News Flash

बाजाराचा  तंत्र-कल : अखेर बाजार सावरला!

निर्देशांकाचे खालचे लक्ष्य सेन्सेक्सवर ४८,२०० ते ४७,८०० आणि निफ्टीवर १४,२०० ते १४,००० असे असेल.

|| आशीष ठाकूर

मागील लेखातून बाजारातील घसरण व त्याचा कालावधी याची सांगड घातली होती. लेखाची शाई वाळते न वाळते तोच सरलेल्या सप्ताहारंभी म्हणजे सोमवारी सेन्सेक्सवर १,७०८ अंशांची आणि निफ्टी निर्देशांकावर ५२४ अंशांची सणसणीत घसरण झाली. त्या लेखाचे शीर्षक ‘कालाय तस्मै नम:’ होते की, ‘काळ आला धावोनी’ इतपत संभ्रम निर्देशांकाच्या घसरणीच्या दहशतीमुळे निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर या आठवड्याच्या वाटचालीकडे वळू या.

  • शुक्रवारचा बंद भाव :
  • सेन्सेक्स : ४८,८३२.०३
  • निफ्टी : १४,६१७.८५

गेल्या लेखातील वाक्य… निर्देशांक सेन्सेक्सवर ५१,००० आणि निफ्टीवर १५,००० च्या स्तराखाली सातत्याने राहिल्यास निर्देशांकाचे प्रथम खालचे लक्ष्य सेन्सेक्सवर ४८,९५० ते ४८,२०० आणि निफ्टीवर १४,५०० ते १४,२०० असे असेल. हे खालचे लक्ष्य सरलेल्या सप्ताहातील पहिल्याच दिवशी सोमवारी साध्य झाले. या स्तराचा आधार घेत बाजार सावरला. येणाऱ्या दिवसात निर्देशांकाची वाटचाल ही सेन्सेक्सवर ४९,७४० ते ५०,००० आणि निफ्टी निर्देशांकावर १४,७०० ते १४,८५० पर्यंतची असेल. ही तेजीची चाल कायम राखण्यासाठी निर्देशांकांनी सेन्सेक्सवर ५०,००० आणि निफ्टीवर १४,८५० चा स्तर ओलांडण्याची नितांत गरजेचे आहे, तरच सेन्सेक्सवर ५१,००० आणि निफ्टीवर १५,००० चा स्तर दृष्टिपथात येईल.

येणाऱ्या दिवसात सेन्सेक्स ५०,००० आणि निफ्टी निर्देशांक १४,८५० चा स्तर पार करण्यास अपयशी ठरल्यास निर्देशांकावर घसरणीची मानसिक तयारी ठेवून निर्देशांकाचे खालचे लक्ष्य सेन्सेक्सवर ४८,२०० ते ४७,८०० आणि निफ्टीवर १४,२०० ते १४,००० असे असेल.

निकालपूर्व विश्लेषण…

आता आपण गुंतवणूकदारांच्या आवडत्या समभागांचे निकालपूर्व विश्लेषण जाणून घेऊया.

१) एसीसी लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल – सोमवार, १९ एप्रिल

१६ एप्रिलचा बंद भाव – १,८८१.७५ रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – १,८०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : १,८०० रुपयांचा स्तर राखत २,००० रुपये, द्वितीय लक्ष्य २,२०० रुपये.

ब) निराशादायक निकाल : १,८०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,६०० रुपयांपर्यंत घसरण.

२) टाटा बीएसएल (भूषण स्टील) लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल – बुधवार, २१ एप्रिल

१६ एप्रिलचा बंद भाव – ५७.६० रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ५३ रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ५३ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ६५ रुपये, द्वितीय लक्ष्य ७० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ५३ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ५० रुपयांपर्यंत घसरण.

३) टाटा एलेक्सी लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल – गुरुवार,२२ एप्रिल

१६ एप्रिलचा बंद भाव – २,९६२.८० रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – २,८०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २,८०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३,२८० रुपये, द्वितीय लक्ष्य ३,५०० रुपये.

ब) निराशादायक निकाल : २,८०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २,६०० रुपयांपर्यंत घसरण.

४) आयसीआयसीआय बँक लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल – शनिवार, २४ एप्रिल

१६ एप्रिलचा बंद भाव – ५६६.६० रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ५५० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ५५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ६०० रुपये, द्वितीय लक्ष्य ६५० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ५५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ५०० रुपयांपर्यंत घसरण.

५) एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनी लि.

तिमाही वित्तीय निकाल – सोमवार, २६ एप्रिल

१६ एप्रिलचा बंद भाव – ६९०.९५ रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ६८० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ६८० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ७४० रुपये, द्वितीय लक्ष्य ७८० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ६८० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ६४० रुपयांपर्यंत घसरण.

 

६) अ‍ॅक्सिस बँक लिमिटेड 

तिमाही वित्तीय निकाल – मंगळ, २७ एप्रिल

१६ एप्रिलचा बंद भाव – ६६९.३५ रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ६२५ रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ६२५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ७०० रुपये, द्वितीय लक्ष्य ७५० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ६२५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ५९० रुपयांपर्यंत घसरण.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2021 12:01 am

Web Title: market in stable sunsex nifty akp 94
Next Stories
1 रपेट बाजाराची : सावधगिरी हवी
2 गोष्ट रिझर्व्ह  बँकेची : पहिले संचालक मंडळ उत्कृष्ट आणि संतुलित
3 करावे कर-समाधान : नवीन आर्थिक वर्षारंभीचे नियोजन
Just Now!
X