अजय वाळिंबे

वर्ष १९९४ मध्ये स्थापन झालेली मयूर युनिकोटर्स आज भारतातील पीव्हीसी आणि कृत्रिम चामडे उत्पादन करणारी एक मोठी आघाडीची कंपनी आहे. २०१२ मध्ये कंपनीचा प्रतिष्ठित फोर्ब्स एशिया २०० सूचीमध्ये समावेश करण्यात आला. कंपनीची उत्पादने विविध क्षेत्रांतील उद्योगात मोठय़ा प्रमाणावर वापरली जातात. यात मुख्यत्वे वाहन उद्योग, पादत्राणे, फर्निंशिंग वस्त्रोद्योग आणि एफएमसीजी यांचा समावेश होतो. १९९४ मध्ये राजस्थानमधील जयपूरस्थित जैतपुरा येथे उत्पादन सुरू केल्यानंतर कंपनीने धोडसर येथे अद्ययावत उत्पादन प्रकल्प सुरू केला आहे. आपल्या उत्पादनांसाठी कंपनीने जर्मनी तसेच इटलीमधून मशीन्स आयात केली आहेत. गुणवत्तेच्या जोरावर कंपनीच्या उत्पादनांना केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही मोठी मागणी आहे. कंपनीच्या ग्राहक मांदियाळीत वाहन तसेच कृत्रिम चामडे वापरणाऱ्या तसेच एफएमसीजी क्षेत्रातील अनेक देशी-विदेशी कंपन्यांचा समावेश असून त्यात प्रामुख्याने मारुती, फोर्ड, डायम्लर, मिहद्र, लीएर, मॅग्ना, होंडा, टाटा, निसान, ह्य़ुंडाई, सोनालिका, जॉन्सन कंट्रोल, लेहर, रिलॅक्सो, अ‍ॅक्शन आदींचा उल्लेख करावा लागेल.

Upsc ची तयारी: अर्थव्यवस्था : भारतातील बेरोजगारीचे अंत:प्रवाह
LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”

पर्यावरणविषयक जागरूकता, चामडय़ाला पर्यायी उत्पादन, तसेच गुणवत्तेच्या जोरावर कंपनी सातत्याने उत्तम कामगिरी करत आहे. सप्टेंबर २०१९ साठी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने १२४.२ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २० कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत त्यात कुठलीही वाढ झाली नसली तरीही सध्याच्या वाहन उद्योगातील मंदीचा परिणाम पाहता हे निकाल चांगलेच म्हणायला हवेत. उत्पादनाच्या वैविध्यामुळे मागणी वाढत असून आगामी कालावधीत कंपनीकडून भरीव कामगिरीची अपेक्षा आहे. कंपनीने आपल्या भागधारकांना २०१२ आणि २०१४ मध्ये १:१ प्रमाणात बक्षीस समभाग वाटप केले आहे. केवळ ०.३ बिटा असलेली मयूर युनिकोटर्स मध्यमकालीन गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटते.

मयूर युनिकोटर्स लि.

(बीएसई कोड – ५२२२४९)

शुक्रवारचा बंद भाव : रु. २१२.००

मायक्रो कॅप समभाग

प्रवर्तक : —–

व्यवसाय : प्लास्टिक, पीव्हीसी

बाजार भांडवल : रु. ९६५ कोटी

वर्षभरातील उच्चांक/नीचांक : रु.  ४१० / २००

भागभांडवल : रु.  २२.६६ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक    ६१.३४

परदेशी गुंतवणूकदार  १३.४६

बँक/ म्यु. फंड/ सरकार    ४.८६

इतर/ जनता    २०.३४

पुस्तकी मूल्य : रु. ११५.४

दर्शनी मूल्य :   रु. ५ /-

लाभांश :  ६५ %

प्रति समभाग उत्पन्न :    रु. १६.९९

पी/ई गुणोत्तर : १२.१

समग्र पी/ई गुणोत्तर :    १७.३४

डेट इक्विटी गुणोत्तर :    ०.०४

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर : ६६९.४४

रिटर्न ऑन कॅपिटल : २५.९७

बीटा :    ०.३