22 January 2018

News Flash

म्हणे, आपण अर्थ साक्षर!

मराठी माणसांमध्ये पूर्वापार श्रीमंतीबद्दल आणि श्रीमंताबद्दलही विचित्र दृष्टीकोन आढळून येतो.

जयंत विद्वांस | Updated: September 21, 2015 1:05 AM

मराठी माणसांमध्ये पूर्वापार श्रीमंतीबद्दल आणि श्रीमंताबद्दलही विचित्र दृष्टीकोन आढळून येतो. आता पुढची पिढी शिक्षण, नोकरी धंद्यानिमित्ताने परदेशी जाऊ लागली आहेत. त्यामुळे हळूहळू हा दृष्टीकोन बदलत चालला आहे इतकेच. बुद्धिमत्ता व कष्ट याद्वारे आíथक सुबत्ता येईल व ती मराठी समाजाला ‘पत’ देईल. मात्र यासाठी आपल्या पुढच्या पिढय़ांना प्रयत्नपूर्वक आíथक साक्षर बनविले गेले पाहिजे.
आपल्यावर पिढय़ान् पिढय़ा साक्षरतेचे संस्कार झाले आहेत. परंतु आíथक साक्षरता आपल्या डीएनएमध्ये आलेलीच नाही. त्यामुळेच मराठी माणसांमध्ये श्रीमंतीबद्दल आणि श्रीमंताबद्दलही विचित्र दृष्टीकोन आढळून येतो. आता पुढची पिढी शिक्षण, नोकरी धंद्यानिमित्ताने परदेशी जाऊ लागली आहेत. त्यामुळे हळूहळू हा दृष्टीकोन बदलत चालला आहे इतकेच. या आíथक निरक्षरतेपायी मराठी समाज म्हणून आपल्याला ‘पत’ नाही.
वैयक्तिक आíथक पत या बद्दल मी म्हणत नसून संपूर्ण मराठी समाजाची पत म्हणत आहे. ही पत असेल तर समाजाच्या उन्नतीसाठी किंवा मराठी समाजासाठी खूप काही करता येणे शक्य असते. साधे उदाहरण बघा, महाराष्ट्रात ज्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण देता येईल असे असंख्य समाजसेवक आहेत परंतु त्यांना पद्मश्रीवर समाधान मानावे लागते किंवा पद्मश्रीसुद्धा मिळालेली नाही. याचे कारण आपली दिल्ली लॉबी नाही(पत नाही). आपली जी काही थोडीफार मराठी म्हणून पत असते ती आपण रोजच्या दिवसांत तोंडात पोळ्या कोंबून घालवून बसतो.
हे सर्व आज आठवण्याचे कारण? पर्युषणकाळांत मांस विक्रीवर घातलेली बंदी. ही बंदी जैन लोकांची आíथक ‘पत’ दाखवते. आज महाराष्ट्राची लोकसंख्या जवळपास तेरा कोटी आहे. त्यापकी एक शतांशसुद्धा जैन नाहीत पण त्यांच्यासाठी पर्युषणकाळात मांस विक्रीवर बंदी. याच काळात आपला गणपती उत्सव असतो, आणि बहुसंख्य समाज गौरीला नवेद्य मासांहारी दाखवत असतो, तरीही बंदी!
आज सर्व पंचतारांकित हॉटेलात जैन पदार्थ मिळतात. पंचतारांकित हॉटेलात भरलेल्या मोठय़ा परिषदात जेवणाची सोय जैन पद्धतीत असतेच असते. समजा नसेल, तर ‘‘जैन फूड नहीं है क्या?’’ म्हटल्याबरोबर दोन माणसांसाठी सुद्धा जैन जेवणाची सोय केली जाते. हे सर्व त्यांच्या आíथक शक्तीमुळे होते. पुरणाची पोळी मात्र कोणत्याही पंचतारांकित हॉटेलात मिळत नाही.
या आíथक सुबत्तेपायी जैन समाजाने काय काय मिळविले, मिळवीत आहेत याची उदारहणांनाही तोटा नाही. काही महिन्यांपूर्वी एका मोठय़ा उद्योगपतीने सांगितले होते की एका राजकीय पक्षाचे दुकान आम्हीच चालवतो. पण वस्तुस्थिती अशी आहे आज हा जैन समाज सर्वच दुकाने चालवत आहे. हे सर्व आíथक सुबत्तेद्वारे चालू आहे. या उलट आपली आíथक सुबत्ता काहीही नाही व वाचाळपणा मात्र सुरू आहे. परिणाम चार पकी तीन दुकानदारांची तोंडे बंद झाली आणि चौथ्यासाठी आता हा विषय संपलेला आहे.
ज्यावेळेस आपण समाजाची पत किंवा समाजाची श्रीमंती म्हणतो त्यावेळेस त्या समाजातील प्रतिष्ठित चारशे-पाचशे अब्जाधीश डोळ्यांसमोर येतात, जे आपल्या समाजासाठी आपली पत उभी करतात. अशी चार-पाचशे मराठी माणसे संपूर्ण महाराष्ट्रात दिसतात का? मग तुमची दिल्लीत काय तुमच्या राजधानीतसुद्धा पत राहिल का? यासाठी ‘‘कानाखाली’’ची भाषा उपयोगाची नसते. तर त्यांच्या शस्त्राला (श्रीमंतीला) तुमच्या त्याच शस्त्राने (श्रीमंतीने) उत्तर द्यायचे असते.
जैन समाज म्हटला की आपल्यासमोर फक्त गुजराती समाज येतो. मारवाडी जैन, संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटकात विखुरलेला, स्थानिक भाषा आणि आडनावे धारण केलेला जैन समाज आपल्या डोळ्यासमोर येत नाही. आज मुंबईतील व्यापार प्रामुख्याने जैन समाजाच्या ताब्यात आहे, (व कष्टकरी व्यावसायिक उत्तरेतील आहेत.) म्हणजे नोकरी करणारे जैन नाहीत असे नाहीत. ते ज्या ठिकाणी आहेत तेथे वरचढच आहेत. वॉरेन बफेचा उत्तराधिकारी जैन आहे तर भारतातला सर्वात श्रीमंत भिकारी भरत जैन आहे.( याच्या नावावर मुंबईत दोन घरे व दोन भाडय़ाने दिलेली दुकाने आहेत.)
जैन समाजाने मिळवलेली श्रीमंती त्यांच्या क्षेत्रातील ज्ञानामुळे व कष्टामुळे मिळवलेली आहे. मुंबईतील एल अँड टी कंपनीला पूर्वी चेष्टेत लार्सवानी टुब्रमणीयम म्हणत असत. तिथे मराठी टक्का वाढला पण कष्ट करण्याची वृत्ती नसल्याने पवईची मोक्याची जागा सोडून कारखाना केरळ व गुजरातमध्ये हलवणे चालू झाले.
यासाठी उपाय काय? आपल्या पुढच्या पिढय़ांना आíथक साक्षर बनवू या. बुद्धिमत्ता व कष्ट याद्वारे आíथक सुबत्ता येईल व ती मराठी समाजाला ‘पत’ देईल. मुलांना लहानपणापासून आíथक शिक्षण द्या. आपल्या मागच्या पिढय़ांमधील हा भाग बदलू या. हे आíथक शिक्षण कोणत्याही शाळा कॉलेजांत मिळत नाही, याचे क्लासेस नाहीत. आपल्या मुलांसाठी तुम्हीच वेळ बाजूला काढा व हे शिक्षण द्या.
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सिक्युरिटीज् मार्केट (‘सेबी’चा एक उपक्रम) मार्फत शाळा कॉलेजमध्ये आíथक विषय शिकवण्यासाठी अभ्यासक्रम बनविला गेला आहे. पाचवी/सहावीपासून हा विषय शिकवता येतो. पुस्तके फुकट दिली जातात. शिक्षकांना शिकवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. सेबी, रिझव्‍‌र्ह बँक, आयआरडीए, शेअर बाजार सर्वानी काही हजार कोटी रुपयांची तरतूद यासाठी करून ठेवली आहे. पण शिक्षक हा विषय, शिकवण्यास तयार नाहीत. काही शाळांमध्ये शिक्षकांजवळ बोलल्यावर कळले, ‘‘चार-चार महिने उशिराने पगार मिळतो, त्यात हे नवीन झेंगट आमच्या मागे कशाला?’’
नव्याने निवडून आलेल्या शिक्षणमंत्र्यांनाही भेटलो. या विषयाची दोन पुस्तके व पत्र दिले. एक महिन्यानंतर एका ओळीचे उत्तर आले – ‘‘आपला अर्थ शिक्षणाबाबतचा विचार अभ्यास समितीसमोर ठेवण्यात येईल.’’ धन्यवाद.’’
म्हणजे महाराष्ट्रात नव्याने १५-२० शेरेगर, शेळ्या-मेंढय़ा पाळणारे, सागाची झाडे लावणारे येऊन जनतेला फसवत नाहीत तोपर्यंत हा विषय आमच्या अजेंडय़ावर नाही.
ज्ञानगंगा दारात येऊन उभी आहे. त्यासाठी पसा, शैक्षणिक पुस्तके सर्व तयार आहे; पण तिला घरात घ्यायला कोणी तयार नाही. मग यावर उपाय काय? सर्व पालकांनी एकत्र येऊन, पालक सभेमध्ये हा विषय मांडणे गरजेचे आहे. आज आपण मुलांना सर्व प्रकारचे क्लासेस लावतो. शिक्षकाऐवजी आपण हा विषय शिकून घेऊन (ऐच्छिक विषय म्हणून) गटागटाने आपल्या पाल्याच्या वर्गातील सर्व मुलांना रविवार किंवा सुटीच्या दिवशी शिकवणे गरजेचे आहे. घरातील आजी-आजोबा या उपक्रमात मदत करू शकतात. असे पालक किंवा शाळा तयार झाल्यास त्यांना सर्वप्रकारे मदत करण्यास / मिळवून देण्यास मी तयार आहे. चला आपल्या पुढच्या पिढीला ही ‘पत’ येण्यासाठी आजपासून झटूया.
लेखक सेबीद्वारा नोंदणीकृत सल्लागार आहेत.
sebiregisteredadvisor@gmail.com

First Published on September 21, 2015 1:05 am

Web Title: need of economy education
टॅग Economy,Vittbhan
 1. Manoj Manoj
  Sep 26, 2015 at 6:49 am
  महाराष्ट्रात सामाजिक सुधारणा झाल्या आहेत. त्यामुळे वैचारिकत्रुषःट्या मराठी माणूस इतर माणसांपेक्षा पुढे आहे. अशा समाजात व्यक्तिवाद वाढतो. समाज म्हणून जगण्यापेक्षा व्यक्ती म्हणून जगणे मराठी माण आवडते. जैन समाज आणि मराठी समाज ह्यात हा मुल फ़रक आहे. जैन समाजाशी स्पर्धा करण्यासाठी मराठी माणसाने दोन पावले मागे यायची गरज नाही. उलट जैन समाजात व्यक्तिवाद कसा रुजेल ह्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. आर्थिक प्रगतीबरोबर वैचारिक प्रगती तेवडःईच महत्वाची आहे.
  Reply
  1. S
   Sam Peres
   Sep 22, 2015 at 1:05 pm
   आणखी एक गोष्ट मुद्दाम येथे नमूद करावी वाटते, ती म्हणजे जैन समाजामध्ये 'निर्व्यसनी' असणे आणि त्यासाठी इतरांना प्रोत्साहन देणे हे सभ्यपनाचे लक्षण मानले जाते. त्या समाजात व्यसनामध्ये पैसा घालवणे निंदेस पात्र आहे.
   Reply
   1. R
    rajesh
    Sep 29, 2015 at 11:12 pm
    सुंदर लेख, अधिक माहिती साठी काय करावे ते सांगा
    Reply
    1. A
     ANAND JOSHI
     Oct 5, 2015 at 2:35 pm
     मी मुलांच्या आर्थिक साक्षर ते वर गेले ८ महिने अभ्यास करत आहे. या वर मी काही गोष्टी वर आसे लक्षात आले कि ०१.मुळात ९९% गोष्टी आर्थिक साखर्तेवर अवलंबून आहेत. माझ्या मते जगत दोन छ प्रकारची मनसे सतात एक तर आर्थिक साक्षर किंवा आर्थिक निरक्षर . ०२.मुळात या साठी पालक जबाबदार आहेत.इतिहास पासूनच श्रीमंत असणे म्हणजे काहीतर बेकायदेशीर करावे लागते असा समज पालकात आहे तर ते मुलानंना काय सांगणार?? ०३. या साठी मोठी चळवळ उभी करावी लागेल.तय्यार आहे ....आपण???
     Reply
     1. Sumant Shetwe
      Sep 28, 2015 at 4:10 pm
      Financial awareness and thought process for next Gen..
      Reply
      1. S
       Swapnil
       Oct 9, 2015 at 6:00 pm
       अतिशय सुंदर असा लेख . खरोखर विचार करण्या जोग विषय आहे. आपल्याला कुणालाच अशी शिकवण लहान पण पासन मिळत नाहीच. पण हळूहळू बदल होत आहेत. पण स्वत साक्षर होऊन पुढील पिढी ला पण साक्षर बनविण्याचे आव्हान आपल्यापुढे आहे.आर्थिक बलवान बनून जागतिक ओळख निर्माण करायची आहे.
       Reply
       1. S
        swati
        Sep 26, 2015 at 3:58 pm
        सुंदर लेख, अधिक माहिती साठी काय करावे ते सांगा
        Reply
        1. M
         MAHIPALSINGH THAKUR
         Sep 25, 2015 at 4:36 pm
         अति sundar
         Reply
         1. Load More Comments