गेल्या आठवडय़ाची सुरुवात ‘काळ्या सोमवार’च्या भयानकतेने झाली. शेअर बाजारातील गुंतवणूक धोक्याची कशी व कितपत ठरू शकते, याचा प्रत्यय अनेक गुंतवणूकदारांना त्या दिवसाने दिला असेल. त्यानंतरही बाजारात सौदे करणाऱ्या गुंतवणूकदारांना धाडसीच म्हटले पाहिजे. सर्वसामान्य गुंतवणूकदारांची मानसिकता अशा वेळी शेअर बाजारातून बाहेर पडण्याचीच असते. पण नेमकी या वेळीच गुंतवणूक केल्यास ती फायद्याची ठरते, असे इतिहास सांगतो. ज्या कंपन्यांचे शेअर्स महाग वाटत असतात असे शेअर्स खरेदी करायची ही एक उत्तम संधी असते. अशा अनिश्चित्ततेच्या काळात टप्प्याटप्प्याने खरेदी अथवा विक्री करणे कधीही सुरक्षित आणि फायद्याचे ठरते. म्युच्युअल फंडातही एसआयपी करतात ते याचसाठी.

स्टील स्ट्रिप्स व्हील्स लिमिटेड ही आज सुचवलेली कंपनी नावाप्रमाणेच सर्व प्रकारच्या वाहनांसाठी चाकांचे उत्पादन करते. १९९१ पासून या कंपनीचे भारतात पंजाब, चेन्नई आणि जमशेदपूर येथे तीन प्रकल्प कार्यरत असून देशांतर्गत सर्वच मोठय़ा वाहन कंपन्यांना येथून वार्षिक जवळपास १.७० कोटी चाकांचा पुरवठा होतो. भारताखेरीज जागतिक बाजारपेठेतही कंपनीने आपले स्थान पक्के केले असून जर्मनी, इटली, अर्जेटिना, जपान, थायलंड, फ्रान्स, ऑस्ट्रिया अशा अनेक देशांतील बीएमडब्ल्यू, ऑडी, पियाज्जियो, निस्सान अशा अनेक मोठय़ा वाहन कंपन्यांना कंपनी पुरवठा करीत आहे. इतर काही देशात कंपनीने भागीदारी करार केले असून त्या पकी जी एस ग्लोबल कॉर्पोरेशन या कोरियन कंपनीचे स्टील स्ट्रिप्समध्ये २.५% भांडवल आहे. या खेरीज सुमितोमो मेटल या जपानी कंपनीचे ५.७% तर टाटा स्टीलचे ८.५% भागभांडवल कंपनीत आहे. उत्पादंनाच्या गुणवत्तेसाठी कंपनीने िरग टेक या जपानी कंपनीचे तांत्रिक सहाय्य घेतले आहे. ३० जून रोजी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने २९२.५४ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १२.१५ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या तिमाहीच्या तुलनेत तो ९५% अधिक आहे. कंपनीचे इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर थोडे कमी वाटत असले तरीही येत्या वर्षभरात कंपनी कर्ज कमी करेल, अशी आशा आहे. सध्या ३३५ च्या आसपास उपलब्ध असलेला हा शेअर मध्यमकालीन गुंतवणुकीसाठी योग्य वाटतो.
stocksandwealth@gmail.com

power supply of Kalyan East was suddenly interrupted in early morning
उकाड्याच्या होरपळीत कल्याणमध्ये विजेचा लपंडाव, उकाड्याने नागरिक हैराण
In Vidarbha thousands of hectares of orchards and crops were destroyed due to unseasonal rains
विदर्भात हजारो हेक्टरवरील फळबागा, पिकांची नासाडी; तिसऱ्या दिवशीही अवकाळीचे तांडव
IPL 2024 Lucknow Mumbai Indians vs Rajasthan Royal Match Updates in Marathi
IPL 2024 MI vs RR: हार्दिक पंड्याची हुर्यो उडवणाऱ्यांना रोहित शर्माने थांबवलं? व्हीडिओ होतोय व्हायरल
Hardik Malinga Pushing Video Viral
MI vs SRH : हार्दिक पंड्याने लसिथ मलिंगाला ढकलल्याने चाहते संतापले, VIDEO होतोय व्हायरल

 

बाजारभाव : ” ३३४
प्रमुख व्यवसाय : वाहनांची चाके
पुस्तकी मूल्य : ” २२६.७०
दर्शनी मूल्य : ” १०/-
प्रति समभाग उत्पन्न : ” २९.७२
किं/उ गुणोत्तर (पी/ई) : १०.५७ पट
डेट/ इक्विटी गुणोत्तर : २.११
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर : २.३९
रिटर्न ऑन नेटवर्थ (%) : ६.७७
बीटा : १.२
बाजार भांडवल: ” ४८५ कोटी
वार्षिक उच्चांक/नीचांक: “३९६/ २५५
भरणा झालेले भागभांडवल: “१५.२६ कोटी
शेअर होिल्डग पॅटर्न (%)
प्रवर्तक ५८.१०
परदेशी गुंतवणूकदार ०.४०
बँक्स/म्युच्युअल फंड्स ०.३९
इतर ४१.११

सूचना: लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.