14 December 2019

News Flash

सातत्य आणि नवता

डेट फंडात दोन प्रकारचे धोके असतात. पहिला वेळेवर पसे परत न मिळण्याचा धोका ज्याला ‘क्रेडिट रिस्क’ असे म्हणतात

|| वसंत कुलकर्णी

बँकेच्या मुदत ठेवींना पर्याय असलेला हा फंड प्रकार रोकडसुलभता बाळगणाऱ्या कंपन्यांच्या गळ्यातील ताईत बनला असला तरी वैयक्तिक गुंतवणूकदारांचे या फंड प्रकाराकडे फारसे लक्ष गेलेले नाही. म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांतच नव्हे तर फंड वितरकांमध्येसुद्धा रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडांबाबत उदासीनता होती. त्यातच भारतात घडत असलेल्या वेगवेगळ्या एका मागोमागच्या रोखे मुदतपूर्तीनंतर परतफेडीबाबतच्या अनियमिततेने या उदासीनतेची जागा धिक्काराने घेतली आहे.

म्युच्युअल फंडांच्या प्रमाणीकरण/ फेरवर्गीकरणानंतर जे काही फंड प्रकार गुंतवणूकदारांना नव्याने उपलब्ध झाले, त्यात बँकिंग अँड पीएसयू डेट फंड हा एक फंड प्रकार आहे. बँकांच्या मुदत ठेवीच्या व्याजाइतके उत्पन्न आणि बँकेच्या बचत खात्याची रोकडसुलभता असलेला हा फंड प्रकार आहे. बँकेच्या मुदत ठेवींना पर्याय असलेला हा फंड प्रकार रोकडसुलभता बाळगणाऱ्या कंपन्यांच्या गळ्यातील ताईत बनला असला तरी वैयक्तिक गुंतवणूकदारांचे या फंड प्रकाराकडे फारसे लक्ष गेलेले नाही.

डेट फंडात दोन प्रकारचे धोके असतात. पहिला वेळेवर पसे परत न मिळण्याचा धोका ज्याला ‘क्रेडिट रिस्क’ असे म्हणतात आणि व्याजदर वाढण्याचा धोका ज्याला ‘डय़ुरेशन रिस्क’ असे म्हणतात. ज्या कोणी डेट फंडांची लज्जत चाखली आहे त्यांना ठाऊक असेल की अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड गुंतवणुकीत ‘डय़ुरेशन रिस्क’ शॉर्ट टर्म फंडातील ‘डय़ुरेशन रिस्क’पेक्षा कमी असते.

सध्या ‘बँकिंग अँड पीएसयू डेट फंड’ या फंड प्रकारात २१ फंड असून, १,००० कोटी किंवा त्यापेक्षा अधिक मालमत्ता असणारे १२ फंड आहेत. या फंड गटाचा मागील एक वर्षांचा सरासरी परतावा ९.२५ टक्के, तर तीन वर्षांचा सरासरी परतावा ७.९२ टक्के आहे. हे फंड अधिकतर निधी बँकांच्या ‘सीडी’मध्ये किंवा सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे रोख्यांत गुंतवतात – गुंतवणूक केलेले रोखे बहुतेक ‘ट्रिपल ए’ पत धारण करणारे असून बहुतांश फंडांकरिता संपूर्ण पोर्टफोलिओ उच्च पत असलेल्या रोख्यांत गुंतवणूक केली आहे. हे सर्च रोखे रोकडसुलभ आणि कमी म्हणजे सरासरी तीन ते साडेतीन वष्रे मुदतपूर्ती शिल्लक असलेले असतात. या फंड गटात गेल्या १२ महिन्यांमध्ये सरासरी मुदत सुमारे दोन वष्रे होती. फंडांच्या गुंतवणुकीत आरईसी, पीएफसी, आयआरएफसी, नाबार्ड आणि सिडबीसारख्या केंद्र सरकारच्या मालकीच्या कंपन्यांचे रोखे आहेत. या फंडांचे सक्रिय व्यवस्थापन केले जाते. उच्च पत आणि रोख्यांची मुदतपूर्ती होण्यास सरासरी १२ ते १८ महिन्यांचा कालावधी असल्याने हे रोखे अतिशय रोकडसुलभ आहेत.

या रोख्यांतील गुंतवणुकीतून गुंतवणूकदारांना दोन प्रकारे लाभ होतो. एक, रोख्यांवर देय असलेले व्याज, दुसरा लाभ हा रोख्यांच्या व्याजदर आणि मुदतीच्या सक्रिय व्यवस्थापनातून होणारा भांडवली लाभ होय. सध्याच्या परिस्थितीत व्याजदर कमी होत असल्याने या फंडांना रोख्यांच्या किमतीत वाढ होत असल्याने चांगला भांडवली लाभ मिळत आहे. या भांडवली लाभामुळेच फंडांचा मागील एका वर्षांचा परतावा ९ टक्क्यांहून अधिक आहे. बँकेच्या मुदत ठेवीधारकास मिळणाऱ्या व्याजापेक्षा या फंडातील एका वर्षांचा परतावा अधिक आहे.

या फंड गटाला परताव्याचा दीर्घ इतिहास नाही. बहुतेक फंड मागील आठ ते दहा वर्षांपासून अस्तित्वात असले तरी बँका आणि केंद्र सरकारच्या मालकीच्या कंपन्यांच्या रोख्यांत गुंतवणूक करण्याचे धोरण फंड घराण्यांनी फंडांच्या प्रमाणीकरणानंतर निश्चित केले. बहुतेक फंड या प्रकारच्या गुंतवणुकीचे धोरण मागील वर्षभरापासून राबवीत आहेत. या फंड गुंतवणुकीत कमी मुदतीच्या रोख्यांचा समावेश असल्याने फंडांच्या ‘नक्त मालमत्ता मूल्यांत’ अस्थिरता कमी आहे. साहजिकच फंडांना बाजार जोखमीमुळे (मार्क टू मार्केट) होणारे नुकसान अल्प असते. हा लेख लिहिण्यापूर्वी फंडांची एक महिन्याची चलत सरासरी ३ वष्रे आणि ५ वष्रे कालावधीसाठी तपासली असता, एखादा (जुल २०१३) अपवाद वगळता फंडांनी एका महिन्यात ६.५ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. रुपयाची घसरण रोखण्याकरिता रिझव्‍‌र्ह बँकेने १५ जुल २०१३ रोजी अल्प मुदतीच्या व्याजदरात एका रात्रीत २ टक्क्यांची वाढ केली. परिणामी, रोख्यांच्या किमतीत मोठी घसरण झाली. हा अपवाद वगळता एक महिन्याच्या गुंतवणुकीवर या फंडांनी चांगला परतावा दिला आहे. त्याचबरोबर जेव्हा जेव्हा व्याजदर कमी झाले, तेव्हा या फंडांनी भरघोस परतावा दिलेला नाही. ही या फंडांची मर्यादा गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्यायला हवी. हे फंड गुंतवणुकीत व्याज किंवा कर्जाच्या प्रकारची जोखीम घेत नसल्याने बँक मुदत ठेवधारकांना हा कर-कार्यक्षम पर्याय आहे. या गटातील २१ फंडांच्या अभ्यासानंतर पुढील पाच फंडांची गुंतवणुकीसाठी निवड करता येईल.

shreeyachebaba@gmail.com

First Published on July 15, 2019 12:15 am

Web Title: mutual fund investment mpg 94
Just Now!
X