निवृत्तीला पाच वष्रे शिल्लक असताना बहुतेक कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण झालेल्या असतात. या काळात कुटुंबाकडून होणाऱ्या बचतीचा दरही अधिक असतो. परंतु निवृत्तीपश्चात उदरनिर्वाहाचा विचार त्यासमयी करून चालत नाही, त्याचे नियोजन आधीपासून केले जायला हवे. या दृष्टीने समभागातील गुंतवणूक हाच एक सर्वोत्तम पर्याय म्हणता येईल. पण अगदी सुशिक्षित उच्चमध्यमवर्गीय कुटुंबेही दीर्घकालात उत्तम परतावा देणाऱ्या समभाग गुंतवणुकीबाबत अनभिज्ञता आणि नाहक भीती बाळगताना दिसतात..
कुत्रा माणसाला नव्हे तर माणूस कुत्र्याला चावला तर त्याची बातमी होते, अशा आशयाचा इंग्रजी वाक्प्रचार आहे. एखाद्या असाधारण प्रसंगालाच बातमी मूल्य प्राप्त होते असा याचा अर्थ आहे. एखाद्या अव्वल अभियांत्रिकी महविद्यालयातून पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांला वार्षकि सहा लाख वेतन बरे समजले जाते. त्या पाश्र्वभूमीवर भारतीय औद्योगिक संस्थेतून पदवी घेऊन बाहेर पडताच वार्षकि वेतनाची कोटीची कोटी उड्डाणे घेतलेल्यांच्या बातमीला वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर स्थान मिळाले नसते तर नवलच. येणाऱ्या ईमेल व या सदराचे वाचक जेव्हा कधी प्रत्यक्ष भेटतात तेव्हा एक कोटीचा मुदतीचा विमा खरेदी करण्याच्या सल्ल्याबाबत आक्षेप नोंदवतात. काही प्रसंगी इतक्या मोठय़ा विमाछत्राची आवश्यकता आहे का, असा सूर लावला जातो. विमा हा भविष्यातील वाढणारी जबाबदारी निश्चित करून काढायचा असतो. परंतु विमाछत्राची पात्रता मात्र वर्तमानातील उत्पन्न लक्षात घेऊन निश्चित केली जाते. वार्षकि उत्पन्नाच्या २० ते  २५ पट विमाछत्र मिळविता येते. म्हणजे मासिक ५०,००० वेतन मिळणाऱ्या नवपदवीधारकास १.२० लाख रुपयांचे विमाछत्र मिळविणे शक्य आहे. अनेकांच्या मनात अशी शंका असण्याची शक्यता आहे. या शंकेचे निरसन करण्याचा यानिमिताने प्रयत्न केला.
नवी मुंबईतील देवेंद्र चिंचवडकर (वय ३३) या चाकरमानी कुटुंबियाचे नियोजन जाणून घेऊ. या कुटुंबातील सदस्यांमध्ये देवेंद्र यांच्या पत्नी सुप्रिया (वय ३०) खुशी (४) सोपान (१५ महिने) यांचा समावेश होतो. देवेंद्र हे सनदी लेखपाल असून ते एका माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीत नवी मुंबई येथे नोकरी करतात. सुप्रिया यांनी उपयोजित कला शाखेत पदवी घेतली असून त्या एका किरकोळ विक्री शृंखला दालनात काम करतात. या कुटुंबाचे मासिक उत्पन्न १.४० लाख रुपये असून खर्च ४० हजार रुपये आहे. दर महिन्याला एक लाख रुपये बचतीच्या रुपाने शिल्लक पडतात. सहा वष्रे मध्य पूर्वेतील वास्तव्यानंतर सुप्रिया व देवेंद्र हे मुलांच्या शिक्षणासाठी दोन वर्षांपूर्वी भारतात परत आले. कुटुंबावर कसलेही गृहकर्ज नाही. सध्याचे घर ‘टू बीएचके’ असल्याने भविष्यात मोठे घर घेण्याची त्यांना आवश्यकता भासत नाही. कुठल्याही उच्च मध्यमवर्गीय कुटुंबाची जी वित्तीय उद्दिष्टे असतील तीच त्यांचीही आहेत.
av-08

नोकरीच्या दुसऱ्या वर्षांपासून देवेंद्र परदेशात राहिले. त्यामुळे त्यांच्याकडे पारंपरिक प्रकारची विमा योजना नाही. म्हणून दोघांनी आपापल्या मुदतीच्या विम्याची खरेदी करावी. परदेशात असताना त्या ठिकाणी आरोग्य विम्याचे संरक्षण त्यांना त्यांच्या कंपनीने दिले होते. कायम वास्तव्यास आल्यापासून आरोग्य विमा खरेदी करण्याचे त्यांनी योजिले होते. परंतु प्रत्यक्षात खरेदी झालेली नाही. म्हणून त्यांनी न्यू इंडिया अश्युरन्स कंपनीची ‘फॅमिली फ्लोटर’ ही आरोग्यविमा योजना खरेदी करावी. या योजनेत त्यांना पाच लाख रुपयांचे छत्र घेऊन त्याच्या चार पट म्हणजे २० लाख रुपयांचे अतिरिक्त (ळस्र्-४स्र्) आरोग्यविमा छत्र मिळू शकेल. दोन्ही मिळून एकूण आरोग्य विमाछत्र २५ लाख रुपयांचे असेल.  
ज्या कुटुंबाकडे मोठी रोकड सुलभता असते त्यांना आणीबाणीत खर्च कराण्यासाठी तरतूद करण्याचा सल्ला दिला जातो. घरात दोन लहान मुले असल्याने दोन लाखांची रोकड त्यांनी लिक्विड फंडात गुंतवावी. या व्यतिरिक्त देवेंद्र यांच्या खात्यात सरासरी दीड लाखांची रोकड आहे. रिझव्‍‌र्ह बँकेकडून यंदाही व्याजदर कपात झाली नसल्याने पुढील दोन महिने तरी लिक्विड फंड आठ टक्के परतावा देतील. म्हणून या पकी ५०,००० बँकेत शिल्लक ठेवून उर्वरित रक्कम लिक्विड फंडात गुंतवावी. देवेंद्र व सुप्रिया यांच्या नावे ११ लाखाच्या बँक ठेवी आहेत. मुदत पूर्तीनंतर या ठेवी त्यांनी निवडलेल्या फंडात टप्या-टप्याने गुंतवाव्यात व नव्याने २५ हजाराच्या ‘एसआयपी’ सुरू कराव्यात.
कर नियोजनाच्या दृष्टीने सुप्रिया व देवेंद्र यांनी त्यांच्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) मध्ये जमा करत असलेली रक्कम १० टक्क्याने वाढविणे आवश्यक आहे. मुदतीच्या विम्याचा हप्ता व आरोग्य विम्याचा हप्ता व पीपीएफ यावर त्यांना प्राप्तीकरात सूट मिळेल. २० हजाराची ‘एसआयपी’ २७ वष्रे केल्यास दीड कोटीचा निवृती पश्चात निधी जमणे सहज शक्य आहे. उर्वरित दीड कोटीचा निधी पीपीएफ व त्यांच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून मिळेल.
आजच्या त्यांच्या बचतीतून तीन कोटीच जमा होऊ शकतात. निवृत्तीला पाच वष्रे शिल्लक असताना बहुतेक कौटुंबिक जबाबदारी पूर्ण झालेल्या असतात. या काळात बचतीचा दरही अधिक असतो. परंतु दरम्यानच्या काळात व्याजाचा दर चार – साडेचार टक्के खाली आला असेल, हे लक्षात घ्यायला हवे. मुलांच्या शिक्षणाचा खर्च हा निवृत्तीपूर्व होणार असल्याने एक लाखाच्या शिल्लकेपकी ६० हजार रुपये हे मुलांच्या शिक्षणासाठी व निवृत्तीपश्चात   उदरनिर्वाहासाठी ४० हजारांची तरतूद केली. मोठी आíथक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी चाकोरीबद्ध गुंतवणुकीचा विचार न करता  दीर्घ काळ समभाग गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडात ‘एसआयपी’ करणे हा उपाय आहे.