युनियन पब्लिक सर्विस कमिशन (यूपीएससी) (जाहिरात क्र. ७/२०१८) पुढील पदांची सरळ सेवा पद्धतीने भरती.

(१) असिस्टंट जिऑलॉजिस्ट – एकूण ७५ पदे (अजा – १२, अज – ३, इमाव – २०, यूआर – ४०) (६ पदे विकलांग ओएच/एचएचसाठी राखीव)

पात्रता – जिऑलॉजी/अ‍ॅप्लाइड जिऑलॉजी/जिओ एक्स्प्लोरेशन/मिनरल एक्स्प्लोरेशन/इंजिनीअरिंग जिऑलॉजी/जिओ केमिस्ट्री/मरिन जिऑलॉजी/अर्थ सायन्स अँड रिसोर्स मॅनेजमेंट/जिओ इन्फॉम्रेटिक्स, इ.मधील पदव्युत्तर पदवी.

वेतन – रु. ६६,०००/-

(२) जिऑलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडियामध्ये ‘अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर’ – एकूण १६ पदे (अजा – ३, इमाव – ४, यूआर – ९)

(१ पद विकलांग ओएच/एलडी/सीपी /पीडी/एचएचसाठी राखीव)

पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण. पर्सोनेल मॅनेजमेंट किंवा कायदा पदवीधरांना प्राधान्य.

अनुभव – अ‍ॅडमिनिस्ट्रेशन/ अकाउंट्स/ इस्टॅब्लिशमेंट/लीगल/व्हिजिलन्समधील

२ वर्षांचा अनुभव. अजा/अज उमेदवारांसाठी अनुभवाच्या अटीमध्ये शिथिलता मिळू शकेल.

वेतन – रु. ६२,०००/-

(३) डिपार्टमेंट ऑफ ड्रग कंट्रोल, एनसीटी शासन, दिल्ली ‘ड्रग इन्स्पेक्टर’ (एकूण ७ पदे. अजा – १, अज – १, यूआर – ५)

पात्रता – फार्मसी/फार्मास्युटिकल सायन्स/मेडिसिन/मायक्रोबायोलॉजीमधील पदवी उत्तीर्ण.

वेतन – रु. ६६,०००/-

वरील तीनही पदांसाठी

(i) वयोमर्यादा – दि. ३ मे २०१८ रोजी ३० वर्षेपर्यंत (इमाव – ३३ वर्षेपर्यंत, अजा/अज – ३५ वर्षेपर्यंत, विकलांग – ४०/४३/४५ वर्षेपर्यंत). (ii) अर्जाचे शुल्क- रु. २५/- (अजा/अज/महिला/विकलांग यांना फी माफ आहे.) ऑनलाइन अर्ज  http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर दि. ३ मे २०१८ (२३.५९ वाजे ) पर्यंत करावेत.

 

एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, नवी दिल्ली (जाहिरात क्र. ०१/२०१८) ‘ज्युनियर एक्झिक्युटिव्ह’ एकूण ५४२ पदांवर गेट-२०१८ स्कोअरवर आधारित भरती.

(१) जेई (इंजिनीअरिंग सिव्हिल) – १०० पदे (अजा – १५, अज – ८, इमाव – २७, खुला – ५०)

(२) जेई (इंजिनीअरिंग – इलेक्ट्रिकल) – १०० पदे (अजा -१५, अज – ८, इमाव – २७, खुला – ५०)

(३) जेई (इलेक्ट्रॉनिक्स) – ३३० पदे (अजा – ३९, अज – २२, इमाव – ८०, खुला – १८९)

(४) जेई (आíकटेक्चर) – १२ पदे

(अजा – १, इमाव – २, खुला – ९)

पद क्र. १ ते ३ साठी पात्रता – संबंधित विषयांतील अभियांत्रिकी पदवी किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण.

पद क्र. ४ साठी पात्रता – आíकटेक्चर पदवी आणि सर्व पदांसाठी संबंधित विषयातील

गेट-२०१८ चा स्कोअर.

वयोमर्यादा – दि. ३० एप्रिल २०१८ रोजी

२७ वर्षेपर्यंत (इमाव – ३० वर्षेपर्यंत, अजा/अज – ३२ वर्षेपर्यंत). वेतन – रु. ९.१ लाख प्रति वर्ष.

निवड पद्धती – गेट – २०१८ स्कोअर आधारित गुणवत्तेनुसार शॉर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांना कागदपत्र तपासण्यासाठी बोलाविले जाईल.

परीक्षा शुल्क – रु. ३००/- (अजा/अज/महिला/ विकलांग यांना फी माफ).

ऑनलाइन अर्ज www.aai.aero या संकेतस्थळावर दि. ४ मे २०१८ पर्यंत करावेत.

 

– सुहास पाटील

suhassitaram@yahoo.com