इंटरनेट या नव-माध्यमामुळे आज अनेकांना अर्थसाक्षर झाल्यासारखे वाटते. ‘गुगल सर्च’ वर वेगवेगळ्या विमा कंपन्यांच्या योजनांचे रेटिंग पाहिल्यानंतर ‘पॉलिसी बझार डॉटकॉम’मार्फत विमा योजनेची खरेदी केली. तरी ‘क्लेम सेटलमेंट रेशो’च्या बाबत शेवटून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ‘एगॉन रेलिगेअर’ची निवड केली गेली. आता ही निवड चुकीची म्हणून तिचे हप्ते बंद करावेत काय, असा संभ्रम.. या निमित्ताने अल्बर्ट आइनस्टाइन यांच्या “Little Knowledge is Dangerous’’ या अवतरणाची मग स्वाभाविकच आठवण आली.


आज पुणेस्थित प्रभुणे कुटुंबीयांचे आíथक नियोजन पाहू. मंदार (३०) मानसी (३२) व पार्थ (२) हे एका कुटुंबातील सदस्य आहेत. मंदार हे रांजणगावस्थित एका वाहनांसाठी सुटे भाग तयार करणाऱ्या कंपनीत तर मानसी या िहजेवाडी येथील एका माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीत काम करतात.


प्रभुणे कुटुंबीयांची मासिक गुंतवणूक योग्य शिल्लक रु. ७६,००० आहे. मंदार यांच्याकडे एलआयसीच्या पारंपरिक योजना आहेत. ‘लोकसत्ता अर्थवृत्तान्त’ वाचून मंदार यांनी गेल्या वर्षी ‘एगॉन रेलिगेअर’ची २०४० पर्यंत व ५० लाखांचे विमाछत्र देणारी विमा योजना घेतली आहे. त्याचा ते रु. ८,३४७ वार्षकि हप्ता भरत आहेत. या व्यतिरिक्त एलआयसीची जीवन आनंद तीन लाखांची २०३५ पर्यंत विमाछत्र देणारी विमा योजना त्यांच्याकडे आहे. यासाठी ते वार्षकि रु. १५,००० हप्ता भरत आहेत. मानसी यांनी कोणतीही जीवन विमा योजना घेतलेली नाही. प्रभुणे कुटुंबातील सदस्यांसाठी ‘न्यू इंडिया इन्श्युरन्स’चा रु. ४,००,००० ‘फॅमिली फ्लोटर’ घेतला असून त्यासाठी  रु. १२,३०० तर मानसी यांनी त्यांच्या आईसाठी घेतलेल्या रु. ३०,००० छत्रासाठी रु. १२,००० हप्ता भरत आहेत. आरोग्य विम्याच्या हप्त्याची वजावट मानसी यांच्या पगारातून होते. मंदार व मानसी यांचे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते असून मंदार व मानसी यांच्या खात्यात ३१ मार्च २०१४ रोजी अनुक्रमे रु. ६,६७,८०० व रु. ८,५६,७२४ शिल्लक होती. दरमहा ठराविक रक्कम ते या खात्यात भरत नाहीत. मंदार व मानसी यांनी संयुक्त सदनिका खरेदीसाठी १८ लाख रुपयांचे कर्ज घेतले असून त्यापकी ३१ मार्चअखेर रोजी रु. ८,९६,७२३ कर्जफेड शिल्लक आहे. त्यांना कर्जावर वार्षिक ९.७५ टक्के दराने व्याज द्यावे लागते. मानसी व मंदार यांना आपापल्या सेवाशर्तीचा एक भाग म्हणून त्यांच्या कंपन्यांकडून अनुक्रमे ४० व ५० लाखांचे विमाछत्र गट विम्याअंतर्गत लाभले आहे.
प्रभुणे कुटुंबीयांसमोर आज दोन प्रश्न आहेत. पहिले गृहकर्ज मुदतीआधी फेडावे काय किंवा कसे? दुसरा प्रश्न मंदार यांना एकूण एक कोटीचा मुदतीचा विमा असावा, असा सल्ला एका विमा विक्रेत्याने दिला आहे व याच सल्ल्याबरोबर आधी घेतलेली ‘एगॉन रेलिगेअर’ची पॉलिसी बंद करावी, असा सल्ला दिला आहे. आज त्यांचे आíथक नियोजन याच अनुषंगाने तपासून पाहणार आहोत. आज प्रभुणे कुटुंबीयांना पडलेला प्रश्न ‘लोकसत्ता’च्या मोठय़ा संख्येने असलेल्या वाचकांपकी अनेकांना पडला असण्याची शक्यता आहे. प्रभुणे यांची विमा विक्रेत्याकडून अर्थनिरक्षरतेमुळे जी फसवणूक होत आहे ती भविष्यात अन्य कोणाची होऊ नये, हा आजच्या सदराचा उद्देश आहे.
प्रभुणे कुटुंबीयांना सल्ला
प्रभुणे यांच्यासमोर वर उल्लेख केलेले दोन प्रमुख प्रश्न आहेत. त्यांचे आíथक नियोजन करताना या प्रश्नांच्या अनुषंगाने विचार करू. दुसऱ्या प्रश्नाचा प्रथम विचार करू. एक कोटीचे संरक्षण असणारी एका कंपनीची पॉलिसी घेण्याची आवश्यकता आहे का, व ही पॉलिसी घेतल्यास दोन वर्षांपूर्वी खरेदी केलेली ‘एगॉन रेलिगेअर’च्या पॉलिसीचा हप्ता भरणे बंद करावा, असा विमा विक्रेत्याने दिलेला सल्ला योग्य आहे का, हा प्रश्न मंदार प्रभुणे यांना पडला आहे.
विमा विक्रेत्याने मंदार यांना अर्धसत्य सांगितले आहे. मंदार यांना एक प्रश्न विचारला की ‘एगॉन रेलिगेअर’च्या मुदतीच्या विम्याची खरेदी कोणाच्या सांगण्यावरून केली? मंदार यांनी ‘गुगल सर्च’ वर वेगवेगळ्या विमा कंपन्यांच्या योजनांचे रेटिंग पाहिल्यानंतर ‘पॉलिसी बझार डॉटकॉम’मार्फत या योजनेची खरेदी केली. ‘पॉॅलिसी बझार डॉटकॉम’ ही कंपनीसुद्धा विमा विक्रेती आहे व एखादा विक्रेता आपला माल विकावा म्हणून जे करतो ते ही कंपनीदेखील करते. ज्या उत्पादनाच्या विक्रीत अधिक फायदा ते उत्पादन मोठय़ा संख्येने विकण्याचा त्या विक्रेत्याचा प्रयत्न असतो तसा ‘पॉॅलिसी बझार डॉटकॉम’चासुद्धा असतो व त्यात काहीही गर नाही. इंटरनेटच्या माध्यमामुळे आज अनेकांना अर्थसाक्षर झाल्यासारखे वाटते. तसे असते तर ‘क्लेम सेटलमेंट रेशो’च्या बाबत शेवटून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ‘एगॉन रेलिगेअर’ची निवड मंदार यांनी केली नसती. या निमित्ताने ह्लछ्र३३’ी ङल्ल६’ीॠिी ्र२ ऊंल्लॠी१४२ह्णह्ण या अल्बर्ट आइनस्टाइन यांच्या अवतरणाची आठवण आली.
मंदार यांच्याकडे विमाछत्र वाढविण्याचे तीन पर्याय आहेत. पहिला पर्याय विमा विक्रेत्याच्या म्हणण्यानुसार ज्या विमा कंपनीचा ‘क्लेम सेटलमेंट रेशो’ ९५.८ टक्के आहे अशा कंपनीचा एक कोटीचा विमा खरेदी करून जुनी पॉलिसी बंद करणे. कोणतीही पॉलिसी निवडताना ‘क्लेम सेटलमेंट रेशो’चा विचार करणे योग्यच आहे. परंतु निव्वळ ‘क्लेम सेटलमेंट रेशो’ हा पॉलिसी खरेदी करण्याचा निकष असू शकत नाही. केवळ ‘क्लेम सेटलमेंट रेशो’चा विचार केल्यास एलआयसी अव्वल आहे. मग तुमच्या विमा विक्रेत्याने एलआयसीची अनमोल जीवन सुचवायला काहीच हरकत नव्हती. अव्वल ‘क्लेम सेटलमेंट रेशो’च्या बरोबरीने सर्वात महाग टर्म प्लॅन एलआयसीचा आहे. एलआयसीने जानेवारी २०१४  पासून आपल्या टर्म प्लॅनच्या हप्त्यात ४० टक्के कपात करुनही अनमोल जीवनचा हप्ता इतर कंपन्यांपेक्षा जवळजवळ दुप्पट आहे. मग ‘क्लेम सेटलमेंट रेशो’ अव्वल असल्यास नवल ते कोणते? म्हणून सर्वस्वी ‘क्लेम सेटलमेंट रेशो’ हा निकष असू शकत नाही.
दुसरा पर्याय ‘एगॉन रेलिगेअर’च्या पॉलिसीवर ५० लाखांच्या विमाछत्राचे ‘मॉप अप’ करणे. परंतु ‘एगॉन रेलिगेअर’ ही क्लेम सेटलमेंट’च्या निकषावर शेवटून तिसरी कंपनी आहे. म्हणून आधी केलेली चूक परत परत करण्यासारखे आहे. म्हणून हा पर्याय स्वीकारार्ह नाही. तिसरा पर्याय आधीची ५० लाखांची पॉलिसी सुरू ठेवून अव्वल ‘क्लेम सेटलमेंट रेशो’ असलेल्या कंपनीची ५० लाखांची पॉलिसी घेणे. ‘क्लेम सेटलमेंट रेशो’ व देय हप्ता यांचा समतोल साधताना तिसरा पर्याय योग्य वाटतो. कारण एखाद्या अप्रिय प्रसंगात जर विम्याचा दावा करण्याची वेळ आलीच तर एकाच वेळी दोन्ही कंपन्या समान परिस्थितीत विम्याचा दावा नाकारण्याची शक्यता कमी आहे. म्हणून जुनी पॉलिसी सुरूठेवून नवीन ५० लाख विमाछत्र असलेली पॉलिसी घेणे योग्य वाटते.  
रोकड सुलभता असेल तर असलेले कर्ज फेडून टाकणे हा पर्याय योग्य असल्याचे या स्तंभातून यापूर्वी मांडलेच आहे. असा अनुभव आहे की अनेकदा ज्यांचे आíथक नियोजन करतो त्यांना हा पर्याय पटत नाही. सबब म्हणून कर्ज न फेडण्यास कर कार्यक्षमता असे कारण पुढे केले जाते. परंतु व्याज भरून समभाग अथवा समभागसदृश गुंतवणुकीवर देय व्याजापेक्षा अधिक परतावा मिळवणे अल्प मुदतीत शक्य नाही. ‘भूतकाळातील परताव्याचा दर भविष्यातील परताव्याच्या दराची ग्वाही देत नाही’ हे विधान कुठल्याही म्युच्युअल फंडाच्या जाहिरातीत असते ते उगीचच नव्हे. हे विधान सिगारेटच्या पाकिटावरील वैधानिक इशारा म्हणून दुर्लक्ष करायचे की बोध घ्यायचा हा विचार ज्याचा त्याने करायचा आहे. सबब कर्ज ठेवल्याने करबचत होते हे तुमचे कारण स्वीकारता येत नाही. सध्याचे कर्ज फेडून मोठी सदनिका घेतली तर कर कार्यक्षमता निश्चित वाढेल.
अनेकदा अर्थ नियोजकाकडून पसे मोजून घेतलेल्या सल्ल्यापकी सोयीचे तेवढे स्वीकारायचे व गरसोयीचे तेवढे सोडायचे असा ‘आदर्श’ अनुभवास येतो. हे लक्षात घेता अतिरिक्त रोकड खर्च करण्यासाठी एक पर्यायी उपाय सोबतच्या कोष्टकात सुचवत आहे. जो निर्णय पर्याय सोयीचा वाटेल तो स्वीकारावा.