News Flash

एलआयसी नोमुरा चिल्ड्रन्स फंड

निधी व्यवस्थापन क्षेत्रातील प्रत्येकाला हे माहीत आहे की बचतीची जी विविध उद्दिष्टे आहेत

| June 1, 2015 12:32 pm

av-06फंडाविषयक विवरण
फंडाचा गुंतवणूक प्रकार    : समभाग व रोखे गुंतवणूक  
जोखीम प्रकार     : रोखे व समभाग गुंतणूक असल्याने धोका मध्यम    
गुंतवणूक : हा फंड अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन फंड या प्रकारचा आहे. या फंड प्रकारात पूर्वनिर्धारित मूल्यांकनाच्या निकषांनुसार फंडाच्या गुंतवणुकीत रोखे व समभाग यांचे प्रमाण     ठरते. एका वर्षांच्या आत गुंतवणूक काढून घेतल्यास एक टक्का निर्गमन अधिभार आकारण्यात येईल. क्रिसिल बॅलेन्स फंड इंडेक्स हा निर्देशांक या योजनेचा संदर्भ निर्देशांक आहे.
किमान पाच हजार रुपये गुंतवून किंवा एक हजाराच्या एसआयपीने या फंडात गुंतवणुकीची सुरवात करता येईल.        
निधी व्यवस्थापक : रामनाथ वेंकटेश्वरन हे या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. रामनाथ यांनी  आयआयटी खरगपूर येथून अभियांत्रिकी पदवी घेताली असून आयआयएम कोलकातामधून वित्तीय व्यवस्थापन या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. रामनाथ यांनी एलआयसी नोमुरा या फंडात दाखल होण्याआधी टीसीएस, एडेल्वाइज कॅपिटल व कोटक सिक्युरिटीज्, बिर्ला सनलाइफ इन्शुरन्स या कंपन्यांतून विविध जबाबदारीच्या पदांवर काम केले आहे.     
गुंतवणूक पर्याय : वृद्धी (ग्रोथ) व लाभांश (पे आउट व रिइंव्हेंस्ट)
फंड खरेदीची पद्धत: 98699 63631 या क्रमांकावर CHILDRENS FUND असा एसएमएस पाठविल्यास म्युच्युअल फंडाचा गुंतवणूकदार सेवा प्रतिनिधी संपर्क करेल.     अथवा www.licnomuramf.com या वेबस्थळावरून थेट खरेदी करता येईल.
av-05
निधी व्यवस्थापन क्षेत्रातील प्रत्येकाला हे माहीत आहे की बचतीची जी विविध उद्दिष्टे आहेत त्यापकी मुलांच्या भविष्यातील खर्चाची तरतूद या उद्दिष्टाने केलेल्या बचतीच्या बाजारपेठेची व्याप्ती मोठी आहे. हे जाणून एलआयसीसारखी विमा कंपनी कोमल जीवन किंवा जीवन किशोर सारख्या योजना ग्राहकांना उपलब्ध करून देते तर एलआयसीची उपकंपनी असलेली मालमत्ता व्यवस्थापन  क्षेत्रातील एलआयसी नोमुरा याच उद्देशाने चिल्ड्रन्स फंड ही योजना सादर करते. आपल्या गुंतवणुकीत ही योजना रोखे व समभाग या दोन्ही गुंतवणूक साधनांचा वापर करीत असल्याने हा एक बॅलेन्स फंड असला तरी या दोन्हीच्या गुंतवणुकीचे प्रमाण तेजी मंदीच्या वेगवेगळ्या टप्प्यात किती असावे हे पूर्वनिर्धारित असल्याने हा फंड ‘अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन फंड’ या प्रकारत मोडतो. समभाग, रोखे, रोकड सममूल्य (कॉलमनी) व अल्प मुदतीचे सरकारी रोखे (टी बिल्स) अशा विविध प्रकारात गुंतवणूक करणाऱ्या फंडाला अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन फंड ही संज्ञा वापरली जाते. जोखीमेचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने या विविध गुंतवणूक साधनांचे प्रमाण अर्थव्यवस्थेतील घटक निश्चित करीत असतात. उदाहरणार्थ ज्यावेळी निर्देशांकाचा पी/ई १५ ते १८ दरम्यान असेल तेव्हा एकूण गुंतवणुकीच्या ६० टक्के निधी समभागात गुंतविला जाईल. तर १८ ते २० दरम्यान असल्यास गुंतवणुकीच्या ५० टक्के निधी समभागांत गुंतविला जाईल, असे या फंडांचे साधारण ध्येयधोरण असते.
या चिल्ड्रन्स फंडाने  एका वर्षांपूर्वी ६५ टक्के निधी समभागात गुंतविला होता सध्या हे प्रमाण ३० एप्रिल रोजी ६० टक्क्याहून कमी आहे. या फंडाचा परतावा अन्य चिल्ड्रन्स फंड ड फंडांच्या तुलनेत डावा असला तरी ‘क्रिसिल बॅलेन्स फंड इंडेक्स’ या संदर्भ निर्देशांकाच्या तुलनेत मागील दहा तिमाहीत उजवा आहे.
फंडाच्या गुंतवणुकीत बँकिंग, टेक्नोलॉजी, वाहन उद्योग, औषध निर्माण, गर बँकिंग वित्तीय कंपन्या (एनबीएफसी) यांच्यावर भर दिला गेला आहे. जोखीम कमी करण्याच्या दृष्टीने गुंतवणूक कुठल्याही एका उद्योग क्षेत्रावर किंवा कंपनी केंद्रित न ठेवता निवडलेल्या उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीचे विकेंद्रीकरण केले आहे. या फंडाच्या परताव्याच्या दराबाबत उपस्थित केलेल्या आक्षेपावर फंड व्यवस्थापनाने हा फंड ‘बाय अ‍ॅण्ड होल्ड’ प्रकारचा फंड आहे. हा फंड सतत समभागांची खरेदी विक्री करीत नसल्याने अन्य आक्रमक फंडांच्या तुलनेत या फंडाच्या परताव्याचा दर कमीच असेल. या कारणाने एकूण म्युच्युअल फंडांच्या ‘एसआयपी’पकी १० ते १५ टक्के गुंतवणुकीसाठी या फंडाची निवड करावी, अशी शिफारस करता येईल.  
mutualfund.arthvruttant@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2015 12:32 pm

Web Title: lic nomura mf childrens fund
टॅग : Fund
Next Stories
1 गेला ‘माधव’कुणीकडे?
2 लहानग्यांसाठी गुंतवणूक
3 ‘स्मॉल’ पण फायद्याचा!
Just Now!
X