02 June 2020

News Flash

बाजाराचा तंत्र कल : मन उधाण वाऱ्याचे..

निर्देशांक सातत्याने टिकल्यास बाजार मंदीच्या विळख्यातून बाहेर आला असे समजण्यास हरकत नाही.

(संग्रहित छायाचित्र)

आशीष ठाकूर

पाऊस आणि अर्थमंत्र्यांच्या जुगलबंदीत, एकीकडे पावसाचे कोसळणे, तर दुसऱ्या बाजूला अर्थमंत्र्यांच्या आर्थिक सवलतींच्या वर्षांवात दे न्हाऊन निघत आहे. अखेर अर्थमंत्र्यांनी बाजी मारत तमाम गुंतवणूकदारांना प्रसन्न करत त्यांच्या मनात तेजीचे उधाण वारे भरले. या पाश्र्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स – ३८,८२२.५७

निफ्टी – ११,५१२.४०

या स्तंभातील २६ ऑगस्टच्या ‘बाजार सावरला अखेर’ या लेखातील एका उताऱ्याचा आधार घेत आता चालू असलेल्या  तेजीची भविष्यकालीन वाटचाल जाणून घेऊ या.. ‘सामना’ चित्रपटातील ‘मारुती कांबळेचं काय झालं’ प्रश्नासारखे आपल्या बाजारात ‘शाश्वत तेजी कधी येणार? असे सतत विचारले जाते. याचे उत्तर जे पूर्वीही या स्तंभात दिले आहे, ते म्हणजे, निर्देशांकांनी सातत्याने सेन्सेक्सवर ३८,८०० आणि निफ्टीवर ११,६०० स्तरावर टिकणे नितांत गरजेचे आहे. या स्तरावर निर्देशांक सातत्याने टिकल्यास बाजार मंदीच्या विळख्यातून बाहेर आला असे समजण्यास हरकत नाही.

आता चालू असलेल्या नितांतसुंदर, सुखद तेजीत निर्देशांक सेन्सेक्सवर ३८,८०० आणि निफ्टीवर ११,६००च्या वर सातत्याने टिकत नाही. आताच्या तेजीत जे गुंतवणूकदार सहभागी होऊ शकले नाहीत त्यांना पुन्हा एकवार संधी ही सेन्सेक्सवर ३८,००० ते ३७,४०० आणि निफ्टीवर ११,३०० ते ११,१०० ला असेल. या स्तरावर पायाभरणी झाल्यावर निर्देशांकांचा नवीन उच्चांक हा सेन्सेक्सवर ४२,३०० आणि निफ्टीवर १२,७५० असा असेल.

तिमाही निकालांचे विश्लेषण..

  अ‍ॅक्सिस बँक

या स्तंभातील २९ जुलैच्या लेखातील या समभागाचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर हा ७०० रुपये सूचित केला होता. निकालाअगोदर २६ जुलैचा बंद भाव हा ७३० रुपये होता. जर प्रत्यक्ष निकाल निराशादायक असल्यास ७०० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत समभागाची ६५० रुपयांपर्यंत घसरण होईल, असे निकालाअगोदरचे विश्लेषण होते.

प्रत्यक्ष निकाल निराशादायक असल्याने ८ ऑगस्टला समभागाने ६४३ रुपयांचा नीचांक नोंदवला. आज दोन महिन्यांनंतर, बाजारातील तेजीच्या उधाण वाऱ्यात अ‍ॅक्सिस बँकेचा शुक्रवारचा बंद भाव ७०० रुपयांच्या महत्त्वाच्या केंद्रिबदू स्तरावरच बंद व्हावा? याला आणखी काय म्हणावं!

टायटन कंपनी लिमिटेड

या स्तंभातील ५ ऑगस्टच्या लेखातील या समभागाचा बंद भाव त्यासमयी १,०६२ रुपये होता. वित्तीय निकाल जाहीर झाल्यानंतरचा महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर १,०४० रुपये होता. लेखात म्हटल्याप्रमाणे, जर वित्तीय निकाल उत्कृष्ट असेल तर १,०४० रुपयांचा स्तर राखत प्रथम वरचे लक्ष्य १,१०० रुपये व त्यानंतर १,१७५ रुपयांचे वरचे लक्ष्य सूचित केले होते. हे प्रत्यक्ष निकालाअगोदरचे विश्लेषण होते.

टायटनचा प्रत्यक्ष निकाल अतिशय उत्कृष्ट असल्याने सहजगत्या १,१७५ रुपयांचे इच्छित वरचे लक्ष्य १७ सप्टेंबरला तेजीचा मागमूस नसताना साध्य केले गेले. २० सप्टेंबरनंतरच्या तेजीच्या उधाण वाऱ्यात टायटनने १,२९० रुपयांच्या उच्चांकाला गवसणी घालत, दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारांना हा समभाग आपण मंदीतही राखून ठेवल्याचे समाधान तर दिलेच; पण अत्यल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांनीही अवघ्या दीड महिन्यांत १० टक्क्यांचा परतावा मिळविला.     (क्रमश:)

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती :  शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2019 2:01 am

Web Title: market trends share market trends senesex nifty abn 97
Next Stories
1 वारसा हक्क कायदा
2 बाजार-साप्ताहिकी : अखेर स्वप्नवत तेजी
3 नियोजन भान : पहिले ते हरिकथा निरूपण
Just Now!
X