niyojanbhan321एक कवीकल्पना म्हणून एखादी इच्छा मनात धरणे व नियोजनाच्या दृष्टीने वास्तव म्हणून त्यांना स्वीकारणे यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. हा फरक का व कसा ते या नियोजनाच्या निमित्ताने..
गगनभेदि गिरिविण अणु न च जिथे उणे
आकांक्षापुढती जिथे गगन ठेंगणे
अटकेवर जेथील तुरंगी जल पिणे
तेथ अडे काय जलाशय ना दावीणे
पौरुष्यासी अटक गमे जेथ दु:सहा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा
विदर्भातील बुलढाण्यात जन्मलेल्या श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या लेखणीतून अवतरलेल्या या ओळी. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर या कवितेला राज्याच्या अधिकृत गीताचा दर्जा मिळाला. बँक ऑफ इंडियाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शाखेत प्रोबेशनरी ऑफिसर या पदावर नुकतेच रुजू झालेल्या धवल पागोटे (२४) यांनी नियोजनासंबंधी मार्गदर्शन करण्याची विनंती करणारी मेल लिहिला आहे. या मेलमध्ये त्यांच्या वित्तीय ध्येयांचा त्यांनी उल्लेख केला आहे. वास्तवाचे भान न ठेवता लिहिलेली ही वित्तीय ध्येये वाचल्यानंतर ‘‘आकांक्षापुढती जिथे गगन ठेंगणे’’ या ओळी आठवल्या. एक कवीकल्पना म्हणून एखादी इच्छा मनात धरणे व नियोजनाच्या दृष्टीने वास्तव म्हणून त्यांना स्वीकारणे यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. हा फरक का व कसा ते या नियोजनाच्या निमित्ताने जाणून घेऊ.   
धवल हे यवतमाळ जिल्ह्यातले असून त्यांनी यवतमाळ येथील विनाअनुदानित महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकम्युनिकेशन या विद्या शाखेत अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आहे. त्यांचे वडील चिंतामण पागोटे (५६) हे शासनाच्या सेवेत नायब तहसीलदार पदावर असून ते २०१७ मध्ये सेवा निवृत्त होतील.  निवृत्ती पश्चात त्यांना निवृत्तीवेतन मिळणार आहे. आई विजया (४६) गृहिणी असून लहान बहिण प्रणालीचा (२३) विवाह येत्या डिसेंबर महिन्यात योजला आहे. सप्टेंबर महिन्यात बँकेच्या सेवेत रुजू झालेल्या धवल यांना पहिले वेतन ३३ हजार रुपये  वजावटीपश्चात मिळाले. या ३३ हजारातून त्यांचा वैयक्तिक खर्च १० हजार रुपये वजा जाता धवल यांना उर्वरित बचतीचे नियोजन करायचे आहे.
av-02
आíथक नियोजनाची सुरुवात जीवनविम्याने करतात. धवल यांच्यावर आज जरी आíथक जबाबदारी नसली तरी भविष्यात तेच कुटुंबाचा मुख्य आíथक स्रोत असणार आहेत. म्हणून धवल यांनी सर्वप्रथम विमा योजनेची खरेदी करावी. त्यांना ३५ वष्रे मुदतीच्या दोन कोटी रुपयांचे मुदत विमा घेण्याचे (टर्म इन्श्युरन्स) सुचविण्यात आले.  क्लेम सेटलमेंट रेशोबाबतीत पहिल्या एक ते चार  क्रमांकावर असलेल्या विमा कंपन्यांतून हे दोन कोटींचे विमाछत्र मिळविताना सर्वाधिक ३४,५६७ रुपये तर  सर्वात कमी २८,७६५ रुपये असा वार्षकि हप्ता त्यांना भरावा लागेल. धवल यांनी या अव्वल चार क्लेम सेटलमेंट रेशो असलेल्या कंपन्यापकी त्यांना योग्य वाटेल अशा जीवन विमा पॉलिसीची निवड करावी. टप्प्याटप्प्याने त्यांनी विमाछत्र पाच कोटी करावायचे आहे. मात्र सर्व विमा योजनांची मुदतपूर्ती ही त्यांच्या वयाच्या साठीपेक्षा जास्त असू नये.

प्रत्येक बँकेची स्वत:च्या कर्मचारी व यांच्या अवलंबून असणाऱ्यांसाठी एक समूह आरोग्य विमा योजना असते. तशी बँक ऑफ इंडियाचीही आहे. परंतु या समूह आरोग्य विमा योजनेचे छत्र पुरेसे नाही. यासाठी त्यांनी स्वत:च्या कुटुंबातील सदस्यांसाठी न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्सची फॅमिली फ्लोटर योजना खरेदी करावी. कुटुंबातील सर्वासाठी मिळून पाच लाखाचे आरोग्य विम्याचे छत्र घ्यावे. भविष्यात म्हणजे विवाहापश्चात पत्नी व अपत्याचे नाव या योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीत समाविष्ट करावे.  
आíथक नियोजनाच्या पुढील टप्प्यावर जाण्यासाठी आíथक उद्दिष्टे निश्चित करणे आवश्यक असते. भ्रमणध्वनीवरील संभाषणात आपल्या आíथक ध्येयांविषयी धवल संपूर्ण अनभिज्ञ दिसले. धवल यांच्या मेलमध्ये व दोन-तीन महिन्यात तीस हजाराचा स्मार्टफोन घेणे व पाच वर्षांनंतर चार-चाकी वाहन खरेदी करणे या दोन गोष्टींचा उल्लेख आहे. धवल यांनी विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेतले. पदवीनंतर नागरी सेवा परीक्षा देण्यासाठीच्या प्रशिक्षणा साठी धवल दोन वष्रे पुण्यात राहिले. हा मोठा खर्च त्यांच्या वडिलांनी केला. पुसदच्या बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयातील पदवीची चार वष्रे व पुण्यातील दोन वष्रे मिळून दहा लाख खर्च झाला असेल. धवल यांना त्यांचा आíथक सल्लागार या नात्याने वडिलांना किमान पाच लाख पाच वर्षांत म्हणजे विवाहापूर्वी परत करावे असे उद्दिष्ट ठरविले व धवल यांनी हे उद्दिष्ट मान्य केले. धवल हे नवीन पेन्शन योजनेचे (एनपीएस) लाभार्थी आहेत. या योजनेनुसार महागाई निर्देशांकानुसार सेवानिवृत्तीवेतन वाढणार नाही. या कारणाने बचतीची कार्यक्षमता राखणे महत्वाचे ठरते. तरुण वयात बचत केली तरच आयुष्य कमी कष्टाचे जाईल. ३० हजारांचा स्मार्ट फोन खरेदी लागलीच करण्याआधी किमान तीन लाखाची बचत झाल्यानंतर करणे इष्ट ठरेल. कमी होत जाणारे व्याजाचे दर व वाढणारी महागाई या कात्रीत तुम्हाला आर्थिक नियोजनाची कसरत करायची आहे. तरुणांनी नोकरीच्या पस्तीस वर्षांतून किमान पाच कोटींचा स्वनिधी निवृत्तीवेळी हातात येईल हे पाहणे जरुरीचे ठरते.  एक कवीकल्पना म्हणून ‘आकांक्षापुढती जिथे गगन ठेंगणे’ हे जरी खरे असले तरी आíथक उद्दिष्टे कठोरपणे वास्तवानुसार पडताळून पहाणे गरजेचे आहे. पगार हातात यायला लागला म्हणून मागील आठ वर्षांत झालेला खर्च विसरून थिल्लरपणे तीस हजाराचा स्मार्ट फोन व पाच वर्षांनंतर मोटार खरेदी करण्याच्या नियोजनाला आजच्या घडीला थारा देता येत नाही. तसेच बँकेतील इतर ज्येष्ठ सहकाऱ्यांसारखी तुम्हाला वेतनवाढीतील फरकाची रक्कम मिळणार नाही, हेही ध्यानात घ्यायला हवे.
आज हा सल्ला कठोर वाटला तरी तुमच्या भविष्याच्या दृष्टीने हा सल्ला गंभीरपणे घेणे जरुरीचे आहे. वेतनातून बचत होणाऱ्या केवळ २२ हजारांसाठी आíथक नियोजन सुचवीत आहे. या नियोजनाची अंमलबजावणी जानेवारीच्या वेतनापासून करावी. उद्याची आíथक ध्येये ठरविताना वास्तवाचे भान सुटू नये हाच अर्थसाक्षरतेचा धडा आजच्या नियोजनाच्या निमित्ताने समस्त तरुणाईला शिकावा लागेल.
उद्याची आíथक ध्येये ठरविताना वास्तवाचे भान सुटू नये हाच अर्थसाक्षरतेचा धडा आजच्या तरुणाईला शिकावा लागेल. कमी होत जाणारे व्याजाचे दर व वाढणारी महागाई या कात्रीत तुम्हाला आर्थिक नियोजनाची कसरत करायची आहे. म्हणून तरुणांनी नोकरीच्या पस्तीस वर्षांतून किमान पाच कोटींचा स्वनिधी निवृत्तीवेळी हातात येईल हे पाहणे जरुरीचे ठरते.