नवीन गुंतवणूकविषयक माहिती : महिंद्रा उन्नती इमर्जिंग बिझनेस योजना

हा फंड नवीन गुंतवणुकीसाठी ८ जानेवारी ते २२ जानेवारी २०१८ पर्यंत खुला आहे. या  काळात गुंतवणूकदारांना युनिट्स १० रुपयांच्या दराने मिळतील आणि त्यानंतर दैनिक नक्त मालमत्ता मूल्यानुसार (एनएव्ही) खरेदी/विक्री होईल.

  • किमान गुंतवणूक : रु. १,०००,
  • किमान एसआयपी : रु.५००
  • एग्झिट लोड – एक वर्षांच्या आत- १%, त्यानंतर काही नाही
  • जोखीम : जास्त
  • गुंतवणूक उद्दिष्ट : दीर्घकालीन भांडवल वृद्धी
  • गुंतवणूक धोरण : प्रामुख्याने मिड कॅप कंपन्यांचे समभाग आणि डेरिव्हेटिव्हज्
  • निधी व्यवस्थापक : रतीश वॉरियर – ११ वर्षांचा फंड कारभाराचा अनुभव. त्यांचे सध्या चालू असलेले फंड १) महिंद्र कर बचत योजना – ऑगस्ट २०१६ २) महिंद्र धन संचय योजना : जानेवारी २०१७ ३) महिंद्र फंड बढत योजना : एप्रिल २०१७. या आधी रिलायन्स लाइफ इन्शुरन्स कंपनीमध्ये सहा वर्ष कार्यरत होते.
  • कुणासाठी योग्य : जास्त जोखीम घेऊन दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणाऱ्यांसाठी

सूचना: हे पोर्टफोलिओ प्रातिनिधिक स्वरूपाचे आहेत. कृपया कोणतीही गुंतवणूक करताना स्वत:ची जोखीम क्षमता तपासून, सल्लागाराची मदत आणि संपूर्ण माहिती मिळवूनच गुंतवणूक करावी. तुमच्या फायदा किंवा तोटय़ाची जबाबदारी ही तुमचीच असेल.

  • या सदरामधे गुंतवणुकीसाठी वापरलेले म्युच्युअल फंड आणि शेअर्स हे उदाहरण म्हणून आहेत. कोणत्याही म्युच्युअल फंडाची किंवा शेअरची शिफारस इथे केली जात नाहीये.
  • सर्व म्युच्युअल फंड हे ‘रेग्युलर ग्रोथ’ पर्यायाचे आहेत.
  • यातील काही म्युच्युअल फंड आणि शेअर्स हे माझ्याकडे असतील किंवा घेतले/विकले जातील. परंतु त्याचा या सदरांमधील पोर्टफोलिओच्या कामगिरीशी काहीही संबंध नाही.
  • गुंतवणूक करताना म्युच्युअल फंडाचे एग्झिट लोड, शेअर खरेदी/विक्रीवर होणारा खर्च आणि कर नियमांचा आढावा घ्या.

पोर्टफोलियोची कामगिरी : १ जानेवारी ते १३ जानेवारी २०१८मासिक गुंतवणूक ५,००० रुपये

तृप्ती राणे

trupti_vrane@yahoo.com

(लेखिका सनदी लेखाकार आणि लोकांच्या वित्तीय स्वास्थ्यविषयक तज्ज्ञ आणि स्वतंत्र सल्लागार म्हणून कार्यरत)