुरेसे आहे. (आíथक नियोजनकार म्हणून हे मत नसून अमिता यांचे मत आहे) लिमये कुटुंबियानी दोन वर्षांपूर्वी त्यांच्या घराची सजावट करून घेतली आहे. आपल्याला सर्व दृष्टीने सोयीचे असलेले घर सोडून केवळ कर वाचविण्यासाठी प्रत्येकी एक कोटीच्या कर्जाच्या खाईत लोटणे किती योग्य आहे, हा विचार करणे आवश्यक वाटते. लिमये यांचा विकासकाबरोबर जो करार झाला आहे तो करार पाहता मोठे आíथक नुकसान सोसून करार रद्द करणे अथवा झालेली चूक निस्तरण्यासाठी निमूटपणे कर्जाचे हप्ते भरून सदनिका ताब्यात घेणे हे दोनच पर्याय लिमये यांच्यापुढे शिल्लक आहेत. म्हणून ही सदनिका ताब्यात घेतल्यावर तीन वष्रे तरी कर कार्यक्षमतेच्या दृष्टीने विकता येणार नाही.  
ल्ल लिमये यांनी खरेदी केलेल्या विम्याच्या योजना अपुरे विमाछत्र देत आहेत व गुंतवणुकीच्या परताव्याचा दर दसादशे ३.३९ ते ४.९४ टक्क्य़ांदरम्यान आहे. म्हणून सर्व योजना विनाविलंब बंद करणे योग्य. निलेश व अमिता यांनी प्रत्येकी दीड कोटी विमाछत्र देणारा मुदतीचा विमा खरेदी करावा. एलआयसीने मागील महिन्यात ऑनलाईन  मुदतीचा विमा (टर्म प्लान) विकण्यास सुरवात केली आहे. ही योजना एलआयसीच्या पारंपारिक योजनेपेक्षा विमा प्रतिनिधीला वगळल्यामुळे ४० टक्के स्वस्त योजना आहे. एलआयसीच्या ज्या काही दुर्मिळ योजना कुणाला शिफारस कराव्या अशा आहेत त्यापकी ही एक योजना आहे. तुम्ही या योजनेचा नक्की विचार करा. अन्यत: एचडीएफसी लाइफ, एसबीआय लाइफ व आयसीआयसीआय प्रुडेन्शियल यापकी एका विमा कंपनीचा मुदतीचा विमा खरेदी करा. विम्याची मुदत तुमच्या सेवानिवृतीच्या बरोबरीने ठेवा.   

ल्ल  नोकरी पेशातील करदात्यास कर वाचविण्यासाठी मर्यादित पर्याय उपलब्ध आहेत. हे वास्तव लक्षात घ्या. परंतु हे वास्तव विसरून कर्ज काढून अनावश्यक घर खरेदी हा कर नियोजनाचा उत्तम पर्याय आहे, असा अनेकांचा समज असतो. आíथक नियोजक म्हणून विविध गुंतवणूक पर्यायावर स्वत:ची मते आहेत आणि वेळोवेळी त्यावर मतप्रदर्शन होत असते. २०१० ते २०१३ या काळात मालमत्तांच्या किमतीत मोठी वाढ झाली. म्हणून अनेकांना स्थावर मालमत्ता हा उत्तम पर्याय वाटतो. परंतु भविष्यात याच वेगाने वाढ होणार नाही. उदाहरणार्थ सोन्यात ज्यांनी २००८ पासून गुंतवणूक केली त्या गुंतवणुका आजही फायद्यात आहेत. याला Early mover advantage म्हटले जाते. परंतु सोन्यातील वाढ पाहून ज्यांनी गुंतवणुकीस उशिरा सुरुवात केली त्यांच्या गुंतवणुका आज तोट्यात आहेत. कारण त्यांची बहुतांश खरेदी सोन्याचा भाव ३० हजाराचा टप्पा पार केल्यानंतरची आहे. हेच  मालमत्तेच्या बाजारपेठेत होण्याची शक्यता आहे. २०१० च्या तुलनेत मालमात्तांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. ही वाढ पाहून तुम्हाला गुंतवणूक करण्याचा मोह होत आहे. मालमत्तांच्या किंमती कमी होतील असा दावा नाही. पण भरलेले व्याज सुटून अधिकचे तीन-पाच टक्के गुंतवणुकीवर मिळतील. यापेक्षा अधिक परतावा आज तरी कठीण दिसत आहे. पाच टक्क्यांसाठी दोन कोटीचे कर्ज घेऊन रोकडसुलभता आटवणे कितपत योग्य, याचा ज्याचा त्याने विचार करावा.
ल्ल  अनेकदा आपण काही निर्णय वेळीच घेणे टाळतो. याचा परिणाम इतर निर्णयांवर होतो. धर्यला एखादे भावंड असावे की नसावे हा निर्णय न घेता घर घेण्याचा निर्णय घेतला. हे घर घेतल्यामुळे रोकड सुलभता आटून जाईल. मग दुसऱ्या अपत्यासाठी तरतूद कुठून येणार या प्रश्नाचे उत्तर निलेश यांना देता आले नाही. म्हणून आवश्यकता नसताना घेतलेले घर की दुसरे अपत्य याचा निर्णय आधी करणे आवश्यक होते. स्वत: राहण्याव्यतिरिक्त आवश्यकता नसेल तर केवळ कर वाचाविण्यासाठी म्हणून घर घेणे कधीही टाळणे इष्ट.
ल्ल कर नियोजनासाठी उपलब्ध असलेल्या पर्यायापकी आपल्याला सुयोग्य पर्याय निवडावा हाच सल्ला या निमित्ताने देता येईल.