दीर्घकालीन गुंतवणूक प्रक्रियेतूनच संपतीची निर्मिती होते. म्हणूनच किरकोळ गुंतवणूकदारांनी एखादा आपल्या गरजांची पूर्ती करणारा फंड निवडून या फंडात पाच ते सात वष्रे एसआयपी सुरू ठेवणे हाच एकमेव उपाय आहे. पुढील तीन-चार वष्रे बाजार गुंतवणूकदारांना निश्चितच चांगला परतावा देईल. सांगताहेत आयडीबीआय म्युच्युअल फंडचे कार्यकारी संचालक बी. सरथ शर्मा

भांडवली बाजाराच्या सद्य:स्थितीबाबत काय सांगाल?
अर्थव्यवस्थेचा विस्तृत आढावा घ्यायचा म्हटले तर देशाच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल सकारात्मकच आहे. टप्प्याटप्प्याने सुदृढ होत जाणारा रुपया, कच्च्या तेलाचे शंभर डॉलर प्रति िपपच्या आत असणारे दर व भविष्यातही ते कमी होण्याची शक्यता तसेच गेल्या दहा वर्षांत प्रथमच डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता, अल निओ परिणामाच्या शक्यतेला छेद देऊन यंदा पुरेसा झालेला पाऊस, सतत चौथ्या महिन्यात वाहनांच्या विक्रीत झालेली वाढ हे सर्वच अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची इतके शुभ संकेत एकाच वेळी ऐकण्याची सवय मोडली आहे, असे गमतीने म्हटले जाते. मात्र यात पाश्र्वभूमीवर आगामी तीन-चार वर्षांसाठी बाजाराचा कल निश्चितच सकारात्मक राहील, अशी आशा आहे.

आयडीबीआय म्युच्युअल फंड सध्या कोणत्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करीत आहे?
गेल्या सहा महिन्यांचा अपवाद वगळता तीन-चार वर्षांत भारतीय बाजाराने जागतिक बाजारांच्या तुलनेत कमी परतावा दिला आहे. त्यामुळे निफ्टी किंवा सेन्सेक्समधील बहुतांश कंपन्यांचे मूल्यांकन त्यांच्या अपेक्षित मूल्यांकनापेक्षा खूपच कमी होते. आजही या कंपन्यांचे दर वर गेले असले तरी त्यांच्या भविष्यातील उत्सर्जनाच्या (एं१ल्ल्रल्लॠ) तुलनेत त्यांचे मूल्यांकन फार वाढले आहे, असे म्हणता येणार नाही. अशा कंपन्यांचा आम्ही आमच्या गुंतवणुकीत समावेश केला आहे. ज्यांचे ताळेबंदातील कर्जाचे प्रमाण नियंत्रणात आहे व ज्या कंपन्यांनी तीन-चार व्यावसायिक आवर्तने अनुभवली आहेत अशा तसेच ज्या कंपन्या आपली उत्पादने योग्य किमतींना बाजारात विकू शकतात, अशांचा विचार आम्ही करतो.

इतर फंड घराणी मुदतबंद योजना आणत असताना तुम्ही ‘आयडीबीआय डायव्हर्सिफाइड इक्विटी फंड’ ही गुंतवणुकीस कायम खुली असलेली योजना आणली? ते कसे काय?
मला इतरांबद्दल सांगता येणार नाही. मात्र ही योजना गुंतवणूकदारांना उपलब्ध करून देण्यामागचा आमचा उद्देश गुंतवणूकदारांना अव्वल परतावा मिळावा हाच आहे. ‘आयडीबीआय डायव्हर्सिफाइड इक्विटी फंड’ हा ‘मल्टिकॅप’ इक्विटी फंड आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीतून नफा कमविणे हा या फंडाचा उद्देश आहे. आमच्याकडे दोन निधी व्यवस्थापक व दोन विश्लेषक हे समभागात गुंतवणूक करणाऱ्या योजनांचे व्यवस्थापन पाहतात. हा फंड पहिल्यांदा मार्च २०१४ मध्ये गुंतवणुकीस खुला झाला होता. याच सुमारास शेअर बाजारानेही जोर पकडल्यामुळे मागील सहा महिन्यांचा परतावा ५५ टक्के आहे. असाच परतावा भविष्यात मिळेल, असा आमचा दावा नाही; परंतु प्रमुख निर्देशांकाने दिलेल्या परताव्यापेक्षा या फंडातून गुंतवणूकदारांना काकणभर सरसच परतावा हा फंड देईल.
अनेक म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचे असे म्हणणे आहे की, म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत फारसे पदरात काही पडत नाही आणि फायदा झालाच तर अत्यल्प असतो. तुम्ही या मानसिकतेबाबत काय सांगाल?
याबाबत मी असे म्हणेन की, हा गुंतवणूकदारांचा निव्वळ गरसमज आहे. पहिली गोष्ट म्हणजे गुंतवणुकीत सातत्य हवे. २००७-०८चा विचार केल्यास असे आढळून येईल की म्युच्युअल फंडांत किरकोळ गुंतवणूकदारांनी निधी हा तेजी शेवटच्या टप्प्यात असताना गुंतविला. नोव्हेंबर २००७ ते जानेवारी २००८ या काळात म्युच्युअल फंडांवर पशाचा पाऊस पडत होता. ज्या गुंतवणूकदारांनी या शेवटच्या टप्प्यात पसे गुंतविले ते गुंतवणूकदार असे म्हणत असतील तर समजता येऊ शकते. परंतु हे टाळण्यासाठी एसआयपी हा एकमेव पर्याय आहे. दीर्घकालीन गुंतवणूक प्रक्रियेतूनच संपतीची निर्मिती होते. म्हणूनच किरकोळ गुंतवणूकदारांनी आपल्या गरजांची पूर्ती करणारा एखादा फंड निवडून या फंडात पाच ते सात वष्रे एसआयपी सुरू ठेवणे हा एकमेव उपाय आहे.