त्यामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी तो थोडा मागे फिरला. पण ६०३८ वर तो जाऊ शकला नाही व त्याच दिवसापासून त्याची घसरण सुरू झाली. मंगळवारी तर त्याने खालच्या बाजूस पोकळी तयार करून दिवसाची सुरुवात केली. ती पोकळी भरून काढण्यासाठी तो बुधवारी वर गेला व ती भरून निघताच परत खाली सरकू लागला.
शुक्रवारी शेवटच्या सत्रात वेगात झालेल्या घसरणीमुळे निफ्टी ५८८३ ही नीचतम पातळी दाखवून आला. हे करताना त्याने आठवडय़ाच्या आलेखावरील ५९४९ व दैनिक आलेखावर दीर्घकालीन एटअ ५८९३ हे आधार त्याने तोडले  आहेत. आठवडय़ातील त्याची घट (१.५८%) होती.
गेल्या दहा वर्षांतील सर्वात कमी अशा ५% विकासदराची वाढ होण्याची शक्यता केंद्रीय सांखिकी संस्थेने वर्तवली व बाजाराला गडगडायला कारण मिळाले. निफ्टीचा पुढील आधार आठवडय़ाच्या आलेखावर ५८८५ इतक्या जवळ आहे.
६१११ पासून चालू असलेली ही घसरण अव्याहत नवव्या दिवशी चालू असल्याने आता दैनिक आलेखावर फरक अतिविक्री क्षेत्रात जाऊन सकारात्मक संकेत देऊ लागला आहे. सतत झालेल्या २२६ अंकांच्या घसरणीनंतर तो थोडा वर जाण्याची शक्यता वाटत आहे. गेल्या सप्टेंबर व नोव्हेंबरला दैनिक आलेखावर दीर्घकालीन एटअच्या खाली बाजार जाताच तो सावरला होता.
परकीय  गुंतवणूक संस्थांनी १ ते ७ फेब्रुवारीपर्यंत ४,०७२ कोटी (२०१३ मधील सहा आठवडय़ात २४,४७१ कोटी) रुपयांची गुंतवणूक केली तर देशी गुंतवणूक संस्थांनी याच काळात ४,८३१ कोटी रुपयांची (या दरम्यान २२,३६२) नक्त विक्री केली.

(धोक्याची सूचना : शेअर बाजार, समभागांबाबत व्यक्त केलेले अंदाज चुकण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांनी अभ्यास करून गुंतवणूक करावी. वरील अंदाजवर आधारित गुंतवणुकीतून होणाऱ्या आíथक नुकसानाला ‘लोकसत्ता-अर्थ वृत्तान्त’ अथवा वैयक्तिकरित्या लेखक जबाबदार असणार नाहीत.)
गेल्या आठवडय़ाचा सल्ला आणि आता त्याचा माग काढू या –
* भारतीय स्टेट बँक  : रु. २,३७८ ते रु. २,३४८ पातळीपर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तविलेली होती. हा समभाग प्रत्यक्षात रु. २,२८६ पर्यंत आला. शुक्रवारी शेवटच्या सत्रात वेगात झालेल्या घसरणीत याने मासिक आलेखावरील रु. २,२७७ ही अल्पकालीन एटअ ची आधार पातळीही तोडली आहे. एकमार्गी १०% घसरण झाल्याने आता दैनिक आलेखावर फरक अतिविक्री क्षेत्रात जाऊन सकारात्मक संकेत देऊ लागला आहे. आठवडय़ाच्या आलेखावर मध्यम कालीन एटअ चा आधार रु. २,२५३ आहे.
* ओएनजीसी : गेल्या आठवडय़ात रु. ३३२ ला विक्री करण्याचा सल्ला दिला होता व रु. ३२० व रु. ३१४ च्या पातळीवर येईल, असे सांगितले होते. दोन्ही लक्ष्य पूर्ण झाले.
* इंडो बोरेक्स : रु. १०३ चा ‘स्टॉप लॉस’ला न जाता पडत्या बाजारातही वर जात आहे. रु. १२६ चे मासिक लक्ष्य आहे.
* भारती एअरटेल : ‘स्टॉप लॉस’ रु. ३२३ च्या खाली गेला .
* टाटा स्टील : ‘स्टॉप लॉस’ रु. ३८७ च्या खाली गेला.
* टाटा मोटर्स : रु. २५० च्या आसपास. खरेच या पातळीपर्यत तो आलाच नाही.
पुढच्या आठवडय़ासाठी :
* अरविंदो फार्मा (रु. १८३) :     १९८ चा ‘स्टॉप लॉस’ ठेवून विक्री केल्यास पुढील काही आठवडय़ात रु. १७३, १६४ ची पातळी टप्प्या-टप्प्याने गाठण्याची शक्यता.
* डीएलएफ (रु. २६८) : रु. २७७ चा  ‘स्टॉप लॉस’ ठेवून विक्री केल्यास रु. २६३ ची पातळी गाठण्याची शक्यता.
* आयसीआयसीआय बँक (रु. १,१३०) : रु. १,१७५ चा ‘स्टॉप लॉस’ ठेवून  रु. १,१५० ला विक्री केल्यास रु. १,१०४ ची पातळी गाठण्याची शक्यता.
गेल्या आठवडय़ात निरनिराळया निर्देशांकांत झालेली वध-घट