19 January 2020

News Flash

बाजाराचातंत्र कल : निर्देशांकावर तेजीची रोषणाई

दिवाळीच्या आनंदाच्या दिवसात, सेन्सेक्स ३९,८०० आणि निफ्टी ११,८००च्या स्तराला गवसणी घालेल

(संग्रहित छायाचित्र)

आशीष ठाकूर

दिवाळीच्या आनंदाच्या दिवसात, सेन्सेक्स ३९,८०० आणि निफ्टी ११,८००च्या स्तराला गवसणी घालेल. या गेल्या लेखातील वाक्याची प्रचीती सरलेल्या सप्ताहात तर आलीच, पण त्याचबरोबर निर्देशांकावरील तेजीच्या दिव्यांची आकर्षक रोषणाई, आरासदेखील मनमोहक दिसत होती. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स- ४०,१६५.०३

निफ्टी – ११,८९०.६०

येणाऱ्या दिवसात निर्देशांकांवर, म्हणजे सेन्सेक्सवर ३८,६७० आणि निफ्टीवर ११,४५० चा भरभक्कम आधार असेल. आताच्या घडीला तेजीच्या वातावरणातील एक क्षीण स्वरूपाची घसरण सेन्सेक्सवर ३९,४०० आणि निफ्टीवर ११,७०० पर्यंत अपेक्षित आहे. या स्तरावर पायाभरणी होऊन भविष्यात सेन्सेक्स ४१,००० आणि निफ्टीवर १२,१५० च्या नवीन उच्चांकाला गवसणी घालतील.

आगामी तिमाही निकालांचा वेध..

१) डाबर इंडिया लिमिटेड

*  तिमाही निकालाची तारीख- मंगळवार, ५ नोव्हेंबर

* १ नोव्हेंबरचा बंद भाव- ४६४.५० रु.

* निकालानंतरचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर  – ४४५ रुपये

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ४४५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ४८० रुपये. भविष्यात ४४५ रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ५०५ रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : ४४५ ते ४८० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशादायक निकाल : ४४५ रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ४०० रुपयांपर्यंत घसरण.

२) जीई टी अँण्ड डी इंडिया लिमिटेड

* तिमाही निकालाची तारीख- मंगळवार, ५ नोव्हेंबर

* १ नोव्हेंबरचा बंद भाव- २०१.६० रु.

* निकालानंतरचा महत्त्वाचा केंद्रिबदू  स्तर – १७५ रुपये

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १७५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २३५ रुपये. भविष्यात १७५ रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास २८० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल

ब) सर्वसाधारण निकाल : १७५ ते २३५ रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल

क) निराशादायक निकाल : १७५ रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत १४० रुपयांपर्यंत घसरण.

३) जिलेट इंडिया लिमिटेड

*  तिमाही निकालाची तारीख – मंगळवार, ५ नोव्हेंबर

*  १ नोव्हेंबरचा बंद भाव – ७,९३०.७० रुपये

*  निकालानंतरचा महत्त्वाचा केंद्रिबदू  स्तर – ७,९०० रुपये.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ७,९०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ८,१०० रुपये. भविष्यात ७,९०० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ८,५०० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल

ब) सर्वसाधारण निकाल : ७,९०० ते ८,१०० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल

क) निराशादायक निकाल : ७,९०० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ७,५५० रुपयांपर्यंत घसरण

४) टायटन कंपनी लिमिटेड

* तिमाही निकालाची तारीख – मंगळवार, ५ नोव्हेंबर

*  १ नोव्हेंबरचा बंद भाव – १,३०१.४५ रुपये

*  निकालानंतरचा महत्त्वाचा केंद्रिबदू  स्तर – १,३०० रुपये

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,३०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,४०० रुपये. भविष्यात १,३०० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास १,५०० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल

ब) सर्वसाधारण निकाल : १,३०० ते १,४०० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल

क) निराशादायक निकाल : १,३०० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत प्रथम १,२००  व त्यानंतर १,१०० रुपयांपर्यंत घसरण.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

First Published on November 4, 2019 1:52 am

Web Title: market index bright share market trends senesex nifty abn 97
Next Stories
1 वित्त शेष : ख्वाईश लवकर निवृत्त होण्याची
2 माझा पोर्टफोलियो : रूपांतरण आणि पिकवण
3 क.. कमॉडिटीचा : शेतमालाच्या हमीभावाला ‘ऑप्शन्स’चा पर्याय
Just Now!
X