आíथक स्वास्थ्य हे शारिरीक स्वास्थ्याइतकेच महत्वाचे आहे याची अनेकांना कल्पना नसते. त्यामुळे स्वत:च्या शारिरिक स्वास्थ्याबाबत आवश्यक ती काळजी घेतली जाते, परंतु वैयक्तिक अर्थकारणाकडे मात्र म्हणावे तितक्या गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यासाठी सुरुवातीपासून काही नियोजन केले पाहिजे याची अनेकांना कल्पनाही नसते.
वयाच्या पंचविशीच्या आसपास अर्थाजन सुरू झाले आणि स्वत:चा असा पसा हातात खेळू लागला की सर्वप्रथम शाळा-कॉलेज जीवनातील सुप्त इच्छा पुऱ्या केल्या जातात. आताच्या तरुणांना होणारी प्राप्ती ही अनेकदा त्यांच्या पालकांपेक्षा जास्त असते. त्यामुळे नकळतपणे एक प्रकारचा अहंगंड निर्माण होतो. उद्याचा विचार करायची इच्छाही नसते आणि वेळ तर त्याहूनही नसतो. दोन तीन वर्षांमध्ये काही जणांचे पाय हळूहळू जमिनीवर येतात आणि वैयक्तिक अर्थकारणाचा विचार मनामध्ये डोकावायला सुरुवात होते. त्यासाठी यथायोग्य नियोजन करावे याची मात्र जाणीव नसते. मग घिसाडघाईत काही पर्याय निवडले जातात आणि गुंतवणुकीला सुरुवात होते. त्यापकी सर्वात प्रचलित पर्याय म्हणजे आयुर्विमा आणि पोस्टाचे किंवा बँकेचे रिकिरग डिपॉझिट. आयुर्विमा घेताना प्रमुख उद्दिष्ट असते ते आयकर बचत, त्यानंतर गुंतवणुक आणि सर्वात कमी महत्त्व दिले जाते ते प्रत्यक्ष विमाछत्राला. या पर्यायांमध्ये गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून विचार केला तर परतावा वार्षकि भाववाढीपेक्षा कमी असतो. त्याकाळात मासिक आवक सुरू असल्याने आपल्या गुंतवणुकीमधील तूट लक्षात येत नाही. आपल्या नकळत चक्रवाढ व्याजाच्या गतीने आपल्याला प्राप्त होत असलेली रक्कम आणि त्या रकमेची बाजारी किंमत यामधील तफावत वाढत जाते आणि त्याचे परिणाम मात्र फार काळानंतर दिसू लागतात. तोपर्यंत महत्वाची वर्ष वाया गेलेली असतात.
गुंतवणुकीच्या नियोजनाची खरोखरच गरज आहे का? हा प्रश्न अनेकांना भेडसावत असतो. त्यासाठी आíथक नियोजन म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय असतात ते जाणून घेणे आवश्यक आहे. या नियोजनामुळे आपल्या आíथक प्रगतीच्या मार्गाचा नकाशा बनविता येतो. त्यामध्ये आपली आíथक ध्येये बसविता येतात आणि ती प्राप्त करण्यासाठी काय केले पाहिजे ते पध्दतीशरपणे ठरविता येते. झपाटयाने बदलणारे राहणीमान, कायमस्वरूपी वाढत जाणारी भाववाढ आणि अचानकपणे उद्भवणारे आकस्मिक खर्च यांचा सामना करायचा असेल तर आíथक नियोजन हे अनिवार्य आहे.
वेगवेगळया परिस्थितींमध्ये आíथक नियोजन कसे कामास येऊ शकते यांची सूची खाली दिलेली आहे. त्यावर एक नजर टाकली तर अशा प्रकारच्या नियोजनाची खरोखरच गरज आहे की नाही हे स्वत:च ठरविता येईल.
१) आजचा संयम, उद्यासाठी बचत!
आपला खर्च कोणत्या गोष्टीसाठी आणि किती होत आहे याची जाण असणे जरूरी आहे. सध्याच्या काळातील भाववाढ आणि नकळतपणे वाढत असलेली उपभोगप्रवृत्ती या दोन प्रमुख कारणांनी महिन्याची कमाई केव्हा संपते ते समजतच नाही आणि त्यामुळे बचत शून्य. त्याबरोबरच क्रेडिट कार्डाच्या वापरामुळे पुढील महिन्याच्या कमाईतलाही बराचसा हिस्सा आजच खर्च झालेला असतो. अर्थसंकल्पनेची उणीव आणि अविचारी खर्च याचे दुष्परिणाम पुढील आयुष्यात भोगावे लागतात. आजच्या स्वछंदी खर्चामुळे तेवढयापुरता आनंद मिळतो परंतु त्यामुळे आपणच आपले भविष्य अंध:कारमय करीत असतो.
२) कर्ज-सापळ्यापासून सावध!
आपले राहणीमान आजच्यापेक्षाही जास्त टिप-टॉप असावे असे प्रत्येकाला सतत वाटत असते. ते साध्य करण्यासाठी कर्ज, ओव्हर ड्राफ्ट सारख्या गोष्टींचा वापर केला जातो. हे खर्च करण्यापूर्वी यांची खरोखरच गरज आहे का हा विचार करण्याची तसदी घेतली जात नाही. त्यामुळे गरज आणि आवड यामधील सीमारेषा अंधूक होत जाते. काही दिवसांनी आवड किंवा शौक हीच गरज बनते. नकळतपणे आपण कर्जाच्या सापळयात अडकले जातो आणि आíथक स्वास्थ्य बिघडत जाते अनेकदा शारिरीक स्वास्थ्यावरही त्याचा विपरित परिणाम होतो.
३) ‘टिप्स’ना फशी पडू नका!
वेगवेगळया व्यक्ती वेळोवेळी सांगत जातात आणि त्याप्रमाणे आपण गुंतवणूक करीत जातो आपल्या गरजांसाठी गुंतवणूकउपयुक्त आहे का याचा विचार केला जात नाही. अनेकदा मित्रमंडळी टीप देतात आणि शेअर्सची खरेदी केली जाते आणि एक वेळ अशी येते की त्या पोर्टफोलिओवर नजर टाकणेही त्रासाचे होऊन जाते. अशावेळी स्वत:लाच दोष देण्यापलिकडे काहीही करू शकत नाही. अनेकदा एकाच प्रकारच्या स्कीममध्ये पसे गुंतविले जातात. त्यामुळे गुंतवणुकीत विविधतेचा अभाव असतो. अशा प्रकारच्या विस्कटीत गुंतवणुकीचे दृढीकरण करून ती स्वत:च्या आíथक गरजांचा दृष्टीकोनातून सुटसुटीत बनविणे आवश्यक आहे.
४) एसआयपी ते एसटीपी दंडक!
 म्युच्युअल फंडामधील गुंतवणुकीबाबतही अशीच कोणीतरी शिफारस केलेली असते. बँकेचे अधिकारी आपल्या बँकेच्या म्युच्युअल फंडात पसे गुंतविण्याचा सल्ला देत असतात. म्युच्युअल फंडाच्या इक्विटी योजनांमध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदाराचे वय विचारात घेणे आवश्यक आहे. प्रत्येक योजनेमधील धोक्याचे प्रमाण आणि परतावा अभ्यासून गुंतवणुक केली पाहिजे. सर्वसाधारणपणे स्मॉल-कॅप आणि मायक्रो-कॅप या योजना वयाच्या २५ ते ४० वर्षांपर्यंत असाव्या. मिड-कॅप, प्लेक्झि-कॅप आणि स्मॉल-कॅप ४० ते ५० वर्षांपर्यंत आणि त्यानंतर लार्ज-कॅप योजनांमध्ये गुंतवणूक असावी. त्याचबरोबर शेअर बाजार तेजीमध्ये असेल तेव्हा आपल्याला मिळत असलेल्या परताव्याचे गणित मांडून त्यातून बाहेर पडावे. कागदावर दिसतो तो आपला नफा नसतो. प्रत्यक्षात आपल्या खात्यात जमा झाल्यावर तो नफा असतो. आणखी एक मोठी चूक केली जाते, ती म्हणजे एकरकमी गुंतवणुकीत. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना नेहमी एसआयपी (सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन)चा वापर करावा. मोठी रक्कम असेल तर त्याच म्युच्युअल फंडाच्या लिक्विड योजनेत पसे जमा करून त्यामधून इच्छित योजनेमध्ये ठराविक रक्कम ‘एसटीपी’ (सिस्टेमॅटिक ट्रान्सफर प्लॅन) करावी. योग्य वेळी चुकीच्या योजनांमधून बाहेर पडून योग्य स्कीमध्ये गुंतवणूक झाली तर परताव्याचे प्रमाण वाढते.
५) पॉलिसींचे चक्रव्यूह?
 बऱ्याच गुंतवणुकदारांकडे आयुर्विम्याच्या एन्डाऊमेंट, मनीबॅक, युलिप, चाईल्ड प्लान, पेन्शन प्लान अशा अनेक पॉलिसी असतात. या पॉलिसी विक्रेत्याचे खिसे भरण्यापलिकडे फारसे काही करीत नाहीत. त्यामधील विमाछत्र हे विमाधारकाच्या इकॉनॉमिक व्हॅल्यूपेक्षा फार कमी असते आणि वेगवेगळया प्रकारचे खर्च वजा झाल्याने प्राप्त होणारा परतावाही क्षुल्लक असतो. अशा पॉलिसींच्या चक्रव्यूहात सापडल्यावर स्वत:चा अभिमन्यू क्नरून घेण्यापेक्षा थोडाफार मार खाऊन नुकसानीत बाहेर पडणे केव्हाही हिताचे असते.
६) आरोग्यविम्याबाबत मात्र अनास्था?
आयुर्विम्याच्या बाबतीत स्वत:ला किती विमाछत्राची गरज आहे हेच अनेकांना माहित नसते. आकस्मिक मृत्युच्या संभावनेत आपले कुटुंब आíथक विवंचनेमध्ये पडू नये हा विचार केला जात नाही. त्याचबरोबर ‘मेडिक्लेम’च्या बाबतीतही सर्वसाधारणपणे उदासीनता दिसून येते. आपल्या कमाईनुसार किती प्रमाणात विमाछत्र आणि मेडिक्लेमची गरज आहे हे एखादा तज्ज्ञच समजावून देऊ शकतो.
घर खरेदी, परदेशाची सहल, मुलांचे शिक्षण, गाडी खरेदी वगरे ध्येय, निवृत्तीनंतरच्या खर्चाची तरतूद आणि त्याचबरोबर आकस्मिक खर्च यांचा योग्य मेळ साधायचा असेल तर आíथक नियोजनाला पर्याय नाही. या अगोदर चुका झाल्या असतील तर वेळीच सुधारून घ्या आणि गुंतवणूक क्षेत्रात नव्याने पर्दापण करायचे असेल तर योग्य सल्ला घ्या, तरच स्वत:चे अर्थकारण योग्य प्रकारे हाताळल्याचे समाधान मिळेल आणि निवृत्तीनंतर ताठ मानाने जगता येईल.

Loksatta samorchya bakavarun Congress bjp Declaration Important to the people Purpose of the issues
समोरच्या बाकावरून: माझे मत त्याच उमेदवाराला, जो…
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!