News Flash

तेजीचे इंजिन!

किर्लोस्कर समुहाबद्दल मराठी माणसाला तरी अधिक काही सांगण्याची गरज नाही. २००९ मध्ये किर्लोस्कर समुहातील दोन कंपन्यांच्या ‘स्कीम ऑफ अरेंजमेंट’नुसार किर्लोस्कर ऑइलची स्थापना झाली

| July 7, 2014 01:06 am

किर्लोस्कर समुहाबद्दल मराठी माणसाला तरी अधिक काही सांगण्याची गरज नाही. २००९ मध्ये किर्लोस्कर समुहातील दोन कंपन्यांच्या ‘स्कीम ऑफ अरेंजमेंट’नुसार किर्लोस्कर ऑइलची स्थापना झाली. या नवोदित कंपनीकडे इंजिन आणि ऑटो कोम्पोनन्टचा उत्पादन व्यवसाय आला. कंपनीची भारताखेरीज दुबई, दक्षिण आफ्रिका आणि केनिया येथे कार्यालये असून इंडोनेशिया, नायजेरिया आणि आखाती देशांत विपणन कार्यालये आहेत.
दोनच वर्षांपूर्वी आपला बेयिरग व्यवसाय विकून कंपनीने केवळ इंजिन आणि ऑटो कोम्पोनन्ट या दोन प्रमुख व्यवसायावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. आपल्या डिझेल इंजिनचे जाळे जगभरात पसरवणाऱ्या किर्लोस्कर ऑइलचे भारतात पुणे, नाशिक, राजकोट आणि कोल्हापूर येथे कारखाने आहेत. गेली दोन वर्ष मंदीसदृश वातावरणातही कंपनीने त्या मानाने चांगली कामगिरी करून दाखवली आहे. गेल्या आíथक वर्षांत नक्त नफ्यात किरकोळ घट दाखवणाऱ्या या कंपनीकडून येत्या दोन वर्षांत भरीव कामगिरीची अपेक्षा आहे.
नवीन सरकारकडून ऊर्जा क्षेत्रासाठी भरपूर अपेक्षा आहेत. मात्र तरीही त्याला किमान दोन वष्रे कालावधी लागेल. उत्पादन क्षेत्रातील विजेचा तुटवडा अजूनही पॉवर इंजिनच्या सहाय्याने सोडवला जातो. कंपनीकडे उत्तम गुणवत्तेची ५ kVA ते ३००० kVA अशी मोठी पॉवर इंजिन शृंखला तर कृषी क्षेत्रासाठी ३ hp ते १३० hp  अशी मोठी श्रेणी असल्याने त्याचा फायदा कंपनीला सर्वच घटकांतून होईल. डिझेल इंजिनखेरिज बायो डिझेल, बायो-गॅस, नॅच्युरल गॅस तसेच स्ट्रेट व्हेजीटेबल ऑइल (SVO) असे विविध इंजिन पर्याय उपलब्ध आहेत.
येणारा कालावधी उत्पादन वाढीचा असल्याने कंपनीच्या उत्पादनांना चांगली मागणी राहील. कृषी क्षेत्रातही पंपना चांगली मागणी असून वाहन उद्योगातही भरभराट आहे. या सगळ्याचा एकत्रित सकारात्मक परिणाम कंपनीच्या आíथक कामगिरीवर होईल. आखाती देश आणि आफ्रिकेत कंपनीच्या उत्पादनांना चांगली मागणी असून येत्या दोन वर्षांत कंपनीच्या निर्यातीतही दुप्पट वाढ अपेक्षित आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2014 1:06 am

Web Title: kirloskar oil engines ltd
Next Stories
1 मृत व्यक्तीचे विवरण पत्र वारसदाराने भरावे
2 हर किसान के खुशी के लिये..
3 आयकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवा!
Just Now!
X