14 October 2019

News Flash

फुलले रे क्षण माझे फुलले रे..

बाजाराचा तंत्र कल

|| आशीष ठाकूर

गेल्या आठवडय़ात निर्देशांक जेव्हा नवीन उच्चांकाला साद घालत होता, तेव्हा वाचकांच्या आयुष्यातही काही फुललेले, सजलेले क्षण डोकावून गेले. भविष्यातही बाजारात असेच काही खुललेले, सजलेले क्षण आहेत का? हे जाणून घेण्यासाठी या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

गुरुवारचा बंद भाव

  • सेन्सेक्स: ३९,१४०.२८
  • निफ्टी: ११,७५२.८०

येणाऱ्या दिवसात एक संक्षिप्त घसरण ही सेन्सेक्सवर ३८,५०० व निफ्टीवर ११,६०० पर्यंत येऊन, निर्देशांक पुन्हा सेन्सेक्सवर ४०,००० आणि निफ्टीवर ११,९०० ते १२,१०० च्या लक्ष्यासाठी सज्ज होईल. हे लक्ष्य साध्य झाल्यावर सेन्सेक्सवर १,५०० ते २,००० अंशांची आणि निफ्टीवर ५०० ते ८०० अंशांची घसरण संभवते. तेव्हा अत्यल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांनी (गुंतवणूक कालावधी तीन महिन्यांहून कमी) प्रत्येक वाढीव टप्प्यावर नफा पदरात पाडून घेणे श्रेयस्कर.

आता आपण त्रमासिक निकालाकडे वळूया.

१) टाटा ग्लोबल बीव्हरेजेस

त्रमासिक निकालाची नियोजित तारीख- मंगळवार, २३ एप्रिल.

१८ एप्रिलचा बंद भाव- २०२.८५ रु.

निकाल जाहीर झाल्यानंतरचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – २०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाने  २०० रुपयांचा स्तर राखत प्रथम वरचे लक्ष्य २२० रुपये. भविष्यात २२० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास २५० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : २०० ते २२० रुपयांच्या पट्टय़ात (बॅण्ड) वाटचाल.

क) निराशादायक निकाल : २०० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत १५० रुपयांपर्यंत घसरण.

२) मिहद्र अ‍ॅण्ड मिहद्र फायनान्शियल सíव्हसेस लि.

त्रमासिक निकालाची नियोजित तारीख- बुधवार, २४ एप्रिल.

१८ एप्रिलचा बंद भाव – ४१७.९० रु.

निकाल जाहीर झाल्यानंतरचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ४०० रुपये.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाने ४०० रुपयांचा स्तर राखत प्रथम वरचे लक्ष्य ४४० रुपये. भविष्यात ४४० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ४८० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : ४०० ते ४४० रुपयांच्या पट्टय़ात (बॅण्ड) वाटचाल.

क) निराशादायक निकाल : ४०० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ३५० रुपयांपर्यंत घसरण.

३) बायोकॉन लिमिटेड

त्रमासिक निकालाची नियोजित तारीख- गुरुवार, २५ एप्रिल.

१८ एप्रिलचा बंद भाव- ६१५.२० रु.

निकाल जाहीर झाल्यानंतरचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ६०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाने ६०० रुपयांचा स्तर राखत प्रथम वरचे लक्ष्य ६४० रुपये. भविष्यात ६४० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ६८० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : ६०० ते ६४० रुपयांच्या पट्टय़ात (बॅण्ड) वाटचाल.

क) निराशादायक निकाल : ६०० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ५५० रुपयांपर्यंत घसरण.

४) येस बँक

त्रमासिक निकालाची नियोजित तारीख- शुक्रवार, २६ एप्रिल.

१८ एप्रिलचा बंद भाव- २५५.८० रु.

निकाल जाहीर झाल्यानंतरचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – २३० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाने २३० रुपयांचा स्तर राखत प्रथम वरचे लक्ष्य २६० रुपये. भविष्यात २६० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ३०० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : २३० ते २६० रुपयांच्या पट्टय़ात (बॅण्ड) वाटचाल.

क) निराशादायक निकाल : २३० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत १७५ रुपयांपर्यंत घसरण.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती :  शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञ सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

First Published on April 22, 2019 12:07 am

Web Title: loksatta arth vrutant 1