गेल्या वर्षी आपण दर तिमाहीस या स्तंभातून पोर्टफोलियोसाठी सुचवलेल्या शेअर्सचा आढावा घेत असू. यंदा तो न घेतल्यामुळे काही वाचकांची पत्रे आली आहेत. या वर्षी असा आढावा न घेतल्याचे मुख्य कारण म्हणजे यंदा सुचवलेले शेअर्स हे मुख्यत्वे दीर्घ कालीन गुंतवणुकीसाठी आणि लार्ज कॅप असे आहेत. अशा शेयर्सचा आढावा घेणे जरूरी असले तरीही हे सर्व शेअर्स दीर्घ कालावधीसाठी असल्याने आपण या शेयर्सचा सहामाही आढावा घेणार आहोत. अर्थात पोर्टफोलियोवर नजर मात्र कायम असणे जरूरी आहे.
शेअर बाजाराची सध्याची स्थिति पाहता सामान्य गुंतवणूक शेअर बाजारातून पळ काढण्याची शक्यता जास्त वाटते. मंडित विक्री अँड तेजीत खरेदी या मूळे कायम तोट्यात राहणार्या गुंतवणूकदारांनी खरे तर आता गुंतवणूक करायला हवी. उत्तम कंपन्यांचे शेअर्स आकर्षक किमतीत खरेदी करायची हीच सुवर्णसंधी आहे. मात्र शेअर बाजार किती पडणार हे नक्की माहीत नसल्याने असे शेअर्स टप्प्या टप्प्याने खरेदी करावेत म्हणजे सरासरी किंमत कमी पडेल. या वर्षी सुचवलेले काही शेअर्स सुचवलेल्या किंमतीपेक्षा १०-१५% ने पडले आहेत. उदा. अपोलो हॉस्पिटल्स, क्रॉम्पटन, एनएमडीसी, ट्रेन्त, रिलायन्स, गृह फायनॅन्स इत्यादी. शेअर्स खरेदी करून ठेवायला काहीच हरकत नाही.
शेवटचे पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे अजूनही शेअर बाजारातील बहुतांशी मराठी गुंतवणूकदार ही पुरुष मंडळी आहेत. खर तर अनेक मराठी महिला वित्तीय क्षेत्रात असूनही गुंतवणुकीचे निर्णय मात्र पुरुष मंडळींकडे असा काहीसा हा प्रकार असावा. विनायक कुळकर्णी यांचे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक वाचण्यात आले. समग्र महिलांनी वाचावे व आचरणात आणावे असे हे पुस्तक आहे. गृहीणींनी घरातील कामे करतानाच आíथक बाजुही सांभाळायला शिकायला हवे. बीएसई अथवा एनएसई मधून योग्य कोर्स करून आणि अर्थात अभ्यास करून होम मेकर्स चांगले अर्थार्जनही करू शकतात. शेअर बाजारातील गुंतवणूक ही आता ऑनलाइन ट्रेिडग मूळे घरातून सहज करता येण्याजोगी आणि बर्यापकी उत्पन्न मिळवून देणारा चांगला पर्याय आहे. आणि मुख्य म्हणजे शेअर बाजार हा फक्त शेअर्सची खरेदी विक्री करण्यासाठी असतो असे नाही. शेअर बाजारातून अ-परिवर्तनीय रोखे, कर मुक्त बोंड्स, वॉरंट्स इ. खरेदी करता येते. अर्थात मी नेहमी सांगत असतो त्याप्रमाणे इथेही अभ्यास आणि अर्थात आवड ही हवीच. आणि स्वत पसे गुंतवल्या शिवाय त्यात रस निर्माण होणार नाही. सध्या सोन्यातील गुंतवणूक सध्या तितकीशी फायद्याची ठरणार नाही असे अर्थ तज्ञांचे म्हणणे आहे. म्हणूनच चला या मंदीतच शेअर बाजारातील गुंतवणुकीला सुरवात करूया अस मी म्हणेन, अर्थात पूर्ण अभ्यास करूनच.
एलआयसी हाऊसिंग फायनान्स ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची गृह कर्ज वितरण करणारी कंपनी असून तिचे ८ लाखांहून अधिक ग्राहक आहेत. एलआयसीने १९८९ मध्ये स्थापन केलेल्या या कंपनीचा कर्ज वितरणाचा पोर्टफोलियो ७०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त असून तिची  भारतामध्ये ७ क्षेत्रीय आणि १४० विपणन कार्यालये आहेत. आखाती देशातील भारतीयांच्या सेवेसाठी दुबई आणि कुवेत मध्येही कंपनीची कार्यालये आहेत. डिसेंबर २०१२ साठी संपलेल्या तिमाहीत कंपांनीच्या नक्त नफ्यात २३% घट झाली असली तरीही नक्त व्याजात मात्र १३% वाढ झालेली दिसते. तसेच नऊ माहीसाठी कंपनीची कामगिरी चांगली आहे. नऊ माहीसाठी कंपनीच्या नक्त नफ्यात ७% वाढ होऊन तो ७०७.०५ कोटीवर गेला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात २५ लाख रुपयापर्यंतच्या गृह कर्जावर विशेष कर सवलत देण्यात आली आहे त्याचा सकारात्मक परिणाम गृह कर्ज वितरण कम्पन्यांच्या कामगिरीवर होईल. रिजर्व बँकेच्या परवांगीने ईसीबी अँड एफसीसीबीद्वारे या कंपन्यांना भांडवल उभारणे केवळ सोपे नव्हे तर स्वस्तही पडणार आहे. एकंदरीतच गृह कर्जाची वाढती मागणी, घसरते व्याज दर, भाग्यलक्ष्मी सारख्या नवीन गृह कर्ज योजना, भक्कम प्रवर्तक आदी सगळ्याच बाबींचा फायदा कंपनीला होईल असे वाटते. येत्या वर्षांत २५,००० कोटीचे नवीन कर्ज वितरण करण्याची महत्वाकांक्षी योजना कंपनीने आखली आहे. सध्या २२५ रुपयांच्या आसपास उपलब्ध असलेला हा शेअर मध्यम ते दीर्घ कालावधीच्या गुंतवणुकीसाठी योग्य पर्याय आहे.
एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड
प्रवर्तक                 एलआयसी
सद्य बाजारभाव             रु. २३२.८५
प्रमुख व्यवसाय            गृह कर्ज वितरण
भरणा झालेले भाग भांडवल         रु. १००.९३ कोटी
पुस्तकी मूल्य :  रु.  ११२.६०           दर्शनी मूल्य : रु. २/-
प्रति समभाग उत्पन्न (ईपीएस)        रु. १९
प्राइस अìनग गुणोत्तर    (पी/ई)        ११.८ पट
मार्केट कॅपिटल : रु. ११,३५२ कोटी    बीटा : १.४
गेल्या वर्षभरातील उच्चांक/ नीचांक     :     रु. ३००/ रु. २०९
शेअरहोल्डिंग पॅटर्न (%)
 
प्रवर्तक    ४०.३१
परदेशी गुंतवणूकदार    ३२.४५       
बँका / म्युच्युअल फंडस्    १२.३८
सामान्यजन  व इतर    १४.८६