12 August 2020

News Flash

अर्थ वल्लभ : ‘रिलायन्स’ गुंतवणुकीचे लाभार्थी 

म्युच्युअल फंड गुंतवणुकीसंबंधित माहिती देणारे साप्ताहिक सदर

शिफारसप्राप्त फंडांचा पुनर्वेध

वसंत माधव कुळकर्णी

विद्यमान आर्थिक वर्षांची पहिली तिमाही दशकातील सर्वात वेगाने निर्देशांक वाढीची होती. साहजिकच निर्देशांक वाढीचे माप गुंतवणूकदारांच्या पदरात कोणत्या म्युच्युअल फंडाने किती टाकले हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. सरलेल्या तिमाहीने फंड निवडीत ‘अप-मार्केट कॅप्चर रेशो’ सर्वाधिक कोणाचा आहे याचे वेध तिमाही संपण्यासाठी दोन-तीन दिवस आधीपासून लागले होते. परंतु तिमाही संपण्याची वाट पाहावी लागणार होती.

सरलेली एप्रिल ते जून तिमाही दशकातील सर्वात वेगाने निर्देशांक वाढीची असली तरी बाजारातील अस्थिरता या काळात शिगेला पोहचली होती. अस्थिरता मोजण्यासाठी प्रत्येक बाजाराचा ‘व्हॉलेटॅलिटी इंडेक्स’ (व्हीआयएक्स- विक्स) असतो. आपल्याकडे सुद्धा तसा तो आहे. सामान्यपणे ३० ते ४० दरम्यान असणारा हा निर्देशांक जानेवारी ते १६ मार्चपर्यंत चढा राहिला. ‘विक्स’ने १६ मार्च रोजी शिखर गाठून आता या निर्देशांकाची सामान्य स्थितीत येण्याच्या म्हणजे खालच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. या तिमाहीतील निधी व्यवस्थापन म्हणजे निसरडय़ा खेळपट्टीवर आपला बळी जाऊ  न देता धावफलक हलता ठेवण्यासारखे होते. कोणी किती धावा जोडल्या आणि कोणाचे बळी गेले याचा शोध घेण्याचा हा प्रयत्न आहे.

वर म्हटल्याप्रमाणे सर्वाधिक अस्थिर तिमाही अशी सरलेल्या तिमाहीची इतिहासात नोंद होईल. निर्देशांक घसरून जेव्हा पुन्हा ‘यू टर्न’ घेतो तेव्हा जो निधी व्यवस्थापक या बदलास त्वरित प्रतिसाद देतो त्या निधी व्यवस्थापकाच्या फंडाला या बदलाचा सर्वाधिक फायदा होतो. बाजारातील अस्थिरतेचे प्रतिबिंब ‘लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंडां’च्या यादीत दिसत आहे. जानेवारी २०१५ पासून सर्वाधिक वगळले गेलेल्या आणि नव्याने यादीत आलेल्या फंडांची सर्वाधिक संख्या या तिमाहीत दिसून आली. एकच तिमाहीत वगळल्या गेलेल्या आणि अंतर्भूत केलेल्या फंडांची संख्या दहा आहे. इतका टोकाचा आणि वेगवान बदल या आधी अनुभवण्यास मिळाला नाही. या अस्थिरतेमुळे काही ‘स्टार’ निधी व्यवस्थापकांची कामगिरी त्यांच्या लौकिकाला साजेशी दिसली नाही तर प्रसिद्धीचे वलय नसलेल्यांनी कामगिरीने विश्लेषकांचे लक्ष वेधले.

या काळात सर्वाधिक चमकदार कामगिरी करणाऱ्या फंडांनी हा लाभ मिळविण्यासाठी काय काय खरेदी केले हा या अभ्यासाचा दुसरा टप्पा होता. या कालखंडात चमकदार कामगिरी केलेल्या बहुतेक फंडांनी मार्च महिन्यांत रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग मोठय़ा संख्येने खरेदी केल्याचे दिसून आले. याला अपवाद ठरला तो यूटीआय इक्विटी फंड. ‘रिलायन्स’ला वगळून देखील इतरांच्या तोडीस तोड किंबहुना इतरांपेक्षा सरस कामगिरी असलेला हा फंड केवळ मल्टीकॅप गटातच नव्हे तर १० हजार कोटींपेक्षा व्यवस्थापनाखालील अधिक मालमत्ता असलेल्या फंडामध्ये सर्वात चमकदार कामगिरी केलेला फंड ठरला. या फंडाचा अपवाद वगळता बहुतेक फंड रिलायन्स गुंतवणुकीचे लाभार्थी ठरले असल्याचे दिसत आहे.

फेब्रुवारी आणि जूनदरम्यानच्या फंडांच्या विवरणिका (फंड फॅक्टशीट्स) तपासल्या असता सर्वच फंड रिलायन्स गुंतवणुकीने पावन झालेले दिसले. मागील दोन वर्षांपासून या यादीचा भाग असलेले एलआयसी टॅक्स प्लान, मिरॅ अ‍ॅसेट इर्मजिंग ब्लूचीपसारखे फंडांचा यादीत समावेश न झाल्याने चुटपुट लागून राहिली आहे. सोबतच्या यादीपैकी कोणते फंड रिलायन्समधील गुंतवणूक काढून घेऊन नफा गुंतवणूकदारांच्या पदरात टाकतात आणि कोणते फंड रिलायन्स लाटेत तरून जातात हे पाहणे चालू तिमाहीत उत्सुकतेचे आहे. ‘सेबी’प्रणीत वर्गवारीनुसार फंडांची शिफारस सोबत दिली आहे. वाचकांनी आपल्या सल्लागाराची मदत घेऊन गुंतवणुकीसाठी फंड निवड करावी.

शिफारसयोग्य फंडांची यादी

ईएलएसएस

*   बीओआय अ‍ॅक्सा टॅक्स अ‍ॅडव्हान्टेज

*   अ‍ॅक्सिस लाँग टर्म इक्विटी

*   कॅनरा रोबेको इक्विटी टॅक्स सेव्हर

फोकस्ड

*   एसबीआय फोकस्ड

*   अ‍ॅक्सिस फोकस्ड २५

*   प्रिन्सिपल फोकस्ड मल्टीकॅप

लार्ज कॅप

*   अ‍ॅक्सिस ब्लूचीप

*   कॅनरा रोबेको ब्लूचीप इक्विटी

*   एलआयसी एमएफ लार्जकॅप

लार्ज अ‍ॅण्ड मिडकॅप

*   एलआयसी लार्ज अ‍ॅण्ड मिडकॅप

*   एडेल्वाईज लार्ज अ‍ॅण्ड मिडकॅप

*   कॅनरा रोबेको इमर्जिंग इक्विटीज

मिड कॅप

*   अ‍ॅक्सिस मिडकॅप

*   एल अ‍ॅण्ड टी मिडकॅप

*   पीजीआयएम इंडिया मिडकॅप अपॉच्र्युनिटिज

मल्टी कॅप

*   पराग पारीख लाँग टर्म इक्विटीज

*   पीजीआयएम इंडिया डायव्हर्सिफाईड इक्विटी

*   यूटीआय इक्विटी फंड

स्मॉल कॅप

*   अ‍ॅक्सिस स्मॉलकॅप

*   बीओआय अ‍ॅक्सा स्मॉलकॅप

*   निप्पॉन इंडिया स्मॉलकॅप

आंतरराष्ट्रीय

*   निप्पॉन इंडिया यूएस इक्विटी

*   पीजीआयएम इंडिया ग्लोबल इक्विटी

*   एबीएसएल इंटरनॅशनल इक्विटी

shreeyachebaba@gmail.com

म्युच्युअल फंड गुंतवणुकीसंबंधित माहिती देणारे साप्ताहिक सदर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 20, 2020 1:03 am

Web Title: mutual fund information on mutual fund investments zws 70
Next Stories
1 नावात काय : ‘डच डिसीझ’
2 बाजाराचा तंत्र कल : व्वा लाजवाब!
3 बाजाराचा तंत्र कल : निर्देशांकांची ‘किंतु-परंतु’ वाटचाल
Just Now!
X